ऑगस्टा: अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांपैकी मेन राज्याची राजधानी. लोकसंख्या २१,९४५ (१९७०). ऑगस्टा केनेबेक नदीकाठी, अटलांटिक महासागरापासून ६४ किमी. आत वसले असून तेथपर्यंत मोठ्या बोटी येतात. येथे केनेबेकवर पूल व धरण बांधण्यात आले आहे. कागद, कापड, पादत्राणे, छपाईच्या वस्तू, लाकडी वस्तू यांच्या उत्पादनाकरता तसेच फळे, भाजीपाला, अंडी यांच्या व्यापारासाठी ऑगस्टा प्रसिद्ध आहे. उन्हाळ्यात हवा खाण्यासाठी येथे प्रवासी येतात.

लिमये, दि.