कॅमेरा : प्रकाशचित्रणासाठी (छायाचित्रणासाठी) लागणारे एक प्रमुख साधन. सर्वांत साध्या आधुनिक कॅमेऱ्यातील प्रमुख भाग म्हणजे एक प्रकाशबंद पेटी, तिच्या एका बाजूला प्रकाश आत येण्यासाठी बसविलेले भिंग, विरूद्ध बाजूला प्रकाशाचा परिणाम होणारे रासायनिक द्रव्य लावलेली प्रकाशचित्रण काच ठेवण्याची चौकट किंवा प्रकाशचित्रण फिल्म गुंडाळण्याची व्यवस्था, भिंगातून ठराविक वेळच प्रकाश आत येण्याकरिता झडप (शटर) आणि चित्रित करावयाच्या दृश्याची जुळवाजुळव करण्यासाठी मदत करणारा दृश्यदर्शक हे होत. (आ.१).

इतिहास : सुरुवातीच्या म्हणजे सु. १८२८-२९ च्या कालातील अगदी साध्या कॅमेऱ्यात एक लाकडी प्रकाशबंद पेटी असून तिच्या आत सरकणारी दुसरी पेटी असते बाहेरील पेटीच्या एका बाजूस साधे विवर्ण (रंगीत प्रतिमा न देणारे) चंद्रकोरी भिंग लावलेले असे.

आ. १. साधा कॅमेरा : (१) प्रकाशबंद पेटी, (२) भिंग, (३) झडप, (४) दृश्यदर्शक, (५) प्रकाशचित्रण फिल्म.

आत सरकणाऱ्या पेटीची भिंगासमोरील नजीकची बाजू मोकळी असून तिच्या दुसऱ्या बाजूवर घृष्ट (गुळगुळीत पृष्ठभाग घासलेली अर्धपारदर्शक) काच ठेवण्याची व्यवस्था असे (आ.२). फक्त भिंगातून प्रकाश येत असल्यामुळे बाहेरील दृश्याची प्रतिमा अगदी सुस्पष्ट व योग्य तऱ्हेने आणण्यासाठी आतील पेटी थोडी पुढेमागे करून ती प्रतिमा घृष्ट काचेवर पहाता येत असे. नंतर घृष्ट काच बाजूस सारून व भिंगावर झाकण घालून दागेअर (१७८९-१८५१) या फ्रेंच चित्रकारांनी प्रथमत: वापरलेला प्रकाश-संवेद्य तांब्याचा पत्रा ठेवीत. नंतर भिंगावरील झाकण काढून जरूर तेवढा वेळ आतील पत्र्याचे उद्‌भासन (प्रकाश पडण्यासाठी उघडा ठेवण्याची क्रिया) करीत. पत्र्यावरील सुप्त प्रतिमा रासायनिक विक्रियेने दृश्य स्वरूपात कायम करण्यात येत असे. 

आ. २. दागेअर यांनी वापरलेला कॅमेरा : (१) बाहेरील पेटी, (२) सरकणारी पेटी, (३) साधे विवर्ण भिंग, (४) घृष्ट काच, (५) प्रकाश आत घेण्यासाठी दार.

अशा तऱ्हेनेच पण साध्या काचेवर बाहेरी दृश्याची प्रतिमा पाडून ती रेखाटता येण्याकरिता अठराव्या शतकात कॅमेरा ऑब्स्क्यूरा (→ कॅमेरा ऑब्स्क्यूरा व कॅमेरा ल्यूसिडा) नावाचे साधन प्रचलित होते. अशी प्रतिमा काचेवर किंवा पत्र्यावर कायम कशी करता येईल या विचाराला चालना मिळून त्यातूनच १८२९ मध्ये दागेअर यांनी प्रकाशचित्रणाचा शोध लावला व वर वर्णन केलेला कॅमेरा वापरला.

दागेअर व न्येप्स यांनी १८३७ मध्ये प्रकाशचित्रण शोधाचा फायदा उठविण्यासाठी भागीदारीत धंदा उभा केला पण तो यशस्वी झाला नाही. त्यांच्या शोधाचे पेटंट न घेता त्याची पूर्ण प्रक्रिया जाहीर रित्या प्रगट केल्यास तहहयात वेतन देऊ असे आश्वासन फ्रेंच सरकारने दिल्यामुळे दागेअर व न्येप्स यांनी १८३९ मध्ये त्या शोधाची संपूर्ण प्रक्रिया जाहीर केली. पॅरिसमधील त्या वेळच्या वर्तमानपत्रांतून तिला प्रसिद्धीही मिळाली आणि काही आठवड्यांनंतर ही माहिती सर्व यूरोपभर पसरून वर्षअखेर जवळजवळ सगळीकडे दागेअर प्रक्रियेचा प्रसार झाला.  

आ. ३. पेट्झवेल स्टुडिओ कॅमेरा : (१) भिंग, (२) भाता, (३) प्रकाशचित्रण काच ठेवण्याची जागा, (४) दंडगोल, (५) तिपाई.
आ. ४. वारनर्क यांचा घडीचा फिल्मगुंडाळी कॅमेरा.

दागेअर प्रक्रिया, टॉलबट यांची व्यस्तचित्र (निगेटिव्ह) – समचित्र (पॉझिटिव्ह) प्रक्रिया, ओले कलोडियन प्रक्रिया, जिलेटीन पायसाची (प्रकाश संवेदनक्षम पदार्थाचे जिलेटिनामध्ये केलेल्या एकजीव मिश्रणाची) प्रक्रिया, कोरड्या प्रकाशचित्रण काचा व त्याचबरोबर समचित्र प्रतिमा घेण्यासाठी लागणारे ब्रोमाइड-क्लोराइड कागद व अखेर गुंडाळता येणारी फिल्म (फिल्मगुंडाळी) या प्रकाशचित्रणाच्या विकासाला पुढील ४०-४५ वर्षे लागली (→ छायाचित्रण). दरम्यान वापरात असलेल्या काही कॅमेऱ्यांची चित्रे आ. ३, ४ आणि ५ मध्ये दिली आहेत.

सुरुवातीचे तसेच इतर प्रकारचे कॅमेरे जड आणि मोठे असून ते ठेवण्यासाठी लागणाऱ्या तिपाया व इतर सामग्री ही जड असत. तरी काही अगदी लहान व सहज लपविता येणारे कॅमेरेही बनविण्यात आले होते.

ईस्टमन कोडॅक कंपनीने १८८८ साली एका हातात धरता येणारा लहान पेटीचा कॅमेरा बनवून प्रकाशचित्रणाची आवड घरोघरी उत्पन्न केली. या कॅमेऱ्याचा आकार १७ x ९ x ९ सेंमी. असून वजन सु. १ किग्रॅ. होते. यात एकच ठराविक केंद्रांतराचे (समांतर प्रकाशकिरण भिंगातून गेल्यावर एका बिंदूत केंद्रित होतात त्या बिंदूचे भिंगाच्या मध्यबिंदूपासून असणाऱ्या अंतराचे) भिंग असल्यामुळे तीन मीटरच्या पलकीडली सर्व दृश्ये स्पष्टपणे फिल्मवर उमटवली जात. ठराविक उद्‌भासन अवधीची झडप व एकच छिद्रव्यास (भिंगातून प्रकाश जाण्यासाठी ठेवलेल्या वर्तुळाकार छिद्राचा व्यास) असे. यात सु. ७ सेंमी. व्यासाची १०० चित्रे घेता येतील इतकी लांब फिल्मगुंडाळी ठेवलेली असे. व्यस्तचित्रे घेतल्यावर कॅमेरा कंपनीकडे परत धाडून समचित्रे कंपनीकडून ग्राहकास मिळत.

पुढील काही वर्षांत फिल्मगुंडाळीला काळा कागद जोडल्यामुळे दिवसा उजेडी अशा फिल्मच्या गुंडाळ्या कॅमेऱ्यात बसवता येऊ लागल्या व घडीचेही कॅमेरे बनविण्यात आल्यामुळे ते सुवाह्य, सुटसुटीत व त्वरित काम देणारे असल्यामुळे कोणालाही प्रकाशचित्रण करण्याची सोय व हौस निर्माण झाली.

आ. ५. ल्यूम्येअर यांचा मॅगेझिन कॅमेरा : (१) उद्भासन करावयाच्या प्रकाशचित्रण काचांचा साठा, (२) उद्भासित झालेल्या प्रकाशचित्रण काचा.

प्रगत कॅमेऱ्यांमध्ये चित्रे सुस्पष्ट दिसण्यासाठी केंद्रीकरणाची (केंद्राच्या पातळीत प्रतिमा आणण्याची) योजना असते. त्यासाठी भात्यासारखे कापडी अथवा कातडी पुढेमागे होणारे आवरण किंवा भिंग मागेपुढे करण्यासाठी योजना असल्यामुळे भिंगांचे केंद्रीकरण करता येते. मोठ्या कॅमेऱ्यात भात्याचे आवरण असते. ३५ मिमी. कॅमेऱ्यात (ज्यात ३५ मिमी. रूंदीची फिल्म वापरतात अशा कॅमेऱ्यात) भिंग थोड्याच अंतरातून हलवावयाचे असल्यामुळे स्क्रूची योजना असते. अधिक प्रगत कॅमेऱ्यांमध्ये निरनिराळ्या प्रकारच्या फिल्म वापरता याव्यात यासाठी निरनिराळी भिंगे लावण्याची व्यवस्था असते आणि अशा निरनिराळ्या फिल्म धारण करण्यासाठीही त्यात विशेष योजना असते.

कॅमेऱ्यातील विविध भागांचे वर्णन आणि त्यांचे उपयोग खाली दिलेले आहेत.

भिंग : भिंग हा कॅमेऱ्याचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. प्रकाशचित्रणासाठी लागणाऱ्या भिंगांची निर्मिती हे एक स्वतंत्र व प्रगत शास्त्र आहे व त्यांना योग्य तो आकार देण, त्याची बैठक, मांडणी व जोडणी करणे हे एक शास्त्र असून ती एक कलाही आहे (→ भिंग).

आ. ६. पेटी कॅमेरा – पहिला कोडॅक : (१) भिंगासह बाहेरील पेटी, (२) फिल्मगुंडाळीयुक्त आतील भाग.

काचेपासून केलेल्या विवर्धक (मोठ्या आकारमानाची प्रतिमा देणाऱ्या) भिंगाचा शोध कित्येक शतकांपूर्वी लागला आहे. कॅमेरा ऑब्स्क्यूरामध्ये वापरलेले दोन्ही बाजू बहिर्गोल असलेले विशिष्ट काचेचे (क्राऊन काचेचे) भिंग सोळाव्या शतकातही वापरात होते. भिंगांचे मुख्य प्रकार पुढीलप्रमाणे आहेत : (१) बहिर्गोल (दोन्ही बाजू), (२) अंतर्गोल (दोन्ही बाजू), (३) सपाट बहिर्गोल, (४) सपाट अंतर्गोल, (५) अंतर्गोल – बहिर्गोल, (६) बहिर्गोल –

अंतर्गोल (आ. ७). कॅमेऱ्यात एक वा अधिक बहिर्गोल भिंगे किंवा बहिर्गोल भिंग व इतर भिंगे याचे केंद्राभिमुखी (प्रकाश किरणांचे केंद्रीकरण करणारे) संयुक्त भिंग वापरण्यात येते. कोणत्याही भिंगाने पाडलेली प्रतिमा थोडीफार सदोष असते. भिंगातील दोष पुढीलप्रमाणे आहेत : (१) गोलीय विपथन, (२) वर्णीय विपथन, (३) विकृती, (४) दृष्टिवैषम्य, (५) प्रतिमा विकार, (६) क्षेत्र वक्रता. या दोषांपैकी क्षेत्र वक्रता या दोषाचे स्पष्टीकरण खाली दिले आहे. बाकीच्या दोषांकरिता ‘प्रकाशीय व्यूहातील विपथन’ आणि ‘भिंग’ या नोंदी पहाव्यात.

अआ हा एका प्रतलात (पातळीत) असलेला वस्तुविषय आहे. ची भिंगातून पडलेली प्रतिमा आहे. वस्तुविषयावरील आ बिंदू पेक्षा भिंगापासून दूर असल्यामुळे ची प्रतिमा असलेला बिंदू हा भिंगाच्या जवळ असतो व त्याचे विवर्धन पेक्षा लहानही असते. इई ही प्रतिमा अआ पेक्षा वक्र झाल्यामुळे यास क्षेत्र वक्रता दोष म्हणतात. प्रकाशचित्रणात प्रतिमा घेणारी प्रकाशचित्रण काच, फिल्म, फिल्मगुंडाळी वगैरे साधने एका समपृष्ठात ठेवीत असल्यामुळे हा क्षेत्र वक्रता दोष कमीतकमी किंवा नाहीसा करावा लागतो. स्वस्त कॅमेऱ्यामध्ये फिल्मलाच योग्य तो बाक देऊन दोष नाहीसा करून दृश्य क्षेत्राचा विस्तार करता येतो.

आ. ७. भिंगांचे प्रकार

भिंगात असलेल्या दोषांप्रमाणे त्यात असलेल्या पुढील महत्त्वाच्या गुणधर्मांचाही विचार करावा लागतो : (१) छिद्रव्यास, (२) केंद्रांतर, (३) केंद्र – खोली क्षेत्र – खोली, (४) भिंगाचे केंद्रीकरण.

(१) छिद्रव्यास : भिंगाच्या अक्षास समांतर असलेली किरण शलाका भिंगाच्या जेवढ्या पृष्ठभागातून आत जाऊन प्रतिमा पाडू शकते तेवढ्या भिंगाच्या पृष्ठभागाचा व्यास म्हणजे छिद्रव्यास होय. भिंगास बैठक असल्यास बैठकीच्या आतील व्यासासही छिद्रव्यास म्हणतात. सामान्यत: बैठक असलेल्या भिंगासमोर किंवा त्याला लागून भिंगाच्या सममध्यात (एकच मध्य असलेल्या) निरनिराळ्या व्यासाची छिद्रे असलेले पटल (छिद्रपटल) असते त्यामुळे प्रतिमेची तेजस्विता नियंत्रित करता येते. मोठ्या व्यासातून जास्त प्रकाश जातो म्हणून जास्त उद्‌भासन होते. छिद्रव्यास लहान करीत गेल्यास क्षेत्र-खोली वाढत जाते.

पटलातील संपूर्ण छिद्र व्यापून जाणाऱ्या आपाती (पडलेल्या) किरण शलाकेच्या व्यासाला परिणामकारी छिद्रव्यास म्हणतात. परिणामकारी छिद्र व्यासामुळे भिंगातून प्रतिमा तयार करणारा प्रकाश किती प्रमाणात जातो हे ठरवता येते पण ह्या प्रकाश-प्रमाणाने जशी लहान व तेजस्वी प्रतिमा मिळू शकते तशीच मोठी व फिकट प्रतिमाही मिळू शकते. त्यामुळे प्रतिमेची तेजस्विता ठरविताना परिणामकारी छिद्रव्यासाबरोबर भिंगाच्या केंद्रांतराचाही विचार करावा लागतो. ‘भिंगाचे केंद्रांतर भागीले छिद्रव्यास’ याला सापेक्ष छिद्रव्यास म्हणतात. एकाच वस्तूविषयाच्या व एकच सापेक्ष छिद्रव्यास असणाऱ्या सर्व भिंगांतून सारख्याच तेजस्वितेच्या प्रतिमा तयार होतात. उदा., ३२ सेंमी. केंद्रांतर व ४ सेंमी.

आ. ८. क्षेत्र वक्रता दोष : (१) वस्तुविषय, (२) बहिर्गोल भिंग, (३) प्रतिमा स्थळ.

परिणामकारी छिद्रव्यास असणाऱ्या भिंगांचा सापेक्ष छिद्रव्यास ८ असतो, तर १६ सेंमी. केंद्रांतर व २ सेंमी. परिणामकारी छिद्रव्यास असणाऱ्या दुसऱ्या भिंगांचाही सापेक्ष छिद्रव्यास ८ च होईल. म्हणून अशा भिंगांचे उद्‌भासन एकच आहे असेही म्हणतात. सापेक्ष छिद्रव्यासाला केंद्रांक (f-number किंवा f/number) म्हणतात. केंद्रांक – २ (किंवा f/२) असलेल्या भिंगातून जाणाऱ्या प्रकाशाचे प्रमाण केंद्रांक – ४ (किंवा f/4) असलेल्या भिंगातून जाणाऱ्या प्रकाशाच्या प्रमाणापेक्षा चौपट असते. केंद्रांकाला पुष्कळ वेळा भिंगाचा वेग असेही म्हणतात. √२ या संख्येने मोठ्या होत जाणाऱ्या प्रत्येक केंद्रांकाचा वेग कमी कमी होत जातो. सैद्धांतिक दृष्ट्या हवेत असणाऱ्या भिंगाचा महत्तम केंद्रांक ०.५ असतो. म्हणून तो आधार घेऊन √२ ने वाढणारे अंक सामान्यत: कॅमेऱ्याच्या उद्‌भासनसाठी दिलेले असतात, जसे : ०.५, ०.७, १.०, १.४ वगैरे.

(२) केंद्रांतर : प्रत्येक भिंगाला एक केंद्र प्रतल किंवा केंद्र पृष्ठभाग असतो व त्या ठिकाणी अतिदूर असलेल्या वस्तुविषयांची अगदी रेखीव अशी प्रतिमा पडते. हवेत ठेवलेल्या पातळ बहिर्गोल भिंगाचे केंद्रांतर आ. ९ वरून समजेल.

आ. ९. भिंगांचे केंद्रांतर

भिंग मध्यभागी पातळ असून त्याच्या दोन्ही बाजूस हवा असेल

तर त्याचे केंद्रांतर, = (न – १) ( )
केंद्रांतर

या समीकरणाने मिळते, पण मध्यभाग ट सेंमी. जाड असेल तर

= (न – १) { + ट (न – १) }
 

 

केंद्रांतर न र

या सूत्राने मिळते. या समीकरणात न हा भिंगाचा प्रणमनांक (प्रकशाच्या एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जाताना होणाऱ्या दिशाबदलाचे म्हणजे प्रणमन क्रियेचे व्याख्येनुसार आलेले गुणोत्तर, वक्रीभवनांक) असून र व र अनुक्रमे गोलीय बाजूंच्या त्रिज्या आहेत.

= भिंग शक्ती, अशी भिंगाच्या शक्तीची व्याख्या आहे.
केंद्रांतर

केंद्राभिमुख आणि केंद्रापसारी (प्रकाश केंद्रापासून दूर नेणाऱ्या) भिंगांची वैशिष्ट्ये खाली दिली आहेत. 

आ. १०. (अ) केंद्राभिमुख भिंग, न < न (आ) केंद्रापसारी भिंग, न > न

आ. १० (अ) मध्ये अ माध्यमाचा प्रणमनांक न आणि आ माध्यमाचा न आहे. र ही वक्रपृष्ठभागाची वक्रता त्रिज्या आहे, इई अक्ष आहे. डावीकडून अक्षास समांतर किरण पडले, तर आ. १० (अ) मध्ये दाखविल्याप्रमाणे प्रणमन होऊन किरण एका केंद्राकडे वळतात. म्हणून अशा पृष्ठभागाला केंद्राभिमुख पृष्ठभाग म्हणतात. आ. १० (आ) मध्ये किरण केंद्राकडे न जाता त्याच्यापासून दूर जातात म्हणून त्यास केंद्रापसारी पृष्ठभाग म्हणतात. आ. १० (अ) मध्ये दाखविलेल्या माध्यमातील

 

आ. ११. (अ) धन भिंग (आ) ऋण भिंग. र, र – वक्रता त्रिज्या

वक्रपृष्ठाच्या शक्तीची (श) व्याख्या पुढीलप्रमाणे करतात :

श = – न

चे चिन्ह वक्रता केंद्र पृष्ठभागाच्या उजव्या बाजूस असल्यास घन धरतात व डाव्या बाजूस असल्यास ऋण धरतात. भिंगाच्या बाबतीत वरील उपपत्तीच्या दोन्ही पृष्ठभागांकरिता विचार करून भिंगाचे चिन्ह ठरविले जाते. आ. ११ मध्ये धन व ऋण भिंगाची उदाहरणे दाखविली आहेत (→ भिंग).

(३) केंद्र-खोली क्षेत्र-खोली : अतिदूर असलेल्या वस्तुविषयाची अगदी रेखीव प्रतिमा भिंगाच्या केंद्र प्रतलात किंवा पृष्ठभागात पडते. भिंगापासून थोडे दूर किंवा जवळ असणाऱ्या वस्तुविषयाच्या प्रतिमा कमी रेखीव असतात. तथापि केंद्र प्रतलाच्या थोडे मागेपुढे असणाऱ्या प्रतलातही प्रतिमेचा कमी झालेला रेखीवपणा जेव्हा लक्षात न घेण्याजोगा असतो तेव्हा त्या पुढेमागे केलेल्या अंतरमर्यादेला केंद्र – खोली म्हणतात. केंद्र – खोली गणित – सूत्राने काढता येते. ते सूत्र : (१) भिंग आणि प्रतिमा यांतील अंतर, (२) भिंग आणि वस्तुविषय यांतील अंतर, (३) भिंगाचे केंद्रांतर, (४) केंद्रांक व (५) रेखीवपणा किती कमी झाला याचे दर्शक जे संभ्रम वर्तुळ (केंद्रित केलेल्या प्रकाशाच्या तेजस्वी बिंदूचे किमान क्षेत्रफळ) त्याचा व्यास यांच्या पदांत मांडता येते. त्या सूत्रावरून केंद्र – खोली केंद्रांकाशी सम प्रमाणात असते असे दिसून येते, म्हणजे केंद्रांक लहान (म्हणजे छिद्रव्यास मोठा) असल्यास केंद्र-खोलीही लहान असते.

वस्तुविषयाचे थोडे पुढेमागे स्थलांतर करूनही मिळालेल्या प्रतिमा सारख्याच रेखीव दिसतात, या अंतरमर्यादेला क्षेत्र-खोली म्हणतात. हेच गणिताच्या भाषेत सांगावयाचे झाल्यास क्षेत्र-खोली भिंगाच्या व्यासावर व्यस्त प्रमाणात अवलंबून असते. वस्तुविषयाचे भिंगापासूनचे अंतर एका ठराविक मूल्याएवढे झाल्यास क्षेत्र-खोली अनंत होते हे गणिताधारे दाखविता येते. त्यावेळेस वस्तुविषयाच्या भिंगापासून असलेल्या अंतरावर अति-केंद्रीय अंतर असे म्हणतात. एखादे भिंग अत्यंत दूर (अनंत) असलेल्या वस्तुविषयावर केंद्रित केले व केंद्रीकरण न बिघडवता ठेवावयास लागणाऱ्या दुसऱ्या वस्तुविषयाचे भिंगापासूनचे लघुतम अंतर म्हणजे वरील अति-केंद्रीय अंतर असते. निश्चित केंद्र असणाऱ्या पुष्कळ कॅमेऱ्यांत भिंगाचा व्यास बराच लहान असतो, अशा भिंगापासून सु. दोन मीटर अति-केंद्रीय अंतर ठेवता येईल अशी योजना केल्यामुळे त्या पलीकडील कोणत्याही अंतरावर असलेल्या वस्तुविषयाचे केंद्रीकरण होऊ शकते म्हणजेच अतिशय क्षेत्र-खोली मिळते.

व्यस्तचित्रावर येणारे ‘दृश्य क्षेत्र’ भिंगाच्या कोनीय क्षेत्रावर अवलंबून असते. जास्त केंद्रावर असलेल्या भिंगाच्या दृश्य क्षेत्रापेक्षा कमी केंद्रांतर असलेल्या भिंगाचे दृश्य क्षेत्र मोठे असते. म्हणजे वस्तुविषय कमी केंद्रांतर असलेल्या भिंगाच्या केंद्राशी मोठा कोन करतो, या कोनाला ‘कोनीय क्षेत्र’ म्हणतात. सामान्यत: व्यस्तचित्राच्या भूमितीय कर्णाबरोबर भिंगाचे केंद्रांतर असते किंवा दृश्य क्षेत्राच्या व्यासाबरोबर असते.

(४) भिंगाचे केंद्रीकरण : वस्तुविषयाची प्रतिमा भिंगामुळे फिल्मवर किंवा प्रकाशचित्रण काचेवर पडत असली तरी ती रेखीव, स्पष्ट व योग्य अंतर दिसण्यासाठी भिंग व फिल्म यांमध्ये योग्य व तेच अंतर असावे लागते व ते अंतर भिंगाच्या केंद्रांतरावर व वस्तुविषय भिंगापुढे किती अंतरावर आहे यांवर अवलंबून असते कॅमेरा भिंग मागेपुढे करून हे योग्य अंतर ठरवता येते. स्वस्त कॅमेऱ्यामध्ये निश्चित केंद्र व भिंगाचा छिद्रव्यास लहान असल्यामुळे क्षेत्र-खोली भरपूर असते व त्यामुळे २-२.५ मी. पलीकडील वस्तुविषयांच्या प्रतिमा अगदी रेखीव येतात म्हणून केंद्रीकरणाचा प्रश्न उद्‌भवत नाही.

प्रतिमेला स्पष्टपणा व रेखीवपणा आणण्यासाठी केंद्रीकरणाच्या पुष्कळ पद्धती आहेत. फिल्म व भिंग यांमधील अंतर बदलतात किंवा भिंगाचे केंद्रांतर बदलतात. जवळजवळ सर्व मिनिएचर (लहान) कॅमेऱ्यांच्या भिंगांना पुढेमागे सरकविण्याची सर्पिलाकार (मळसूत्राप्रमाणे) व्यवस्था असल्यामुळे केंद्रीकरण करता येते. एका किंवा जुळ्या भिंगांच्या रिफ्लेक्स (परावर्तक) कॅमेऱ्यांमध्ये भिंगाची बैठकच घडीच्या भात्यामुळे पुढेमागे करता येते. काही कॅमेऱ्यांत फिल्म किंवा प्रकाशचित्रण काचधारक दंतचक्र व दंतपट्टीच्या साहाय्याने पुढेमागे करता येतात. अनेक भिंगे असलेल्या कॅमेऱ्यांत भिंगांमधील परस्पर अंतर बदलण्याची सोय असते. सामान्यत: दर्शनी भागात असलेल्या भिंगांचा गट मागेपुढे करता येतो, यास दर्शनी गट केंद्रीकरण म्हणतात. अगदी जवळ असलेल्या वस्तुविषयासाठी पूरक बहिर्गोल भिंगे कॅमेऱ्याला जोडता येतात त्यामुळे भिंगाचे केंद्रांतर बदलून केंद्रीकरण होते.

कॅमेऱ्यातील भिंगे : निसर्गदर्शक भिंग : अगदी सुरुवातीची विशेष म्हणजे प्रकाशचित्रणाचा शोध लागण्यापूर्वी १६-१७ वर्षे, डब्ल्यू एच्. वुलस्टन या इंग्‍लिश शास्त्रज्ञांनी या भिंगाची निर्मिती केली (आ. १२). पेटी कॅमेऱ्यामध्ये अशी अनेक भिंगे वापरात आली असली तरी त्यात अनेक प्रकाशकीय दोष आहेत.

आ. १२. निसर्गदर्शक भिंग : (१) छिद्रपटल, (२) भिंग (अंतर्गोल – बहिर्गोल – चंद्रकोरी).

सी. काव्हल्ये यांचे विवर्ण भिंग : विवर्ण भिंग तयार करण्यासाठी दोन परस्पर विरुद्ध शक्तींची म्हणजे एक क्राऊन काचेचे (कमी प्रणमनांक व कमी अपस्करण म्हणजे प्रकाशाचे निरनिराळ्या रंगांत होणारे पृथ:करण असणारे) व दुसरे फ्लिंट काचेचे (मोठा प्रणमनांक व मोठे अपस्परण असणारे) अशी दोन भिंगे एकमेकांस चिकटवतात. तयार झालेले विवर्ण भिंग सामान्यत: ऋण शक्तीचे असते.

आ. १३. काव्हल्ये यांचे विवर्ण भिंग : (१) छिद्र पटल, (२) विवर्ण भिंग.

पेट्झवेल व्यक्तिचित्र (पोर्ट्रेट) भिंग : विवर्ण भिंग : (१) छिद्र निसर्गदर्शक भिंगे कमी वेगाची असल्यामुळे पटल,(२) विवर्ण भिंग. पेट्झवेल यांनी जास्त वेगाची (लहान केंद्रांकाची) भिंगे १८४० मध्ये बनविली. यात गोलीय विपथन बऱ्याच प्रमाणात कमी होते (आ. १४).

आ. १४. पेट्झवेल व्यक्तिचित्र भिंग  : (१) विवर्ण भिंग, (२) छिद्रपटल, (३) भिंगांची जोडी.

हे भिंग व्यक्तींचे चित्रण करणारे प्रकाशचित्रकार जवळजवळ एक शतक प्रमाणभूत म्हणून वापरीत होते. मोठा छिद्रव्यास आणि प्रकाशचित्रण काचेच्या मध्यासभोवती प्रतिमेची उत्तम स्पष्टता या दोन गुणांमुळे हे भिंग यशस्वी ठरले. तथापि या भिंगाच्या बाबतीत अक्षापासून काही अंतरावर क्षेत्र वक्रतेमुळे व भिंगाच्या बैठकीच्या लांबीमुळे प्रकाश अडला जाऊन स्पष्टता तसेच प्रकाशन कमी होत जाते. यामुळे बऱ्याच व्यक्तींच्या समूहचित्राला ती अयोग्य ठरली, पण प्रकाशचित्रकारांना मस्तक व खांदे स्पष्ट दिसण्यासाठी क्षेत्र वक्रता फायदेशीर वाटत असे. अलीकडे या भिंगाचे दुसरे प्रकार प्रचलित आहेत.

सममितीय तत्त्व : निसर्गदर्शक भिंगाचे अंगभूत दोष वर्णीय विपथन, प्रतिमा विकार व गोलीय विपथन दुरुस्त करण्याच्या प्रयत्‍नात एक गोष्ट आढळून आली, ती म्हणजे छिद्रपटलास सममित (एखाद्या संदर्भास अनुसरून नियमितपणे मांडणी असणारी रचना) अशी भिंगे ठेवल्यास वरील दोष दुरूस्त होतात. या सममितीय तत्त्वात छिद्रपटलाच्या मागील बाजूच्या भिंगाचा भाग हा छिद्रपटलाच्या पुढील भिंगाच्या त्याच भागाची प्रतिमा असतो.

आ. १५. सममित भिंग

म्हणून छिद्रपटलाच्या दोन्ही बाजूंस सममित तर्‍हेने ठेवलेल्या अशा भिंगांच्या रचनेत सममितीय तत्त्वाचा अंतर्भाव झालेला आहे. भिंगांच्या अशा रचनेमुळे वरील दोष नाहीसे होतात. अर्थात एकक विवर्धनातच हे खरे असते, तरीही भिन्न विवर्धनांत ही रचना बरीच दोषरहित होत असल्यामुळे ह्या  सममित तत्त्वाला महत्त्व प्राप्त झाले आहे.

आ. १६. रॅपिड रेक्टीलिनिअर किंवा अॅप्लनाट भिंग.

या तत्त्वाचा आधार घेऊन जर्मनीत स्टाइन हिल व इंग्लंडात डॉलमेयर यांनी १८६६ मध्ये अनुक्रमे ‘अँप्लनाट’ व ‘रॅपिड रेक्टीलिनिअर’ अशा निरनिराळ्या नावांची पण एकाच प्रकारची भिंगे तयार केली (आ. १६). या भिंगाचा फारच उपयोग होऊ लागल्यामुळे पुढे अनेकांनी त्याच्या नकला तयार केल्या.

झाइस प्रोटार : बेरियम काचेचा १८८६ मध्ये शोध लागून भिंगाच्या अभिकल्पात (योजनेत) फारच प्रगती झाली. तोपर्यंत मागे उल्लेख केल्याप्रमाणे विवर्ण भिंगे तयार करीत असत. मोठ्या प्रणमनांकाच्या व कमी अपस्करणाच्या बेरियम क्राऊन काचेचा शोध लावण्यात ॲबे व शॉट यांना यश मिळाल्यामुळे विवर्ण भिंगाची निष्पन्न शक्ती धन करता येऊ लागली त्यामुळे पूर्वीच्या ऋण शक्तीच्या विवर्ण भिंगातील दोष नाहीसे करता आले.

आ. १७. झाइस प्रोटार भिंग.

झाइस कंपनीच्या पॉल रूडॉल्फ यांनी १८९० च्या सुमारास रॅपिड रेक्टीलिनिअर प्रकारच्या भिंगाचा अभिकल्प पुन्हा तयार केला. त्यांनी रॅपिड रेक्टीलिनिअरच्या मागील भिंगात जोडलेला केंद्रापसारी पृष्ठभाग बदलून तेथे केंद्राभिमुख पृष्ठभाग बसवला आणि त्यात बेरियम क्राऊन काचेचा उपयोग केला. अशा तर्‍हेने भिंगाच्या मागील घटकाच्या पृष्ठभागांपैकी एक केंद्रपसारी पृष्ठभाग छिद्रपटलाच्या समोर ठेवला व त्याचा दुसरा पृष्ठभाग केंद्राभिमुख असल्यामुळे दृष्टिवैषम्य व गोलीय विपथन दोष कमी झाले. या रचनेला दृष्टिवैषम्यरहित (ॲनास्टिगमॅट) भिंग असे म्हणतात (आ. १७).

गोअर्झ भिंगे : रॅपिड रेक्टीनिअर व प्रोटार यांच्या रचनेमुळे काही निर्मात्यांनी या दोन्ही भिंगांचे गुण समाविष्ट होतील अशा एका भिंगाच्या रचनेच्या प्रयत्‍नास सुरुवात केली.

आ. १८. गोअर्झ डॅगोर भिंग.

फोन हग यांनी तीन भिंगे एकमेकांस चिकटवून त्यांचा एक घटक बनविला व अशा दोन घटकांच्या जोडीमध्ये छिद्र पटल ठेवल्यामुळे आणखी तीन प्रकाशकीय दोष सममितीय तत्त्वाने कमी झाले, भिंगांच्या याजोडीला ‘गोअर्झ डॅगोर भिंग’ म्हणतात. यातील काही प्रकारांत बरेच मोठे क्षेत्र व छिद्रव्यास मिळत असल्यामुळे धंदेवाईक प्रकाशचित्रकार याचा फार उपयोग करीत.

भिंगाच्या पुढील भागातील एका केंद्रांतराचा घटक मागील भिंगाच्या दुसरे केंद्रांतर असलेल्या घटकाशी बदल करून तिसरे केंद्रांतर मिळू शकेल, अशी पुढच्या मागच्या भागांतील घटकांची अदलाबदल करता येईल अशीही रचना या भिंगात आहे.

फोन हग यांनीच वरील अभिकल्पाहून भिन्न व अभिनव रचनेचे एक भिंग तयार केले. त्यात पुढील आणि मागील भागांत दोन घटक भिंगे असून तीन चिकटविता मध्ये थोडी हवेची फट ठेवण्यात आली.

आ. १९. गोअर्झ गोटार भिंग. आ. २०. झाइस टेसार भिंग.

त्यामुळे रचनेनुसार या भिंगाला ‘हवा अंतरित चार घटक भिंग’ असे म्हणता येते (आ. १९). या भिंगाचे व्यापारी नाव गोअर्झ गोटार भिंग असे आहे.

चिकटवून बसविलेल्या भिंगांच्या घटकापेक्षा त्यांत हवेची कमी जास्त फट ठेवल्यामुळे मिळणाऱ्या फायद्याचा उपयोग प्रोटारमध्ये करण्यात आला व त्यातील डाव्या भागातील (आ. १७) दोन घटक एकमेकांपासून भिन्न करून रूडॉल्फ यांनी अतिप्रसिद्ध असे ‘टेसार भिंग’ १९०२ मध्ये तयार केले (आ. २०).

आ. २१. चार घटक भिंग-मोठ्या कोनाचे.

यात निरनिराळ्या केंद्रांकांची भिंगे तयार करण्यात आली, या भिंगांचा मिनिएचर कॅमेऱ्यात विशेष उपयोग होतो.

गौस यांच्या कल्पनेवर आधारलेली भिंगे : गौस या गणितज्ञांनी चंद्रकोरीचा आकार असलेल्या क्राऊन व फ्लिंट काचेच्या भिंगांमध्ये हवेची फट ठेवल्यास गोलीय विपथन नाहीसे होते ही कल्पना  मांडली. तिच्या आधारावर आ. २१ व २२ मध्ये दाखविलेली भिंगे तयार करण्यात आली.

आ. २२. झाइस टोपोगॉन भिंग – मोठ्या कोनाचे.

कूक ट्रिफ्लिकेट : सर्व प्रकाशकीय विपथन व इतर दोष नाहीसे करण्यासाठी झालेल्या प्रयत्‍नात ‘कूक ट्रिफ्लिकेट’ या भिंगाला फारच यश मिळाले. या भिंगाची रचना प्रथम एच्. डेनिस टेलर यांनी १८९३ मध्ये केली (आ. २३). या भिंगात प्रत्येक भिंगाची एक शक्ती मिळून तीन शक्ती, भिंगाच्या निवडी व त्यांच्या दरम्यान हवेच्या दोन फटींची विभागणी अशा सात प्रकारच्या मुक्तिमात्रा (निवड करता येणे शक्य असलेल्या बाबी) या भिंगाच्या अभिकल्पात मिळतात. पेटी कॅमेऱ्यात वापरलेले चंद्रकोरी भिंग सोडल्यास या भिंगाचा वापर अतिशय मोठ्या प्रमाणात होतो. उच्च प्रणमनांक असलेल्या काचेचा उपयोग करून मोठा छिद्रव्यास (केंद्रांक १.९) व लहान केंद्रांतरांची भिंगे ८ मिमी. प्रकाशचित्रणासाठी वापरतात. ३५ मिमी. प्रकाशचित्रणात २.८ आणि ३.५ या केंद्रांकांची भिंगे फारच प्रचारात आहेत.

आ. २३. साधे ट्रिप्लिकेट भिंग.
आ. २४. ट्रिप्लिकेट भिंग (बाहेरील जोड भिंगांसह).

या ट्रिफ्लिकेट भिंगात हार्टिंग यांनी सुधारणा केली. त्यात बाहेरील दोन केंद्रापसारी ऋण शक्तीची भिंगे चिकटविण्यात आली. हेलियर ४.५, लॅनथर ४.५,

कोडॅक एक्टॉर ३.७ ही भिंगे याच धर्तीवर आहेत. तसेच साध्या ट्रिफ्लिकेटच्या मधल्या भिंगाचे दोन लहान शक्तीच्या व त्याच प्रकारच्या भिंगात रूपांतर करून प्रतिमा विकार दुरुस्त करता आला (आ. २५).

दूरचित्रण (टेलिफोटो) भिंगे : नेहमीच्या कॅमेऱ्यातील भिंगाने मिळणाऱ्या प्रतिमेपेक्षा, कॅमेरा वस्तुविषयाजवळ न नेताही मोठ्या प्रतिमा येणारे भिंग. कॅमेऱ्यास जोडलेला भाता सामान्यपणे जितका लांबवता येतो तेवढ्याच अंतरात हे विवर्धन घडवता येते. चलचित्रपट व मिनिएचर कॅमेऱ्यात असे भिंग फार उपयोगी पडते. दूरचित्रण भिंगामुळे हे काम फार थोड्या जागेत होऊ शकते.

आ. २५. टेलर ‘एव्हिअर‘ भिंग.

 या भिंगात दोन घटक असतात. पुढील घटकात केंद्राभिमुख भिंगासारखी क्रिया होते तर मागील घटकात केंद्रापसारी क्रिया होते. प्रत्येक घटकात तीनपर्यंत भिंगे असतात, मोठा कोन असणाऱ्या भिंगाच्या (एक भिंगी रिफ्लेक्स कॅमेरा) कॅमेऱ्यांच्या उलट दूरचित्रण भिंगे लावल्यामुळे मागील केंद्रांतर लांब मिळते (आ. २६ व २७).

‘झूम’ भिंगे : ज्या भिंगांना (किंवा भिंगांच्या घटकांना) बदलणारे केंद्रांतर असते. त्यांना ‘झूम’ भिंग म्हणतात. ही झूम भिंगे प्रथमत: दूरचित्रवाणी कॅमेऱ्यात वापरली जात होती. आता त्यांचा धंदेवाईक तसेच नवशिकेही चलचित्रणासाठी वापर

आ. २६. दूरचित्रण भिंगाचे काही प्रकार

 

आ. २७. उलट दूरचित्रण भिंगाचे काही प्रकार

 

करू लागले आहेत. या भिंगाचे एक किंवा अनेक घटक, त्याच्या अक्षास समांतर दिशेने हलविल्यामुळे या भिंगाचे केंद्रांतर बदलता येते. महत्तम केंद्रांतर व लघुत्तम केंद्रांतर यांचा भागाकार म्हणजे झूमची मर्यादा असते. झूम भिंगाच्या घटकात केंद्रांतर बदलण्यासाठी कमीत कमी दोन घटक तरी अवश्य असतात. दोन घटकांच्या झूम भिंगांची, त्याच्या झूम मर्यादेत, दोन केंद्रांतरांसाठी एकच प्रतिमा प्रतल ठेवता येईल असा अभिकल्प करता येतो. त्यावेळच्या दोन घटकांच्या दोन स्थानांमुळे केंद्रांचे क्षतिपूरण (भरपाई) झाले असे म्हणतात. दुसऱ्या केंद्रांतर स्थानरचनेमुळे प्रतिमेचे प्रतिमा प्रतलापासून अपगमण (सरकणे) होते. जर केंद्र व केंद्रांतर यांचा आलेख काढला तर प्रतिमा प्रतलात

आ. २८. दोन घटक झूम भिंगे

होणारा बदल बराच मोठा असतो व म्हणून योग्य नसतो, याकरिता दोन घटकांमध्ये तिसरा घटक ठेवावा लागतो व तो केंद्र झूम मर्यादेतच राहील अशा तर्‍हेने हलवावा लागतो. अशा तऱ्हेची झूम भिंगे ३५ मिमी. चलचित्रपटाकरीता १९३२ पासून वापरात आहेत. पण १९५० पासून ८ व १६ मिमी. कॅमेऱ्यांकरिताही वापरता येतील अशी भिंगे तयार झाली आहेत. झूम मर्यादा ३:१ पासून २०:१ पर्यंत वाढली आहे.

आ. २९. तीन घटक झूम भिंगे

बायागॉन भिंगे : १९५० पासून अगदी भिन्न प्रकारच्या भिंग रचना बाजारात येऊ लागल्या. ही भिंगे जवळजवळ सर्व विपथन दोषरहित व मोठ्या कोनाची आहेत. अशा प्रकारचे एक भिंग आ. ३० मध्ये दाखविले आहे.

आ. ३०. बायागॉन भिंग

अपवर्णी प्रक्रिया भिंग : मूळ रंगीत असलेल्या चित्राच्या प्रकाशचित्रणास साध्या कॅमेऱ्यात वापरात असलेली भिंगे उपयोगी पडत नाहीत. विशिष्ट प्रकारच्या काचा वापरून केंद्रांक १० किंवा १६ असणाऱ्या भिंगाचा अभिकल्प करून सममिती तत्त्वावर याची जोडणी करतात. त्यामुळे सर्व रंगांचे केंद्रीकरण एका समान केंद्रात होते, तसेच सर्व रंगीत प्रतिमा अगदी एकाच आकाराच्या असाव्या लागतात. नेहमीच्या विवर्ण भिंगापासून याची क्रिया भिन्न असल्यामुळे याला अपवर्णी (सर्व रंगांचे केंद्रीकरण करणारे) प्रक्रिया भिंग म्हणतात.

वर वर्णन केलेल्या सर्व प्रकारच्या भिंगांतून परावर्तनाने व शोषणाने प्रकाशाचे प्रमाण कमी होत जाते व त्यामुळे होणारी हानी मॅग्‍नेशियम फ्ल्युओराइडाच्या विशिष्ट प्रकारे केलेल्या लेपनाने कमी होते. अनेक घटक असलेल्या भिंगांतून किती प्रमाणात प्रकाश प्रतिमेपर्यंत जाऊ शकतो याचा स्थूलमानाने हिशेब करता येतो.

पूरक भिंगे : व्यक्तिचित्रे काढण्यासाठी निश्चित केंद्र असणाऱ्या कॅमेऱ्याला कमजोर चंद्रकोरी घन शक्तीची (केंद्राभिमुख) भिंगे लावतात. या भिंगाचे केंद्रांतर सामान्यत: कॅमऱ्यापासून वस्तुविषयाच्या अंतराएवढे म्हणजे सु. १.२५ मी. असते व फार लहान वस्तुविषयाच्या प्रकाशचित्रणासाठी कॅमेऱ्याचे केंद्रीकरण जमत नाही तेव्हा जास्त घन शक्तीची भिंगे वापरावी लागतात. ऋण शक्तीच्या (केंद्रापसारी) भिंगामुळे कॅमेऱ्याचे केंद्र लांबले जाऊन मोठी विवर्धित प्रतिमा मिळू शकते. त्यामुळे प्रतिमेचे विवर्धन किंवा लघुकरण, प्रतिमेच्या स्थानात किंवा छिद्रव्यासात बदल न होता, करता येते. या प्रकारच्या भिंगांना परिवर्तक भिंगे म्हणतात. ८ मिमी. कॅमेऱ्यात अशी भिंगे मोठ्या प्रमाणात वापरतात. या परिवर्तक भिंगाने कॅमेऱ्याच्या भिंगाचे सु. १३.३ मिमी.  असलेले केंद्रांतर २५ मिमी. पर्यंत विवर्धनासाठी किंवा ८.५ मिमी. लघुकरणासाठी बदलता येते.

गॅलिलीओ यांनी तयार केलेली भिंगे  गोलाचे छेद घेऊन तयार केलेली होती. पण ती तशी न करता परस्परांस समांतर अक्षापासून तयार झालेल्या वृत्तचितीच्या (दंडगोलाकृतीच्या) पृष्ठभागाच्या छेदापासून तयार केल्यास व अशी भिंगे कॅमेऱ्याच्या पुढे ठेवल्यास विस्तीर्ण देखाव्याची चित्रे संकोचित करता येतात व अशाच तर्‍हेने बनविलेल्या दुसऱ्या उलट परिवर्तक भिंगाच्या प्रक्षेपकातून (पडद्यावर चित्रे प्रक्षेपित करणाऱ्या यंत्रातून) दाखविल्यास पहिल्यासारखी विस्तृत दिसतात. हे विस्तारण एकाच दिशेने व प्रतिमेच्या दुप्पट आकाराचे होते. सिनेमास्कोप या नावाने ओळखण्यात येणाऱ्या या प्रकारच्या चलचित्रपटात या तंत्राचाच उपयोग केलेला आहे.

कॅमेऱ्यातील विविध व साहाय्यक भाग : (१) छिद्रपटल, (२) दृश्यदर्शक, (३) अंतरदर्शक, (४) झडप, (५) झडप आणि स्फुरप्रकाश (अल्प काळ टिकणारा तीव्र प्रकाश, फ्लॅश लाइट) यांचा समकाल साधणार्‍या योजना.

(१) छिद्रपटल : कॅमेऱ्याच्या भिंगातून किती प्रमाणात प्रकाश जाऊ द्यावयाचा हे छिद्रपटलातील छिद्राच्या व्यासावर (म्हणजेच छिद्राच्या क्षेत्रफळावर) अवलंबून असते. सुरुवातीच्या कॅमेऱ्यांना भिंगाच्या पुढे एक धातूची चकती असून तिला निरनिराळ्या व्यासांची छिद्रे असत व जे छिद्र हवे असेल ते चकती फिरवून भिंगापुढे आणता येत असे किंवा भिंग धरणाऱ्या नळीतच धातूच्या पत्र्याला छिद्र पाडून तो पत्रा नळीच्या खाचेचून घालत असत. अलीकडच्या काही कॅमेऱ्यांत छिद्रपटलाच्या रचनेत डोळ्याच्या बुबुळाप्रमाणे (कनीनिकेच्या म्हणजे बाहुलीच्या पटलाप्रमाणे) म्हणजे जास्त प्रकाशास बारीक व थोड्या प्रकाशास ते मोठे होण्याची सोय असते. एकमेकांवर सरकणारी धातूची ५ ते १० पातळ पाती एका धातूच्या कडीवर बसवून ती कडी एका बाजूने फिरविल्यास पाती उघडून साधारणपणे निरनिराळा वर्तुळाकार घेऊ शकतात व दुसऱ्या बाजूने फिरविल्यास ती बंद होतात. कडी फिरविण्याची सोय कॅमेऱ्याच्या बाहेरील बाजूने करता येते व अवश्य तेवढे वर्तुळछिद्र उघडता येते.

आ. ३१. कनीनिका छिद्रपटल (पूर्ण उघडे) :  (१) सहा पाती या टोकाभोवती फिरतात, (२) पात्यावर ठेवलेल्या तबकडीला पाडलेल्या खाचांना गुंतविणारी टोके, (३) उघड्या छिद्रपटलाचा व्यास.

(२)दृश्यदर्शक : प्रकाशचित्रणात कोणते दृश्य वस्तुविषयक घ्यावयाचा आहेत याचे सम्यक्‌ज्ञान देणारे साधन. दृश्याची फिल्मवर पडणारी प्रतिमा व दर्शकातून दिसणारी प्रतिमा यांतील दृक्‌च्युती (पहाण्याचा कोन बदलल्यास स्थानांमध्ये होणारा आभासी बदल) कमीत कमी होण्यासाठी हे साधन भिंगाच्या अगदी जवळ असणे जरूर असते. एक भिंगी रिफ्लेक्स कॅमेऱ्यात दृश्य प्रतिमा आरशावर परावर्तीत होऊन घृष्ट काचेवर पडते तेथे तिची जुळवाजुळव करता येते. जुळ्या भिंगाच्या रिफ्लेक्स कॅमेऱ्यात दृश्यदर्शक म्हणजे, एक भिंग, परावर्तन करशरा आरसा व तजेलदार प्रतिमा दाखवणारा लोलक मिळून एक स्वतंत्र कॅमेराच असतो असे म्हणावयास हरकत नाही.

आ. ३२. दृश्यदर्शकांचे विविध प्रकार : (अ) प्रत्यक्ष दर्शक (१) वस्तुविषय, (२) मोठी प्रतिमा. (आ) तार चौकट दर्शक : (१) फिल्मवर येणाऱ्या चित्राचा आकार, (२) तार चौकट, (३) दृष्टिच्छिद्र चौकट. (इ) तेजस्वी दर्शक : (१) वस्तुविषयाकडून आलेले किरण, (२) आरसा, (३) प्रतिमा. (ई) घृष्ट काच दर्शक (१) घृष्ट काचेवर आलेली प्रतिमा.

काही दृश्यदर्शकांमध्ये उपरिनिर्दिष्ट परावर्तनासारखी व्यवस्था असते, तर इतर काहींत म्हणजे थेट दृश्यदर्शकांत कॅमेऱ्यातील भिंगावर एक तारेची चौकट असून फिल्मच्या प्रतलाच्या किंचित मागे पहाण्यासाठी एक छिद्र असते काहींत भिंगावरील चौकट लहान करून ती छिद्राच्या जरा जवळ आणलेली असते. कॅमेऱ्याच्या भिंगात दृष्याचा जो कोन होतो तोच कोन संकोचित चौकट व छिद्र यांत ठेवलेला असतो. काही थेटदृश्यदर्शकांत एक अंतर्गोल भिंग पुढच्या बाजूस व एक बहिर्गोल भिंग मागच्या बाजूला अशी रचना असते. काही दृश्यदर्शकांचे नमुने आ. ३२ मध्ये दिले आहेत.

(३)अंतरदर्शक : कॅमेऱ्याच्या भिंगापासून वस्तुविषयाचे अंतर किती आहे हे दर्शविणारे साधन, वस्तुविषयाचे अंतर काढण्याचे तत्त्व आ. ३३ वरून कळून येईल. आकृतीत अ आणि आ हे एकमेकांस समांतर व थोड्या अंतरावर एकमेकांवर ठेवलेले आरसे आहेत व अतिदूर अंतरावर असलेल्या वस्तुविषयाकडून येणारे दोन समांतर किरण एक अ वर व दुसरा आ ह्या अर्धरजत आरशावर पडलेले दाखविले आहेत. अ आरशावर पडलेला किरण तेथे परावर्तित होऊन उदग्र (उभ्या) दिशेने खाली आ वर पडतो व आ वर पडलेला किरण त्यातून सरळ जाऊन आ मधून पाहिल्यास वस्तुविषयाच्या दोन प्रतिमा एकमेकींवर पडलेल्या दिसतात (आ. ३३-१). पण वस्तुविषय या रचनेजवळ म्हणजे उदा., इ या ठिकाणी असल्यास दोन किरणांनी (एक अतिदूर वस्तुविषयाकडून व दुसरा येथे असलेल्या वस्तुविषयाकडून) पाडलेल्या प्रतिमा एकमेकींवर न पडता भिन्न दिसतात (आ. ३३-२). परंतु आरसा किंचित फिरविला तर त्या प्रतिमा एकमेकींवर पडू

आ. ३३. अंतरदर्शक तत्त्व

शकतात. ज्या कोनातून अ आरसा फिरवावा लागतो ते कोन किरणांची केंद्राभिमुखता आणि चे आ पासून किती अंतर आहे यांवर अवलंबून असतो. थोडक्यात किती कोनातून फिरवला आणि अआ मधील अंतर हे माहीत झाल्यास चे अंतर काढता येते. आरसे प्रकाशकीय दृष्टीने अगदी सपाट असावे लागतात. अआ

अंतर ५ सेंमी. व वस्तुविषय ३०० सेंमी. असले, तर अ आरसा एका अंशापेक्षा लहान कोनातून फिरवावा लागतो. हेच अंतर दुप्पट झाल्यास तो कोन ½ अंशापेक्षा लहान होतो.

अंतरदर्शक सामान्यत: कॅमेऱ्याच्या भिंगाला जोडलेला असतो. कॅमेऱ्याचे वस्तुविषयावर केंद्रीकरण करताना आरसा किंवा त्याऐवजी असलेला लोलक फिरविला जातो व दोन प्रतिमा एकमेकींवर पडलेल्या दिसल्या म्हणजे कॅमेऱ्याचे केंद्रीकरण होते. कॅमेऱ्याचा व या अंतरदर्शक योजनेचा संबंध एका तरफेने घडवून आणला जातो. कॅमेऱ्याचे भिंग स्क्रूच्या मदतीने केंद्रीकरणासाठी पुढेमागे करण्यात आले म्हणजे या तरफेच्या साहाय्याने योजनेतील लोलक फिरतो. पण या तरफेचे हे कार्य सर्व अंतरांना लागू पडत नाही. भिंग मागेपुढे करण्याने व लोलक फिरवला जाऊन येणारे अंतर यांची तत्त्वे भिन्न असल्यामुळे अंतर अचूक येत नाही. अंतर मोजण्याचे सूत्र पुढीलप्रमाणे आहे :

स =
स्प (२ र)

यास = वस्तुविषयाचे भिंगापासूनचे अंतर, = आरशांतील अंतर, = क्ष आरसा किंवा तत्सम कार्य करणारा लोलक ज्यातून फिरला तो कोन, स्प = त्रिकोणमितीय स्पर्शक गुणोत्तराचे संक्षिप्त चिन्ह.

(४) झडप : प्रकाशचित्रण काचेवर किंवा फिल्मवर प्रकाश किती वेळ पाडावयाचा हे ठरविण्याचे साधन. ह्या वेळा १ सेकंदापासून ते १/१००० सेकंद किंवा १ मिलिसेकंदापर्यंत सामान्यपणे असतात.

झडपा दोन प्रकारच्या असतात. एका प्रकारात झडप भिंगाच्या घटकांच्या मधील मोकळ्या जागेत ठेवण्यात येते किंवा ३५ मिमी. कॅमेऱ्याला निरनिराळी भिंगे जोडता यावीत म्हणून ती भिंगाच्या मागे ठेवतात. कॅमेऱ्याच्या कार्याच्या दृष्टीने यात फरक नसतो. दुसऱ्या प्रकारात झडप काचेजवळ किंवा फिल्मजवळ जरा पुढे केंद्र प्रतलात ठेवतात, ह्या झडपेत एका अपारदर्शक पडद्याला एक फूट (यात लहान मोठ्या फटी असतात) असून ती दोन दंडगोलांना गुंडाळलेली असते. स्प्रिंगच्या मदतीने ती एका दंडगोलातून दुसऱ्यावर गुंडाळली जात असताना फिल्मवर प्रकाश टाकला जाऊन उद्‌भासन होते.

पहिल्या प्रकारच्या झडपेत एका धातूच्या कडीवर पातळ पत्र्याची लहान पाती ठराविक रीतीने उघडझाप करू शकतात, पाती उघडल्यावर छिद्र सामान्यपणे वर्तुळाकार राहील अशी योजना असते. कनीनिका छिद्रपटल हे अशा झडपेचेच एक उदाहरण आहे. शीघ्र गतीच्या भिंगामध्ये मोकळी जागा थोडी असल्यामुळे त्याकरिता वापरण्यात येणाऱ्या झडपांत पात्यांची संख्या कमी असते.

स्वयंचलित झडपेमध्ये पाती गुंडाळण्याचे व ती उघडी करण्याचे अशी दोन्ही कामे होतात. दुहेरी काम पाती उघडताना वा गुंडाळताना कॅमेऱ्याला धक्के किंवा कंप बसणार नाहीत अशा सफाईदार पद्धतीने व्हावे लागते. पण हे दुहेरी काम करण्यासाठी लागणाऱ्या स्प्रिंगा गुंडाळण्यास फार श्रम लागतात. त्यामुळे अशा झडपांकडून शीघ्र गती किंवा वेग मिळत नाही. पूर्वरचित झडपांमध्ये बलवान स्प्रिंगा वापरतात, या प्रकारच्या झडपांच्या रचनेत यांत्रिक गुंतागुंत बरीच असते.

स्फुरप्रकाश दिव्यातून वस्तुविषयावर भरपूर प्रमाणात उजेड पाडता येतो व असे दिवे कॅमेऱ्याला जोडलेले असून झडप उघडण्याची व तो दिवा लागण्याची या दोन्ही क्रिया एकाच वेळी होतील अशी योजना केलेली असते.

झडपेची पाती उघडण्याला व बंद होण्याला काहीतरी वेळ हा लागतोच. झडप पूर्ण उघडी झाल्यावरच फिल्मवर प्रकाश पडतो. झडप उघडण्याचा काल व ती पूर्ण उघडून प्रकाश फिल्मवर पडत असलेला काल व नंतर झडप बंद होण्यासाठी लागणारा काल या तीन कालखंडांच्या बेरजेला ‘सर्वकष काल’ म्हणतात. उघडण्याच्या आणि बंद होण्याचा काल सारखा असतो. तथापि तो शून्य कधीच होणे शक्य नसते. प्रकाश फिल्मवर पडण्याच्या कालाला जर का प्र म्हटले व सर्वकष कालाला का स म्हटले तर झडपेची कार्यक्षमता पुढील सूत्राने मिळते :

झडपेची कार्यक्षमता = काप्र X १००
का
= ( १ – का + का ) X १००
का

का व का हे अनुक्रमे झडप उघडण्यास व बंद होण्यास लागणारे काल आहेत.

केंद्र प्रतल झडप १/१००० सेकंद इतका काल उघडी राहू शकते. वर लिहिल्याप्रमाणे अशा झडपेत स्प्रिंगच्या मदतीने फिल्मच्या किंचित पुढून निरनिराळ्या रुंदीच्या फटी निरनिराळ्या वेगाने ओढल्या जातात. सकेंद्र प्रतल झडपेचे कार्य, भिंगामधील किंवा भिंगामधील झडपेच्या कार्यापेक्षा निराळ्या तत्त्वावर आधारले आहे. अपारदर्शक पडद्यावर असणाऱ्या फटीची रुंदी समजा फ आहे व फिल्मचा आकार आ आहे भिंगामागील झडपेच्या प्रकारात, ती जेवढा का प्र उघडी असते तेवढ्या कालात सर्व फिल्मवर प्रकाश पडून उद्‌भासन होत रहाते. पण केंद्र प्रतल झडपेच्या प्रकारात दरवेळेस फ रुंदीच्या २० पट मोठी आहे असे समजल्यास फिल्मच्या निरनिराळ्या लागोपाठच्या २० फटींना लागणारा वेळ म्हणजे रुंदीच्या उद्‌भासन लागणारा वेळ होय. अशा झडपेचा १ मिलिसेकंद काल म्हणजे फ रुंदीच्या फिल्मवरील उद्‌भासन काल असतो. अशा २० फटींच्या रुंदीला अर्थात २० मिलिसेकंद काल लागणार हे उघड आहे.

या केंद्र प्रतल झडपेची कार्यक्षमता काढणे जरा क्लिष्ट आहे. फिल्मपासून किती अंतरावर झडप आहे, फटीची रुंदी किती आहे व प्रकाश शंकूचा फटीजवळ पडलेल्या भागाचा व्यास किती आहे यांवर झडपेची कार्यक्षमता अवलंबून असते.

(५) झडप व स्फुरप्रकाश यांतील समकाला साधणाऱ्या योजना : झडप पूर्णपणे उघडी राहील त्याच वेळी दिव्याचा महत्तम प्रकाश पडेल अशी योजना करणे अवश्य असते. स्फुरप्रकाशाचे दिवे शीघ्र, मध्यम, मंद व केंद्र प्रतल झडपेसाठी उपयोगात येणारे असे चार प्रकारचे असतात. शीघ्र दिवे सु. २० मिलिसेकंद, मध्यम ६० मिलिसेकंद व मंद ८० मिलिसेकंद इतका वेळ प्रकाश देतात. अर्थात प्रत्येक दिव्यास प्रत्यक्ष प्रकाश देण्यापूर्वी २ ते ४ मिलिसेकंद वेळ लागतो. प्रकाशाची तीव्रता महत्तम होण्याचा काल प्रत्येक दिव्याचा निरनिराळा असतो. शीघ्र दिवे पेटी कॅमेरा व ज्याच्यात झडपेची रचना साधी असते अशा कॅमेऱ्यात वापरतात. मध्यम प्रकारच्या दिव्याचा महत्तम प्रकाश मिळण्यास सुरुवातीपासून २० मिलिसेकंद काल लागतो. ह्या प्रकारचे दिवे झडपेच्या उघडझाप क्रियेशी समकालीन करण्यास सोईचे असतात. केंद्र प्रतल झडपेसाठी उपयोगात येणाऱ्या दिव्याचा स्फुरप्रकाश काल फटीला फिल्मच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत लागणाऱ्या कालापेक्षा मोठा असतो.

आ. ३४ मधील आलेखात झडपेला उघडल्यापासून बंद होण्यास लागणार काल सु. १० मिलिसेकंद आहे. ती इ यावेळी उघडावयास लागून उ यावेळी पूर्ण उघडून ४ ते ५ मिलिसेकंदांनी ई वेळी बंद होते. स्फुरप्रकाशाचे विद्युत मंडल अ वेळी पुरे होऊन आ वेळी तो प्रकाश देऊ लागतो व महत्तम प्रकाश उ वेळी देतो. तेव्हाच झडप पूर्ण उघडी झाल्यामुळे ही चांगल्यापैकी समकालीन योजना आहे असे म्हणता येते. योग्य वेळी मंडल पुरे होऊन व झडप पूर्ण उघडण्याच्या वेळेस प्रकाश महत्तम होणे हे या योजनेचे प्रमुख अंग आहे. साध्या कोरड्या ५ ते १० अँपिअर विद्युत प्रवाह देणाऱ्या घटमाला या योजनेस पुरतात किंवा घटमाला-धारित्र (विद्युत ऊर्जा साठविणारे साधन) पद्धतही वापरता येते.

वायुभरित विद्युत् विसर्जन (वायूतून विद्युत् प्रवाह वाहून नेणाऱ्या) नलिका दिव्यापासून मिळणाऱ्या प्रकाशाला इलेक्ट्रॉनीय स्फुरप्रकाश म्हणतात व या उपकरणाला ‘इलेक्ट्रॉनिक फ्लॅश गन’ म्हणतात. या विसर्जनाच्या पद्धतीने सूर्यप्रकाशासारखा उजेड पाडता येतो. या स्फुरप्रकाशाचा काल झडपेच्या कालापैक्षा शीघ्रतर असल्यामुळे गतिमान वस्तुविषयाचे प्रकाशचित्रण रेखीव मिळते.

आ. ३४. मध्यम स्फुरप्रकाश झडप समकालीन योजना आलेख

इलेक्ट्रॉनीय स्फुरप्रकाशाची वारंवारता (एका सेकंदात होणाऱ्या प्रकाश पाडण्याच्या क्रियांची संख्या) वाढविता येत असल्यामुळे वेगाने किंवा प्रवेगाने (वाढत्या वेगाने) जाणाऱ्या वस्तुविषयाचे चित्रण करता येते. नलिकेत झेनॉन वायू भरतात. अशा नलिकेच्या एका प्रकारात वायूचा दाब जास्त असतो तर दुसऱ्यात तो कमी असतो. स्फुरप्रकाशाचा काल शीघ्र १/४०० ते १/२००० सेकंद, शीघ्रतर १/२००० ते १/५०००० सेकंद व याहूनही कमी काल असणारे असे दिवे उपलब्ध आहेत.

उद्‌भासन, उद्‌भासन काल व उद्‌भासनमापक : प्रकाशचित्रणात फिल्मवर पडणारी दीप्ती आणि काल यांचा गुणाकार म्हणजे उद्‌भासन होय. मीटर कॅंडल सेकंद दीप्ती म्हणजे एका प्रमाणभूत मेणबत्तीपासून एक मी. अंतरावर एक सेकंदापर्यंत पडणारा प्रकाश असतो. कॅमेऱ्यामध्ये वस्तुविषयाच्या सर्व प्रतिमेसाठी लागणारा उद्‌भासन काल झडपेच्या वेगामुळे स्थिर असतो. तथापि सर्वसामान्यपणे उद्‌भासन काल पुढील तीन गोष्टींवर अवलंबून असतो : (१) वस्तुविषयाच्या निरनिराळ्या भागांकडून परावर्तित झालेल्या प्रकाशाचे प्रमाण, (२) भिंगाचा परिणामकारी छिद्रव्यास आणि (३) फिल्मची किंवा प्रकाशचित्रण काचेची संवेदनशीलता.

उद्‌भासनमापक वस्तुविषयावरून परावर्तित झालेल्या प्रकाशाचे प्रमाण मोजतो किंवा वस्तुविषयावर पडणाऱ्या आपाती प्रकाशाच्या प्रमाणाचे मापन करतो. उद्‌भासन कालावरून काही गणिती प्रयुतयांनी, भिंगाचा छिद्रव्यास केवढा ठेवावा व झडपेचा काल दिलेल्या फिल्मसाठी केवढा ठेवावा, हे ठरवता येते. पण साधारणत: १९३२ पासून प्रकाशविद्युत् (प्रकाशाच्या क्रियेने विद्युत् स्थितीत बदल होणाऱ्या प्रयुक्तीचा उपयोग करणाऱ्या) उद्‌भासनमापकाचा उपयोग सुरू झाल्यापासून पूर्वीच्या काही पद्धती मागे पडल्या.

प्रकाशविद्युत् उद्‌भासनमापकात पुढील चार प्रमुख घटक असतात : (१) आपाती प्रकाश ग्रहण करणारा प्राथमिक घटक. हा सामान्यत: एक सेलिनियम प्रकाशवर्चसीय (प्रकाशाच्या क्रियेने विद्युत् दाब निर्माण होणारा) घट असतो व याच्यावर आपाती प्रकाश पडल्यास त्याच्या प्रमाणानुसार विद्युत् प्रवाह निर्माण होतो. (२) घटाचे दृश्यक्षेत्र दिशेनुसार कमी जास्त करणारा घटक. (३) घटापासून मिळणाऱ्या विद्युत् प्रवाहाचे मापन करणारे व प्रकाशाचे मान दर्शविणारे विद्युत् उपरकण आणि (४) फिल्मची संवेदनशीलता लक्षात घेऊन प्रकाशाच्या मानानुसार कॅमेऱ्याच्या भिंगाचा छिद्रव्यास व झडपेचा वेग दर्शविणारा उद्‌भासन गणक.

प्रकाश गाळण्या : वर्णपटलातील काही इष्ट वर्णांना पारदर्शक, तर नको असलेल्या वर्णांना अपारदर्शक अशा जिलेटिनच्या रंगीत तबकड्या किंवा रंगीत द्रव्ये वा वायू प्रकाशकीय सपाट काचेच्या भांड्यात ठेवून त्यांचा प्रकाश गाळण्या म्हणून उपयोग करतात. विविध प्रकाश गाळण्या व त्यांचे उपयोग खाली दिले आहेत.

(१) काही फिल्मची वर्ण संवेदनशीलता अपूर्ण असल्यामुळे त्यांना शुद्धीकरण गाळण्या लावण्याची जरूरी असते. डोळ्याला वस्तुविषय जसा दिसतो, त्याप्रमाणे त्याचे चित्रण करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या गाळणीस शुद्धीकरण गाळणी म्हणतात.

(२) काही व्यापारी व शास्त्रीय कामात मुद्दाम वर्णभेद निर्माण करणे अवश्य असते. ही हेतुपुरस्पर विकृती (तजेला किंवा गडदपणा निर्माण करणे) निर्माण करण्यासाठी लागणाऱ्या गाळण्यांना भेददर्शी गाळण्या म्हणतात.

(३) रंगीत प्रकाशचित्रणामध्ये वर्ण तपमान बदलण्याची आवश्यकता असते त्यांना वर्ण क्षतिपूरक गाळण्या म्हणतात.

(४) ध्रुवित (एका विशिष्ट प्रतलात कंपन पावणाऱ्या) प्रकाशात चित्रण करणे किंवा ध्रुवित प्रकाश नाहीसा करणे यासाठी उपयोगात आणलेल्या गाळण्यांना ध्रुवणकारी गाळण्या म्हणतात.

(५) पिवळ्या व पिवळ्या-हिरव्या शुद्धीकरण गाळण्यांना साधारणत: आकाश गाळण्या म्हणतात. कारण यांनी आकाशाच्या रंगात अंधेरा निर्माण होतो. वस्तुत: ह्या गाळणीचा वरील अर्धा भाग रंगीत असून हळूहळू तो कमी होत जाऊन खालचा अर्धा भाग रंगहीन असतो. आकाशातून आलेला प्रकाश गाळणीच्या वरच्या रंगीत भागातून येतो आणि वस्तुविषयाकडून आलेला प्रकाश खालच्या रंगहीन भागातून येतो. त्यामुळे निसर्गचित्रात आकाश भडक दिसत नाही.

(६) वातावरणात बाष्पामुळे आणि धुळीच्या कणांमुळे प्रकाशाचे प्रकीर्णन (विखुरणे) होते. त्यामुळे धुसरता निर्माण होते व आकाशाचा रंग निळा दिसतो. बऱ्याच फिल्म निळ्या रंगाला जास्त संवेदनशील असल्यामुळे ह्या निळ्या रंगाचा त्यांवर जास्त परिणाम होऊन चित्रणात धूसरतेचा विशेष प्रभाव पडल्याचे दिसून येते. पिवळ्या रंगाची गाळणी वापरल्यास निळ्या व जंबुपार (वर्णपटातील जांभळ्या रंगाच्या पलीकडली लहान तरंगलांबीच्या अदृश्य) किरणांचे शोषण होते. अशा गाळण्यांना धूसरता गाळण्या म्हणतात.

(७) अवरक्त (वर्णपटातील तांबड्या रंगाच्या अलीकडील मोठ्या तरंगलांबीच्या अदृश्य) किरणांना संवेदनशील असलेल्या फिल्मवर अवरक्त किरण गाळणी वापरल्यास इतर सर्व रंग वगळून फक्त अवरक्त किरणच फिल्मवर पडतात, कारण ह्या किरणांचे वातावरणात प्रकीर्णन होत नाही आणि त्यामुळे दूरच्या दृश्याची अगदी स्पष्ट प्रतिमा मिळते. या अवरक्त किरण गाळणीमुळे आकाश काळेकुट्ट दिसते व वनस्पतीच्या हिरव्या रंगाचे रूपांतर होऊन तो प्रतिमेत पांढरा स्वच्छ दिसतो. या गाळणीचा उपयोग वैद्यकशास्त्रातही होतो.

(८) जंबुपार किरण दिव्यावर जंबुपार किरण गाळणी ठेवल्यास त्यातून फक्त जंबुपार किरण बाहेर पडतात व त्यामुळे जंबुपार किरण प्रकाशचित्रण करता येते. रंगहीन जंबुपार किरण गाळणी ही कॅमेऱ्याच्या भिंगापुढे ठेवली जाते व ती जंबुपार किरणांचे शोषण करते. दिव्यावर ठेवण्यात येणारी गाळणी जंबुपार किरणांना पारदर्शक असून इतर प्रकाश किरणांचे शोषण करते, तर भिंगापुढे ठेवण्यात येणारी रंगहीन जंबुपार गाळणी अपारदर्शक असते. असा या दोन जंबुपार किरण गाळण्यांतला फरक आहे.

(९) वर्णपटातील कोणत्याही एकाच रंगास पारदर्शक व इतर रंगांस अपारदर्शक अशा गाळण्यांना वर्णपट गाळण्या म्हणतात.

तिपाई किंवा बैठक : जेव्हा उद्‌भासन काल बराच मोठा असतो व प्रतिमेची जुळवाजुळव अतिशय दक्षतेने करावयाची असते, तेव्हा कॅमेऱ्याला बळकट आधार देणे आवश्यक असते. अशा आधाराला तिपाई किंवा बैठक म्हणतात. बैठकीवर कॅमेरा पुढेमागे करता येतो किंवा बैठकीत उदग्र जाड व उंच दांडा बसविल्यास कॅमेरा वर खाली करता येतो व हवा तेथे घट्ट करता येतो. निसर्ग चित्रे, व्यक्तिचित्रे, समूहचित्रे किंवा अगदी जवळून मूळ चित्राच्या नकला (प्रती) करण्यासाठी पुढील भिंगाच्या व मागील फिल्मधारकाच्या निरनिराळ्या हालचाली करता येण्यासाठी अशा तिपापा वा बैठकी लागताततच.

हल्ली वापरात असलेल्या काही प्रकारच्या कॅमेऱ्यांची माहिती खाली दिली आहे.

मिनिएचर कॅमेरा : हा कॅमेला प्रथम ओ. वॉरनॉक यांनी १९२४ साली तयाल केला. त्यानंतर अशाच धर्तीचे अनेक कॅमेरे तयार झाले. त्यांत ३५ मिमी. फिल्मचा उपयोग करण्यात येई. या कॅमेऱ्याचे वैशिष्ट्य म्हणजे सुटसुटीतपणा होय. त्याच्या भिंगाचे केंद्रांतर कमी व छिद्रव्यास मोठा असतो.

आ. ३५. ऑस्कर वॉरनॉक यांचा लैका (एम. ३) मिनिएचर कॅमेरा (केंद्र प्रतल झडप.)
आ. ३६. रिफायना-३ (बदलता येणारी भिंगे, मागील बाजूस छिद्रपटल व झडप).                                                     

काहींत केंद्र प्रतलात झडप असून भिंगे बदलण्याची योजना असते. अंतरदर्शकाची भिंगाशी जोडणी केलेली असून विशिष्ट दृश्यदर्शक वापरलेला असतो. अशा कॅमेऱ्यात २०-३० वेळा उद्‌भासित करता येतील अशा लांबीच्या ३५ मिमी. फिल्मच्या डब्या उजेडातही घालता काढता येतात. १९५० नंतर ३५ मिमी. हूनही लहान १६ मिमी. किंवा त्याहूनही लहान ८ मिमी. फिल्मवर प्रकाशचित्रण करण्याचे अशा धर्तीचे कॅमेरे मिळू लागले आहेत. अशा प्रकारचे दोन कॅमेरे आ. ३५ व ३६ मध्ये दाखविले आहेत.

एकभिंगी रिफ्लेक्स कॅमेरा : हे कॅमेरे एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून वापरत होते, तथापि दुसऱ्या महायुद्धानंतर यांत महत्त्वाची सुधारणा झाली. पूर्वीच्या जुन्या कॅमेऱ्यात भिंगाने पाडलेली प्रतिमा तिरप्या सपाट आरशावर पडून तेथून परावर्तित होऊन ती कॅमॅऱ्याच्या वरच्या बाजूस ठेवलेल्या धृष्ट काचेवर 

पडते. भिंग मागे पुढे करुन धृष्ट काचेवर ती स्पष्ट व नटनेटकी करुन घेता येते.उद्‌भासन करण्याच्या वेळी आरसावर उचलला जाऊन भिंगातून केंद्र प्रतलाच्या, त्याच वेळी उघडणाऱ्या झडपेतून प्रतिमा प्रकाशचित्रण काचेवर पडते. दुसऱ्या खेपेस आरसा पुन्हा बाहेरील तरफेने खाली पाडला जाऊन झडपही बंद होते. पुन्हा पहिल्यासारख्या कृतीने प्रकाशचित्रण करावे लागते.

दुसऱ्या महायुद्धानंतर झालेल्या सुधारणेत दृश्य विषयाप्रमाणे प्रतिमा दाखपणारा लोलक बसविण्यात आला व केंद्र प्रतलाजवळ झडप ठेवण्याऐवजी ती भिंगाजवळ ठेवण्यात आली. इलेक्ट्रॉनीय स्फुर प्रकाशयोजना झडपेच्या कोणत्याही वेगाशी जोडता येऊ लागली. नंतर स्वंयंचलित छिद्रपटलाचा विकास होऊन उद्‌भासनाच्या वेळी योग्य तितक्याच व्यासाचे छिद्र उघडले जाईल. अशी पुर्वयोजना करता येऊ लागली. यामुळे छिद्र पुर्ण उघडे ठेवून केंद्रीकरण, प्रतिमेची तपासणी व योग्य रचना उद्‌भासनापुर्वी करता येऊ लागली. ३५ मिमी. फिल्म वापरता येणारे (आ. ३७) तसेच ६६ (आ. ३८), ६८ व १०१४ सेंमी. प्रकाशचित्रण काचा किंवा फिल्म वापरणारे मोठे रिफ्लेक्स कॅमेरेही आहेत.

जुळ्या भिंगाचा कॅमेरा : ह्या प्रकारच्या कॅमेऱ्याची रचना प्रथम १९२९ साली फ्रॅंक आणि हेडल यांनी प्रचारात आणली. हा कॅमेरा सुटसुटीत व सुवाह्य असून त्यात दृश्यदर्श करणारे भिंग वरील बाजूसं व प्रतिमा त्याच्या खालच्या बाजूस अशी दोन भिंगे असतात. (आ. ३९). वरच्या भिंगासमोर आतील बाजूस एक तिरपा सपाट आरसा असून दृशाची ह्या भिंगाने पाडलेली प्रतिमा आरशावरुन परावर्तीत होऊन ती उभी पडते. आणि अगदी स्पष्ट करता येऊन तिची नीट जुळवाजुळवी करता येते.

आ. ३९. जुळ्या भिंगाचा कॅमेरा : (१) फिल्म, (२) सपाट आरसा, (३) दृश्यदर्शन.

या दृश्यदर्शनी भिंगाचा छिद्रव्यास त्याच्या खाली असणाऱ्या कॅमेरा भिंगाच्या छिद्रव्याससपेक्षा मोठा असल्यामुळे प्रतिमा तेजस्वी मिळते. कॅमेऱ्याच्या वरच्या बाजूस जेथे परावर्तित प्रतिमा दिसते, तेथे एक उघडते मिटते झाकण असल्यामुळे प्रतिमा पहाताना दुसरा दतर प्रकाश न आल्यामुळे आणि काही कॅमे-यांना विवर्धक भिंगाची जोड असल्यामुळे प्रतिमा अगदी सुस्पष्ट व तेजस्वी दिसते. अंतरदर्शक योजनाव प्रतिमा उभी करणारा लोलक यांची जोडणी काही कॅमे-यांबरोबर केलेली असते.

प्रेस कॅमेरा : वर्तमानपत्रांकरिता प्रकाश्सचित्रन करणारे प्रकाशचित्रकार निरनिराळया प्रकारचे कॅमॅरे वापरातात. त्यात ३५ मिमी. पासून ते १०१२.५ सेंमी. र्प्यंत सर्व आकार येतात. परंतू वर्तमानपत्राच्या गरजा प्रामुख्श्सने भागविल्या जाण्याच्या दृष्टीने घडीचा, दुप्पट लांब होणरा कॅमेरा पुर्वीपासून वापरजा जात आहे. यात भिंगाची आदलाबदल करता येऊन ती वरखाली करता येतील, मागेपुढे फिरवता येतील अशी रचना असते. अशा काही कॅमेऱ्यात मागच्या बाजूस असलेल्या प्रकाशचित्रण काचा किंवा फिल्म धारक ९०° किंवा ३६०° कोनातून, कॅमेऱ्यावरील पकड पकड न सुटता आगदी डोक्यावरील किंवा क्षितीजसमांतर देखावे चित्रीत करता येतात.

आ. ४०. हातात धरण्याचा प्रेस कॅमेरा

बहुतेक प्रेस कॅमेऱ्यात घृष्ट काच आणि अंतरदर्शक असतात. केंद्रीकरण मोजपट्‌टी पायथ्याशी किंवा कॅमेऱ्याच्या बाह्यांगावर बसवलेली असते. अंतरदर्शकाच्या काही प्रकारांत विद्युत घटावर लागणरा एक लहान दिवा जोडलेला असतो. त्यातुन दोन प्रकाशलाका दर्शकाच्या दोन खिडक्यांवर पाडल्या जातात. केंद्रीकरण करण्यासाठी असलेली मुठ पुढेमागे फिरविली असता केंद्रीकरणाच्या स्थितीत या शलाका वस्तुविषयाच्या प्रतलात विलीन होतात. त्यावरुन केंद्रीकरण सुयोग्य झाले असे ठरवता येते. या पद्धतीमुळे अंधूक प्रकाशात सुद्धा चांगल्यापैकी केंद्रीकरण करता येते.

प्रेस कॅमेऱ्यात तारेचे किंवा प्रकाशीय अंतरदर्शक नेहमीच असतात. यापैकी काही प्रगत अशा कॅमेऱ्यात प्रकाशीय अंतरदर्शकाची कलती हालचाल केंद्रीकरण्याच्या योजेनेशी जोडली असल्यामुळे आपोआप दृक्‌च्यूती दोष नाहीसा होतो.

या कॅमेऱ्यातील केंद्र पतल झडपेमुळे परिणामकारी उद्‌भासन काल १/१००० सेकंदापेक्षा कमी करता येतो. पुन्हा अशा झडपेमुळे भिंगाची आदलाबदल सुलभ रितीने करणे शक्य होते. तथापी द्रुतगतीने कार्य करणाऱ्या अशा झडपामुळे सर्व पगकारच्या स्फुरप्रकाशयोंजनांशी त्यांचे समकालीनत्व साधता येत नाही.

स्टॅंड किंवा व्ह्यू कॅमेरा : चित्र किंवा दृश्यविषय स्थिरावस्थेत असताना प्रकाशचित्रणसाठी वापरण्यात येणरा सर्वकामी वबहुगुणी कॅमेरा. वनश्री, वास्तुशिल्प, अंतर्भाग व सर्व प्रकारच्या तांत्रिक कामासाठी याचा उपयोग करता येतो. याची काही वैशिष्ट्ये पुढे दिली आहेत. (१) जड भिंगाचा उपयोग करतांना आणि भाता पुर्ण उघडला असताना कॅमेऱ्याची पुढील व मागिल बाजू समांतर रहाव्यात म्हणून पाया अतिदृए असतो. जवळील दृश्ये घेण्यायाठी किंवा नकला करण्यासाठी किंवा मोठे केंद्रांतर असलेल्या भिंगासाठी भपूर लांग होण्यासारखा भाता असतो. साधारण भिंगाच्या केंद्रांतरापेक्षा (साधारणपणे केंद्रांतर व्यस्तचित्राच्या कर्णाएवढे असते) या भिंगाचे केंद्रांतर तिप्पट असते. (२) पुढेमागे, खालीवर, बाजूला दोन्हीकडे वगैरे सर्व प्रकारच्या हालचाली करता येतात. जड भिंगासह ही हालचाल करण्यासाठी धारक बळकट व दृढ असतात.(३) हे तिपाईवर ठेवता येतात त्यामुळे अंतरदर्शक व केंद्रकरण जोडणी ठेवलेली नसते. सुट्‌टया

फिल्म किंवा फिल्मगुंडाळी वापरात येतात. हे कॅमेरे १० X १२.५, १२.५ X १७.५ किंवा २० २५ सेंमी. या आकारात प्रचलित आहेत. ३५ मिमी. फिल्म वापरावयाचे छोटे कॅमेरेही उपलब्ध आहेत.

फिल्म किंवा फिल्मगुंडाळी वारात येतात. हे कॅमेरे १०१२.५, १२.५१७.५ किंवा २०२५ सेंमी. या आकारा प्रचलित आहेत. ३५ मिमी. फिल्म वापरावयाचे छोटे कॅमेरेही उपलब्ध आहेत.

त्रिमितीय (स्टिरिओ) कॅमेरा खोलीचा आभास निर्माण करणारी त्रिमितीय प्रकाशचित्रे घेण्यासाठी या कॅमेऱ्याचा उपयोग करतात. यात दोन तंतोतंत सारखे कॅमेरे असतात व त्यातील सर्व साहित्याची भिंगे, छिद्रपटल, झडपा, दृश्यदर्शक वगैरेची परस्परांशी पुर्ण जोडणी केली असल्यामुळे, ते जणू एकाच कॅमेऱ्याप्रमाणे कामे करतात. त्यांच्यामधिल आंतर डोळयातिल अंतराएवढे म्हणजे सु. ७० मिमी. ठेवलेले असते. कॅमेऱ्याने काढलेल्या दोन्ही प्रतिमा स्थानांवर भेद सोडल्यास अगदी सारख्या असतात. म्हणून दोन्ही कॅमेऱ्याची भिंगे समान केंद्रांरांची व समांतर प्रकाशीय अक्षाची असतात. समान उद्‌भासन करुन एकाच वेळी झडपा उघडून एकाच वेळी बंद हाकतात. अमेरिकेत तयार झालेल्या त्रिमितीय कॅमेऱ्यात ३५ मिमी. फिल्म वापरतात व प्रतिमेचे आकार २४ मिमी. उंच व २३ मिमी. रुंद असातत.

आ. ४२. त्रिमितीय चित्रण : (१) कॅमेर्‍याची पहिली स्थिती, (२) दुसरी स्थिती.

एका सर्वसाधारण कॅमेऱ्याने, साध्या पेटीच्या कॅमेऱ्यानेसुद्धा, त्रिमितीय व्यस्त चित्रे करता येतात. ३१८१ मिमी. पेक्षा ही व्यस्तचित्रे लहान असलेली सोईची असतात. हातात  मोठया दृश्यकातून पहावयाचे झाल्यास त्या आकार ६५ मिमी. ठेवल्यास दृश्य चांगले दिसते. साधा कॅमेरा धरुनही त्रिमितीय प्रकाशचित्रण करता येते. आ. ४२ मध्ये साधा कॅमेरा त्रिमितीय चित्रण कसे करतो हे दाखविले आहे. वरील पद्‌धतीत चित्रे एकामागून एक घेतली जातात. दुसऱ्या पद्‌धतीत एकाच कॅमेऱ्यातून चित्रे एकाच वेळी घेता येतात. यात प्रकाश शलाका भेदानारे व वरील भागावरच परावर्तन होणऱ्या सपाट आरशांच्या दोन जोडया .(किंवा तशीच क्रिया करणारे लोलक वापरुनही) कॅमेऱ्याच्या पुढील भिंगास अशा त-हेने जोडलेल्या असतात की, फिल्मच्या दोन अध्याग् भागा्रवर त्यांच्या प्रतिमा पडतील. परार्वनाने प्रकाश कमी झालेला असल्यामुळे उद्‌भासन काल मात्र ५० ते १०० टक्के जास्त ठेवावा लागतो (आ.४३).

आ. ४३. प्रकाश शलाका भेदन : (१) आरसा, (२) लोलक, (३) फिल्म.

पोलरॉइड लॅंड कॅमेरा : थोडक्या आवधीत सर्व प्रक्रिया केलेले प्रकाशचित्र मिळणाऱ्या एका स्थिर कॅमेऱ्याचे व्यापारी नांव ह्या कॅमेऱ्यात विसनणक्रम (एकमेकांत आपोआप अमसळून पुढे जाणारी) प्रक्रिया वापरुन दहा सेकंदांत प्रकाशचित्र मिळते. रंगित चित्र एक मिनीटात मिळते. हा कॅमेरा बाजारात प्रथम १९४८ साली आला तेंव्हा तपकिरी रंगाची चित्रे एक मिनिटात मिळतील अशी त्यात व्यवस्था होती. पण नंतरच्या सुधारीत कॅमेऱ्यात तीव र लिहील्याप्रमाणे दहा सेकंदात मिळू लागली. या कॅमेऱ्याने काळया-पांढऱ्या पारदर्शक फिल्म, काळी-पांढरी व्यक्तीचित्रे व रंगीत चित्रेही मिळू लागली आहेत.

या कॅमेऱ्याचा साटा झडप, केंद्रीकरण आणि इतर क्रिया सर्वसामाण्य घडीच्या कॅमेऱ्यासारख्याच असतात, फक्त मागिल बाजूस दोन गुंडाळया असून त्यापैकी एकीवर समचित्र छापण्याची प्रक्रिया करता येण्यासाठी व्यवस्था असते. च्क्तिचित्र, फिल्म किंवा समचित्राचा कागद दिवसा उजेडी घलता येतो. फिल्म भिंगासमोर ठेऊन पहिले उद्‌भासन करता येते. उद्‌भासनानंतर फिल्म भिंगासमोर ठेवतांना एका कागदाचे टोक कॅमेऱ्याबाहेर आलेले असते, ते ओढून उदृभासीत फिल्म मागे खेचली जाते ० तिचा समचित्राच्या कागदाशी दाबाखली संपर्क घडवून आणला जातो. दाबामुळे विकाशन (प्रतिता कायम करणाऱ्या) द्रव्याची गुटळी फुटून ते द्रव्य दोन्हीवर सारख्या प्रमाणत पसरले जाते. नंतर विसरण प्रक्रिया सुरु होऊन व्यस्तचित्राचे विकाशन होऊन वापरात न आणलेल्या सिल्व्हराच्या विसरणामुळे असंवेदनशिल कागदावर समचित्र तयार होते. नंतर कॅमेऱ्याच्या मागिल बाजूस पुढील प्रक्रिया घडून योग्य वेळी मागील बाजू उघडून समचित्र मिळते.

अशा कॅमेऱ्याच्या दुसऱ्या प्रकारात व्यस्तचित्र व समचित्र कागदाचे योग्य आकाराचे तुकडे धारकात ठेवलेले असतात. उद्‌भासनानंतर एका खटक्याच्या साहाय्याने व्यस्तचित्र आणि त्यच्या जोडीचा समचित्र कागद दाब दंडगोलामध्ये येऊन तेथे विकाशन रसायन पसरले जाऊन थेट कॅमेऱ्याच्या बाहेर पडतात. बाहेर इतर प्रक्रिया होऊन योग्य वेळी दोन्ही एकमेकांपासून वेगळी करण्यात येतात.

नविन लॅंड कॅमेरा : अमेरिकेतील पोलरॉइड कॉर्पोरेशनने एक नविन प्रकारचा कॅमेरा व नवीन प्रकारची फिल्म शोधून काढली असल्याचे त्या कार्पोरेशनचे संस्थापक आणि अध्यक्ष लॅंड यांनी जाहीर केले आहे.

हा कॅमेरा अत्यंत सुटसुटीत व स्वंयचलित असून याने अनेक रंगीत चित्रे, जितक्या वेगाने प्रकाशचित्रकार त्यातील दाब-गुंडी दाबू शकेल, तितक्या वेगाने घेता येतात.

या नवीन कॅमेऱ्याचे वनज सु. ७४० ग्रॅ. आहे. यात चार घटक असलेले भिंग असून त्याने २५ सेंमी. अंतरापासून ते अनंत अंरापर्यंत असलेल्या वस्तुविषयाचे केंद्रकरण करता येते. हे करीत असताना भिंगातील पुढील घटकाचे केवळ ६ मिमी. अंतरा मधून स्थानांतर करावे लागते. वस्तुविषयापासून निघालेले प्रकाशकिरण भिंगात शिरुन त्यांना ४५ चा कोन केलेल्या सपाट आरशावर ते पडतात व फ्रेनल जालकातून डोळयावर पडतात. वस्तुविषय स्पस्ट दिसण्यासाठी केंद्रकरण करतात. झडप उघडल्याबरोबर आरसा बाजूला होऊन प्रकाश फिल्मवर पडतो.

आ. ४४. (अ) पोलरॉइड लँड कॅमेरा : (१) भिंग, (२) भाता, (३) फिल्मची गुंडाळी.

या कॅमेऱ्यातील सर्व प्रक्रिया, समाकलित इलेक्ट्रॉनीय मंडलातर्फे (एकाच अर्धसंवाहक स्फटिकाच्या आत व पृष्टावर तयार केलेल्या सूक्ष्म इलेक्ट्रॉनीय मंडलातर्फे,– सुक्ष्मीकरण, इलेक्ट्रॉनीय मंडलाचे) नियंत्रित केले जाते. मंडलातर्फेच उद्‌भासनाच्या वेळी भिंगातून किती प्रमाणात प्रकाश सोडावा आणि झडपही केव्हा बंद करावी ह्या गोष्टी ठरविल्या जातात. नंतर एस लहान विद्युत चलित्र (मोटार) चालू होते व दंडगोलांच्या जोडीमधून उद्‌भासीत फिल्म कॅमेऱ्याच्या बाहेर ढकलली जाते. नवीन प्रकारची, एकेकात पाच स्फुर दिवे असणारी, योजना वापरात आण्ली तर इलेक्ट्रॉनीय साहाय्याने एकामागून एक असे ते दिवे लागले जातात त्यातील एखदा दिवा निकामी असल्यास, आपोआप त्याच्या पुढला दिवा लागला जातो. या दिव्यांना लागणारा विद्युत शक्तीचा पुरवठा प्रतेक दहा फिल्म असलेल्या गुंडळीत मोठया अभिनव पद्धतीने अंतर्भूत केलेला असतो. त्यमंळे प्रकाशचित्रकाराला ह्या विद्युत शक्तीच्या पुरवठयासंबंधी कसलीच काळजी करण्याचे कारण पडत नाही जरुर पडलद तर १५ सेकंदाच्या आत दहा फिल्म असलेली गुंडाळी उद्भासित करता येते.

नवीन प्रकारच्या फिल्मचे विकाशन पुर्वीच्या पद्धतीप्रमाणेच होते म्हणजे दंडगोलातून उद्‌भासित फिल्म जाताना विकाशक रासायनिक द्रव्यांच्या गुटळ्या फुटल्या जातात व अगदी तंतोतंत प्रमाणात गुटळयातील द्रव्ये व्यस्तचित्र आणि ग्राहीस्तरावर एकसारखी पसरली जातात. ही नवीन फिल्म पुर्वीसारखी नसून संकलित प्रकारची आहे. यात ग्राहीस्तर व्यस्तचित्रालाच जोडलेला असून तो पारदर्शक असतो. फिल्मचे विकाशन होऊन ती बाहेर पडल्यावर अगदी कोरडी असते इतकेच नव्हे तर तिच्यावर बाहेरील बाष्पाचा परिनाम होत नाही व ओरखडाही पडला जात नाही.

आ. ४४. (आ) कॅमेर्‍यातील प्रक्रिया : (१) फिल्मचे उद्भासन, (२) फिल्म प्रक्रिया गुठळीपर्यंत जाते, (३) गुठळी फुटून प्रक्रिया होते, (४) विकाशन व छपाई.

नवीन प्रकारच्या ह्या फिल्ममधील ग्राहीस्तरावर, तो पारदर्शक असल्यामुळे, सहज रीत्या प्रकाश पडतो व पसरतो पण फिल्म व ग्राहीस्तर यामध्ये असलेल्या विकाशन द्रव्यातील एका अपारदर्शक द्रव्यामुळे प्रकाश व्यस्तचित्रावर पढू शकत नाही. हे अपारदर्शक द्रव्य अतिशय शुक्ष्म भस्मसदृश केलेले टिटॅनियम डाय-ऑक्साइड असते. तमुळे ग्राहीस्तरातून कितीही प्रखर प्रकाश गेला, तरी तो या द्रव्यामुळे व्यस्तचित्रावर पडू शकत नाही.

उद्‌भासित फिल्म कॅमेऱ्याच्या बाहेर पडत असताना सर्वसाधारणपणे हिरवट दिसते व प्रतिमाही स्पष्ट दिसत नाही. पण विकाशन चालू झाले असल्यामुळे व्यस्तचित्रामधून रंजक द्रव्य बाहेर पडून वरील अपारदर्शक द्रव्यातून जाऊन पारदर्शक ग्राहीस्तरावर पडतात व सु. एक मिनिटाच्या आतबाहेर प्रतिमा स्ष्ट दिसू लागत असल्यामुळे प्रकाशचित्रकाराला इच्छितत चित्र घेतल्याची खात्री पटते. पुढील दोन-तीन मिनिटांत रंग तीव्र होत जातात व चित्र पुर्ण होते.

या नवीन रंगीत फिल्ममध्ये नवीन धर्तीची रंजकद्रव्य वापरण्यात आली आहेत. त्यामुळे मिळणारी प्रतिमा पुर्वीच्या रंगीत फिल्मच्या मानाने अतिशय चमकदार असते. शिवाय, व्यस्तचित्र व ग्राहीस्तर यामध्ये असलेल्या टिटॅनियम डाय-ऑक्साइडमुळे आपाती प्रकाश परावर्तीत होतोआणि त्यामुळे मागच्या बाजूने चित्रे प्रकाशित केली असावीत असे वाटते.

हवाई (एरिअल) कॅमेरा : विमानातून खली प्रदेशाची पहाणी करण्यासाठी वापरण्यात येणारा कॅमेरा. ही पाहणी अनेक प्रकारची असते. उदा., प्रदेशाचे नकाशे काढण्यासाठी, खनिज संपतीचा शोध घेण्यासाठी किंवा युद्धात शत्रुप्रदेशाची टेहहणी करण्यासाठी वगैरे.

आ. ४५. (अ) हवाई कॅमेरा (बाहेरील भाग).

सर्वेक्षण (जमिनीचे मोजमाप घेणारे) कॅमेरे रचनेत अतिशय बळकट असतात व ते साधारण पाच ते सात किमी. उंचीवरुन प्रकाश्सचित्रण करतात. ह्या कॅमेऱ्यात कमी जास्त लांब होणारे भात्यासारखे आवरण नसून धातूच्या पष्याचे शंकाकार असे पक्के आवरण असते. आवरणाच्या निमुळत्या बाजूस ठराविक केंदांतराचे भिंग बसविलेले असते. यात फिल्म गुंडाळी वापरली जाते. मात्र ती आगदी एका प्रतलातच राहील अशी दक्षता ध्यावी लागते. कॅमेऱ्यातील इतर क्रिया विद्युत नियंत्रणाने आपोआप होण्याची योजना मिळते. विमानातून केलेल्या अशा सर्वेक्षणातून खालील प्रदेशात असलेल्या वस्तूंतील कोण मोजण्याचा हेतू असल्यामुळे भिंग व फिल्म यामध्ये सापेक्ष हालचाली आजिबात होणार नाहीत अशी दृढ रचना असते. कॅमेरा उदग्र स्थितीतच ठेवलेला असतो. सर्वेक्षण भिंगात विकृती अगदी उपक्षेणीय असते. प्रदेशातील कोणत्याही वस्तु-बिंदूच्या प्रतिमेतील अंतरात सैध्दांतिक दृष्टया येणाऱ्या अंतरापेक्षा १/१०० मिमी. इतकेच स्थलांतर होते.

फिल्म चौकटीचा आकार २३२३ किंवा १८१८ सेंमी. असतो. त्या आकारासाठी वापरात असणाऱ्या भिंगाची केंद्रांतरे अनुक्रमे १५ ते ३० सेंमी. व ११.५ सेंमी. ते २१ सेंमी. एवढी असतात.

आ. ४५. (आ) हवाई कॅमेरा (अंतर्रचना) : (१) फिल्म घेणारे दंतचक्र, (२) गणक योजना, (३) फिल्म देणारे दंतचक्र, (४) प्रतियोजक भुजा, (५) झडप योजना पेटी, (६) झडप वेग नियंत्रक, (७) विद्युत् मंडल पूरक गुडदी, (८) किरण विचालक पडदे, (९) भिंग, (१०) कनीनिका छिद्रपटल.

टेहळणी करताना जमिनीपासून थोडया अंतरावरुन ते भरपूर उंचीवरुन विमानांना बऱ्याच वेगाने जावे लागते. कॅमेरा उदग्र किंवा तिरप्या स्थितीत ठेवलेला असतो. यामुंन मिळालेल्या प्रकाशचित्रांच्या सहाय्याने तयार केलेले नकाशे किंवा मापन अचूक होत नाही.

पाण्याखालील कॅमेरा : पाण्याखालील प्रकाशचित्रणासाठी खास असे कॅमेरे नाहीत. वर वर्णन केलेले सुटसुटीत व छोटया आकारांचे कॅमेरेच ज्यात पाणी शिरणार नाही व पाण्याचा दाब सहन करतील अशा अतिदृढ आवरणात ठेवावे लागतात. उथळ व स्थिर पाण्यात काचेच्या बंदिस्त पेटीत कॅमेरे ठेवून व कॅमेऱ्याची इतर क्रिया विद्युत प्रयुक्तीने घउवून एकोनिसाव्या शतकातही पाण्याखाली प्रकाशचित्रण करण्यात आले होते. ल्वी बूतॉं यांनी १८९३ मध्ये पाणबुडी जहाजातून प्रकाशचित्रण केले होते. प्रशिक्षी पाणबुडयांनाही त्यांच्या पाठीवर योग्य प्रमाणात हवेच्या पुरवठयाची सोय केल्यास प्रकाशचित्रण करता येते. पाण्याखालील प्रकाशचित्रणात आता बरीच सुधारण झाली असून वैशिष्ट्यपुर्ण रीतीने स्फुरप्रकाश योजना व कॅमेऱ्याच्या इतर क्रिया बंदिस्त करुन ठेवलेल्या पेटीत करता येतात. अशा पेट्या समुद्रकाठच्या कांही गावात मिळण्याची सोय झालेली आहे.

अशा पेटीवर पाण्याचा किती दाब पडतो याची कल्पना पुढील उदाहरणावरुन येईल.  पेटीच्या १२ सेंमी. लांब असलेल्या बाजूवर ३ मिमी. खोल पाण्यात ५०-५१ किग्रॅ. वजनाइतकी प्ररणा असते.जसजसे खाली जावे तसतसा पाण्याचा दाब वाढत जातो. पाण्याच्या दाबाच्या जवळजवळ दुप्पट दाब सु. ११ मी. खोलीच्या पाण्यात असतो. पाण्याच्या दाबाची समस्या दोन-तीन प्रकारे सोडवता आली तरी `सदृढ दाबरोधक’ प्रकार चांगल्यापैकी काम देतो. धातूच्या जाड पष्याच्या किंवा पारदर्शक अशा प्लॅस्टीक पष्याच्या आत कॅमेरा बंदिस्त ठेवलेला असतो.

आ. ४६. पाण्याखालील एक स्वयंपूर्ण कॅमेरा : (१) बाहेरील आवरण, (२) आतील भाग, (३) भिंग.

कॅमेऱ्याच्या निरनिराळया क्रिया नियंत्रित करण्यासाठी लागणारे खटके आणि तरफा पेटीच्या बाहेर ठेवून त्यांची जोडणी दाबरोधक युक्त्या योजून आतील कॅमेऱ्याशी केलेली असते. स्रप्रकाश पडण्याचीही काही सुधारीत बंदिस्त पेटयात व्यवस्था असते. पाण्यात असलेल्या वस्तुविषयाकडून परावर्तीत झालेल्या प्रकाशास भिंगावर पडण्यापुर्वी पाण्यातून व नंतर कॅमेऱ्याच्या पेटीतील हवेतून जावे लागते. पाणी व हवा आशा दोन माध्यमांतून प्रकाशास जावे लागत असल्यामुळे केंद्रीकरणात `प्रणमनांक त्रुटी’ निर्माण होते. या त्रुटीचा परिणाम भिंगाचे केंद्रांतर वाढविण्याकडे होतो. उदा., भिंगाचे केंद्रीकरण जर ३ मी. वर झाले असेल, तर वरील प्रणमनांक त्रुटीमुळे केंद्रीकरण ४ मी. वर झाल्यासारखे होते.म्हणून ३ मी. वर असलेल्या पाण्यातील वस्तुविषयाचे केंद्रीकरण ३३/४ त्र २.२५ मी. वरच करावे लागते. अशा कॅमे-यांना काही जादा भिंगाची जोडणी केलेली असते. त्यामुळे केंद्रीकरण नेहमीच्या पद्धतीने करता येते.

अशा चित्रणासाठी जितका लहान कॅमेरा तितका चांगला. पाण्याखाली जसजसे जावे तसतसे सुर्यप्रकाशातील निरनिराळे रंग पाण्यात शोषले जातात. ३३ मी. खोलीवर सगळेच रंग शोषले जाऊन फिका निळा करडा रंग तेवढाच उरतो. पण अशा खोल ठिकठिकाणी इलेक्ट्रॉनीय पद्धतीने किंवा इतर यांत्रिक रित्या प्रकाश निर्माण करुन सर्व रंग मिळतात व रंगीत प्रकाशचित्रणही करता येते.

चलच्चित्रपट कॅमेरा : या कॅमेऱ्याने ८, १६ किंवा ३५ मिमी. फिल्मवर चल वस्तुविषय टिपता येतात. ८ किंवा १६ मिमी. चा कॅमेरा सुटसुटीत व सुबाह्य असून तसाने नवशिक्यांनाही घरातील वा बाहेरील चल दृश्यांचे चित्रण करता येते. हाताने गुंडाळता येणाऱ्या स्ंप्रगवर चालणाऱ्या चलित्राने अशा कॅमेऱ्यात फिल्म साठयातून फिल्म चित्र घेण्याच्या जागी येते. नंतर केंद्रीत केलेल्या वस्तुविषयांकडून आलेला प्रकाश भिंगात शिरुन तो फिरत असणाऱ्या छिद्रपटलातून जाऊन एकामागून एक जाणऱ्या फिल्मच्या चौकटीवर पडतो व चित्रे घेतली जाण्याची क्रिया सतत होत रहाते. बाहेरील दाब-गुंडी मोकळी सोडल्यावर ही क्रिया थंबते.

आ. ४७. ८ किंवा १६ मिमी. चलच्चित्रपट कॅमेरा.

अशा रितीने या कॅमेऱ्यात दर सेकंदास ८, १६ किंवा २४ फिल्म-चौकटी उद्‌भासित करता येतात. चित्रपट धंद्यात सामान्यतः ३५ मिमी. चा कॅमेरा वापरतात. हा कॅमेरा अत्यंत प्रगत व अचूक असून त्यातील फिल्मचा साठा कफमेऱ्याच्या डोक्यावर किंवा बाजूस असतो. त्यातील फिल्म विद्युत चलित्राने पुढे सरकवली जाते. या कॅमेऱ्याचया सहाय्याने जवळची, मध्यम अंतरावरील व दरुची दृश्ये टिपता येतात व त्याकरीता मित्र प्रकारची भिंगे ज३रीप्रमाणे जोडता येतात. (→ चलचित्रपट तंत्र)

आ. ४८. ३५ मिमी. चलच्चित्रपट कॅमेरा

दूरचित्रवाणी कूमेराः या कॅमेऱ्याच्या मुलभूत तत्वावरच कार्य करणारा पण फिल्मवर चित्र टिपण्याऐवजी दृश्याची प्रतिमा एका अतिसंवेदनशिल इलेक्ट्रॉनीय पडदयावर क्षेपित होते. इलेक्ट्रॉनीय पडदयापासून पगतिमेचे स्ंपदांत रुपांतर केले जाऊन ते दूरचित्रवाणी ग्राहीस (स्पंद ग्रहण करणाऱ्या यंत्रसंचास)देण्यात येते [→दूरचित्रवाणी ]

आ. ४९. दूरचित्रवाणी कॅमेरा

द्रुतगती कॅमेराः भौतिकी, रसायनशास्त्र, जीवविज्ञान इ. विज्ञानाच्या विविध शाखात तसेच धातुविज्ञान, वैमानिकी इ. तंत्रात द्रुतगतिप्रकाशवित्रणाचा फार मोठा उपयोग आहे. दु्रतगतीने धेतलेल्या गतिमान दृश्याचे उदा., धावता घोडा, बंदुकीतून वेगाने सुटलेली गोळी वगैरेंचे प्रकाशचित्रण केल्यावर त्या चिंत्राचे मंद गतीने निरीक्षण करुन त्यांचा अभ्यास करता येतो.

एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात निरनिराळया युक्त्या योजून निरनिराळया गतिमान दृश्याचे प्रकाशचित्रण करण्यात आले होते. प्रखर प्रकाश व सूक्ष्म कालावधीतून उद्‌भासन केल्यास असे चित्रण हल्लीच्या कॅमेऱ्याने चांगल्या प्रकारे करता येते.

सध्याच्या कॅमेऱ्यातील यांत्रिक झडपेचा कालखंड एक मिलिसेंकदापेक्षा कमी करता येत नसल्यामुळे फॅराडे परिणाम(ध्रुवित प्रकाशाचे प्रतल चुंबकीय क्षेत्राच्या परिणामाने वळविले जाणे)किंवा कर परिणाम (काही विशिष्ट विद्युत अपार्य द्रवांना विद्युत दाब लावला असता त्या द्रवांतून जाणाऱ्या ध्रुवित प्रकाशाचे प्रतल वळविले जाणे)याचा उपयोग करुन एक मिलिसेंकदापेक्षा अनेक पटींनी लहान कालखंडात उद्‌भासन करणे शक्य झााले आहे. एकात स्तब्ध व स्थिरप्रखर प्रकाश वापरण्यात येतो तर दुसऱ्यात क्षणिक स्फुरप्रकाश वापरतात.

अमेरिकेतील बेल प्रयोगशाळेतर्फे तयार करण्यात आलेल्या एका द्रुतगती कॅमेऱ्यात झडप म्हणून दोन समाक्ष(समान अक्ष असलेले) दंडगोल वापरलेले असतात. बाहेरील दंडगोलाचा पाच आणि आतील दंडगोलाचा चार फटी असून दोन्ही दंडगोल एकाच दिशेने फिरत असतात. बाहेरील दंडगोल एका सेंकदात २४ वेळा तर त्याच्या आतील दुसरा तेवढयाच वेळात ३० वेळा फिरतो. प्रतिमा सरकल्यास काचेने ती भरुन काढता येते. अग्निबाणाच्या पहिल्या टप्प्यातील उड्‌डाणाचे चित्रण या कॅमेऱ्याने करण्यात आले आहे.

परावर्तित प्रकाश पद्धतीत स्फुल्लिंग प्रकाश किंवा एक प्रकारचा वायुभरित विद्युत विसर्जक दिवा वापरतात. साध्या कॅमेऱ्यातूनही असे चित्रण करता येते व उद्‌भासन काल ०.५ लक्षांश सेंकद इतका सूक्ष्म मिळू शकतो. एफ ई. टटल यांनी तयार केलेल्या कॅमेऱ्यात एका सेंकदात दहा लाख चित्रे काढता येतात.

खास प्रकारचे कॅमेरेः प्रकाशचित्रणाच्या खास उपयोगांनुसार विशिष्ट प्रकारचे कॅमेरे तयार करण्यात आलेले आहेत.

सूक्ष्म प्रकाशचित्रणासाठी नेहमीचाच कॅमेरा उदग्र बैठकीसह किंवा क्षितिज समांतर बैठकीसह वापरण्यात येतो. सूक्ष्मदर्शक, गाळण्या प्रकाश उदगम आणि केंद्रीकरण योग्य प्रकारे करण्यासाठी जोडलेले खास साहित्य यांच्या सहाय्याने या कॅमेऱ्याव्दारे सूक्ष्म प्रकाशचित्रण करण्यात येते.

रंगीत प्रकाशचित्रणासाठी तीन प्राथमिक रंगाचे अलगीकरण करण्यासाठी तीन गाळण्यांचा उपयोग करणारा कॅमेरा प्रथम तयार करण्यात आला होता. अशा प्रकारच्या सर्वात साध्या कॅमेऱ्यात व्यस्तचित्र तयार करण्यासाठी तीन निरनिराळया गाळण्या वापरुन तीन वेळा उद्‌भासन करावे लागते. नंतर एकाच उद्‌भासन करावे लागते.

नंतर एकाच उद्‌भासनात तिन्ही व्यस्तचित्रे तयार करणारे कॅमेरे तयार करण्यात आले. तथापि आता एकाच व्यस्तचित्राची आवश्यकता असणारे कॅमेरे प्रचारात आले आहेत.

मुद्रणासाठी प्रकाशचित्रणाने प्रत तयार करण्याकरिता लागणारे कॅमेरे बरेच मोठे व गुंतागुंतीचे असतात. त्यांत कोरडया काचा किंवा ओल्या कलोडियन काचा वापरतात. मोठया केंद्रातंराची भिंगे व प्रकाश गाळण्या बदलण्याची सोय यात असते. नकाशा, चित्रे वगैंरेच्या प्रती तयार करताना विकृती निर्माण होऊ नये याकरिता कंपने किंमान ठेवण्याची व्यवस्था केलेली असते.

महत्त्वाच्या कागदपत्रांच्या नकला तयार करण्यासाठी सूक्ष्म प्रकाशचित्रणाचा उपयोग करतात. याकरिता सामान्यतः ३५ मिमी. चा मिनिएचर कॅमेरा वापरतात, पंरतु विविध आकांराच्या व प्रकारच्या प्रतींची जरुरी असल्यास अधिक गुंतागुंतीचे कॅमेरो वापरावे लागतात. रेकार्डर नावाचा कॅमेरा प्रथम बॅंकेतील चेकच्या १६ मिमी. आकाराच्या नकला करण्यासाठी तयार करण्यात आला, तथापि तो आता १६ ते ३५ मिमी या दोन्ही आकारांत व्यावसायिक कागदपत्रे, वर्तमानपत्रे, आरेख इत्यादींच्या नकला काढण्यासाठीही वापरण्यात येतो.

नकला काढण्यासाठी व्यस्तचित्र न वापरता सरळ कागदावरच छपाई करता येते. अशा प्रकारची अनेक स्वयंचलित यंत्रे बाजारात उपलब्ध असून नाणी टाकून सरळ समचित्र कागदावर नकला तयार करुन देणारे स्वंयचलित कॅमेरेही प्रचलित आहेत.

लष्करात तोफांचे शिक्षण देण्यासाठी, पाणबुडीतील उडविलेल्या पाणतीरांचे(टॉर्पेडोंचे)निरीक्षण करण्यासाठी, क्षेपणास्त्रे व कृत्रिम उपग्रह यांच्या मार्ग निरीक्षणाकरिता, बोटांच्या ठशांचे प्रकाशचित्रण करण्यासाठी, विमानातील उपकरण फलकाचे अदृश्य किरंणाच्या साहाय्याने निरीक्षण करण्यासाठी, दुर्बिणीच्या साहाय्याने खस्थ गोलांचे चित्रण करण्यासाठी इ. अनेक कामांकरिता विविध प्रकारचे कॅमेरे तयार करण्यात आलेले आहेत.

पहाः चलच्चित्रपट तंत्र; छायाचित्रण; दूरचित्रवाणी; भिंग.

संदर्भ : 1. Emanuel, W.D.; Andrew, M. Cameras : The Facts, New York, 1963.

2. Gernsheim, H.; Gernsheim, A. A.Concise History ofPhotography, London, 1965.

3. Lockett, A. Camera Lenses, New York, 1962.

4. Neblette, C. B. Photography, Its Materials and Processes, Bombay, 1962.

5. Partridge, E. C. Begineer’s Guide to Photography, London, 1962.

६. बेहेरे, श्री.ना. फोटोग्राफी, नागपूर, १९६५.

७. मालाणी, मोहनलाल; गोखले, आण्णा, फोटोग्राफीचा मार्गदर्शक, पुणे, १९६६.

 

टोळे, मा.ग.