जलपैगुरी : पश्चिम बंगाल राज्यातील याच नावाच्या जिल्ह्याचे प्रमुख ठिकाण. लोकसंख्या ५५,१५९ (१९७१). तिस्ता नदीच्या उजव्या काठावर हे वसले असून रस्ते आणि रेल्वे यांनी दार्जिलिंग, सिलीगुडी व सैदपूर (बांगला देश) यांच्याशी जोडलेले आहे. आसपासच्या प्रदेशातील अन्नधान्याची ही प्रमुख बाजारपेठ असून तागाचे गठ्ठे बांधणे, काड्यापेट्या तयार करणे व लाकडी फळ्या कापणे हे प्रमुख उद्योग येथे चालतात. येथे रेल्वे कर्मशाळा आहेत.

दाते, सु. प्र.