गाणगापूर : कर्नाटक राज्याच्या गुलबर्गा जिल्ह्यातील दत्तसंप्रदावाचे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र. हे पुणे-रायचूर लोहमांर्गावरील गाणगापूर स्थानकापासून २३ किमी. दक्षिणेस भीमा-अमरजेच्या संगमावर वसले अTहे. ख्यातनाम दत्तसंप्रदायी श्रीनरसिंहसरस्वती यांच्या वास्तव्याने (सु. १४३५—सु. १४५८) गाणगापूरला महत्त्व आले. येथे त्यांच्या निर्गुण पादुकांचे मंदिर असून इतर अनेक देवालये, मठ व तीर्थे आहेत. दत्तजयंती व श्रीनरसिंहसरस्वतींची पुण्यतिथी हे दोन उत्सव येथे विशेषत्वाने साजरे केले जातात.

गाणगापूर दत्तमंदिर

कापडी, सुलभा