चिंगोला : आफ्रिकेतील झँबियाच्या वेस्टर्न प्रांतातील अचांगा तांबेखाणीजवळचे शासकीय नगर. लोकसंख्या ८२,००० (१९६७ अंदाज). तांबेखाणीजवळ वस्ती असली तरी शासकीय, शैक्षणिक, औद्योगिक, व्यापारी व मनोरंजनाच्या सोयी चिंगोलासच आहेत. १,५२७ मी. उंचीवरील येथील जंगल प्रदेशात १९४३ मध्ये वस्ती झाली आणि १९५७ मध्ये येथे नगरपालिका आली. येथून प्रमुख लोहमार्गापर्यंत फाटा गेला आहे व तांबेखाणी प्रदेशातील इतर शहरांशी चिंगोला पक्क्या सडकांनी जोडलेले आहे.

लिमये, दि. ह.