जोगजाकार्ता : इंडोनेशियाच्या जावा बेटावरील जोगजाकार्ता या विशेष स्वायत्त जिल्ह्याचे ठाणे. लोकसंख्या ३,४२,२६७ (१९७१). हे दक्षिण जावा किनाऱ्यापासून २९ किमी. आत आणि गूनुंग (मौंट) रापी (२,९१२ मी.) ज्वालामुखीपासून २८ किमी. असून इंडोनेशिया  प्रजासत्ताकाचे स्वातंत्र्य संग्रामातील शासकीय केंद्र होते. हे सांस्कृतिक आणि शैक्षणिक केंद्र असून चांदीवरील नक्षीकाम, बाटिक, सिगारेटी व कातडी वस्तू यांसाठी प्रसिद्ध आहे. गजामादा शासकीय विद्यापीठ, परपुस्तकान जजासन हाट्टा ग्रंथालय, सोनो बुदोयो संग्रहालय, कला अकादमी, इस्लाम धर्म व संस्कृती यांच्या अभ्यासाचे स्वतंत्र विद्यापीठ ही येथील प्रवासी आकर्षणे होत. येथे विमानतळ असून लोहमार्ग व सडका यांची चांगली सोय आहे.

 बाटिक कलानिर्मितीत गढलेल्या स्त्रिया, जोगजाकार्ता.

  लिमये, दि. ह.