टिटाघर : पश्चिम बंगाल राज्यातील कागदासाठी प्रसिद्ध असलेले शहर. लोकसंख्या ८८,२१८ (१९७१). हे चोवीस परगणा जिल्ह्यात, हुगळीच्या डाव्या तीरावर, कलकत्त्यापासून २१ किमी., त्याच्याशी सडकांनी आणि लोहमार्गाने जोडलेले आहे. येथे १८९५ पासून नगरपालिका आहे. पूर्वी हे यूरोपीयांच्या वस्तीचे ठिकाण व डचांचे व्यापार केंद्र होते. कागद गिरणीशिवाय येथे तागाच्या गिरण्या, काच व कापड यांच्या यंत्रांचे व चहावरील प्रक्रियेचे कारखाने आहेत.

 कागद कारखाना, टिटाघर. 

कांबळे, य. रा.