तमिळनाडू राज्याच्या तंजावर जिल्ह्यातील नागापट्टणमच्या उत्तरेला सु. २९ किमी. वर असलेले बंदर. लोकसंख्या १७,३१८ (१९७१). यूरोपियन लोकांचा ठसा अजूनही कायम असणाऱ्या भारतीय शहरांपैकी हे एक शहर आहे. येथे प्रथम १६२० च्या सुमारास डॅनिश वखार स्थापन झाली. त्यांचा प्रभाव सु. १८४५ पर्यंत होता. १८४५ मध्ये हा भाग ब्रिटिशांनी विकत घेतला. १७०६ मध्ये या ठिकाणी प्रॉटेस्टंट मिशनऱ्यांची पहिली वसाहत झाली. डचांच्या काळात त्रांकेबार हे भरभराटीस आलेले बंदर होते; परंतु नंतर नागापट्टणम अंतर्गत भागाशी रेल्वेने जोडले गेले. त्यामुळे साहजिकच त्रांकेबारचे महत्त्व कमी झाले. या शहरात अनेक जुनी प्रेक्षणीय चर्च पहावयास मिळतात.

फडके, वि. शं.