समॅरियम : विरल मृत्तिका धातू. रासायनिक चिन्ह Sm. आवर्त सारणी ( इलेक्ट्नॉन रचनेनुसार केलेल्या मूलद्रव्यांच्या कोष्टकरूप मांडणीतील ) गट ३ ब मधील लँथॅनाइड श्रेणीतील संकमणी मूलद्रव्य. रूपेरी पांढरी धातू अणुक्रमांक ६२ अणुभार १५०·३५ वितळबिंदू १,०७२० से. उकळबिंदू १,७७८०से. विशिष्ट गुरूत्व ७·५३७ (२५०से.ला ) संयुजा २ व ३ विद्युत् विन्यास २,८,१८,२४,८,२. पृथ्वीच्या कवचातील प्रमाण ७१०-५ %. नैसर्गिक रीत्या आढळणारे समॅरियमाचे सात समस्थानिक ( अणुक्रमांक तोच पण अणुभार भिन्न असलेल्या त्याच मूलद्रव्याचे प्रकार ) पुढीलप्रमाणे आहेत : Sm144 (३.०९%), Sm147 (१४·९७%), Sm148 (११·२४%), Sm149 (१३·८३%), Sm150 (७·४४%), Sm152 (२६·७२%) आणि Sm154(२२·७१%). यांपैकी १४७, १४८ व १४९ अणुभार असलेले समस्थानिक किरणोत्सर्गी (भेदक कण वा किरण बाहेर टाकणारे ) असून ते आल्फा कण उत्सर्जित करतात. त्यांचे अर्धायुकाल अनुकमे १·०६१०११ वर्षे, १·२१०१३ वर्षे आणि ४१०१४ वर्षे आहेत. एम्. फोन समर्स्की या रशियन शास्त्रज्ञांच्या सन्मानार्थ याला ‘समॅरियम’ हे नाव देण्यात आले.
पॉल एमील लकॉक द ब्वाबोद्राँ यांनी १८७९ मध्ये समॅरियम अशुद्ध ऑक्साइड स्वरूपात विलग केले आणि वर्णपटविज्ञानाच्या साहाय्याने नवीन मूलद्रव्याचा शोध लावला. ई. ए. दमार्से यांनी १९०१ मध्ये ते अतिशुद्ध संयुग स्वरूपात मिळविले. समॅरियम इतर विरल मृत्तिकांच्या खनिजांत आढळते परंतु मोनॅझाइटाचे निष्कर्षण करून त्याचे व्यापारी उत्पादन करतात. युरेनियम, थोरियम व प्लुटोनियम यांच्या अणुकेंद्रीय व्दिभंजन उत्पादांमध्येसुद्धा समॅरियम आढळते.
आयन विनिमय तंत्राचा वापर करून त्रिसंयुजी स्वरूपातील समॅरिय-माचे इतर विरल मृत्तिकांपासून विलगीकरण करतात. लँथॅनम धातूबरोबर समॅरियम आक्साइडाचे (Sm2O3) ऊष्मीय ⇨क्षपण व ऊर्ध्वपातन करून समॅरियम धातू तयार करतात. तिची बहुरूपे आढळतात कोठी तापमानाला तिची समांतर षट्फलकीय संरचना असते.
समॅरियमाला इतर पुष्कळशा विरल मृत्तिकांपेक्षा निराळी +२ ऑक्सिडी-करण अवस्थासुद्धा असते. समॅरियम लवणाचे कॅल्शियम किंवा अल्कली धातूबरोबर किंवा सोडियम पारदमेलाबरोबर क्षपण करून किंवा त्रिसंयुजी हॅलाइडे तापवून व्दिसंयुजी धातू मिळते. Sm2+ आयन प्रबल क्षपणकारक आहे तो जलदपणे ऑक्सिजन, पाणी किंवा हायड्नोजन आयन यांच्याशी विक्रिया करतो. अवक्षेपणाने अविद्राव्य सल्फेट (SmSO4) तयार होते. SmCO3 , SmBr2 , SmCl2 आणि Sm(OH)2 ही समॅरियमाची लवणे लालसर-तपकिरी असतात.
समॅरियमाच्या एका समस्थानिकाचा ऊष्मीय न्यूट्नॉनांच्या गासाकरिता उच्च् शोषण काटच्छेद असल्यामुळे त्याचा उपयोग अणुकेंद्रीय विकियकां-तील ( अणुभट्टीतील ) नियंत्रक दंडांमध्ये आणि न्यूट्नॉन ढालक्षेत्राकरिता होतो. विशिष्ट कार्बनी विकियांमध्ये समॅरियमाचा उत्प्रेरक ( प्रत्यक्ष विकियेत भाग न घेता तिची गती बदलणारा पदार्थ ) म्हणून उपयोग होतो. मृत्तिका व इलेक्ट्नॉनिकी उदयोगांमध्येही त्याचा उपयोग होतो. अवरक्त-संवेदनक्षम फॉस्फॉर पदार्थांकरिता समॅरियम लवणांचा वापर करतात.
पहा : विरल मृत्तिका संकमणी मूलद्रव्ये.
ठाकूर, अ. ना.