स्टाइन, विल्यम हॉवर्ड : (२५ जून १९११ — २ फेब्रुवारी १९८०). अमेरिकन जीवरसायनशास्त्रज्ञ. प्रथिनांच्या रेणवीय संरचने-विषयी केलेल्या महत्त्वपूर्ण संशोधनाबद्दल आणि रिबोन्यूक्लिएज या अग्निपिंडातील ⇨ एंझाइमा चे संघटन व कार्य यांविषयी केलेल्या अध्ययनाबद्दल १९७२ सालचे रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक स्टाइन व ⇨ स्टॅनफर्ड मुर यांना मिळून अर्धे आणि ⇨ क्रिस्तीआन बोहेमर आनफिन्सेन यांना अर्धे असे विभागून देण्यात आले.

विल्यम हॉवर्ड स्टाइनस्टाइन यांचा जन्म न्यूयॉर्क येथे झाला. त्यांनी हार्व्हर्ड येथून रसायनशास्त्राची पदवी (१९३३) आणि कोलंबिया कॉलेज ऑफ फिजीशियन्स अँड सर्जन्स या संस्थेची जी व र सा य न शा स्त्रा ची डॉक्टरेट पदवी (१९३३) संपादन केली. त्याचवर्षी ते रॉकफेलर इ न्स्टि ट्यू ट फॉर मेडिकल रिसर्च ( नंतरची रॉकफेलर युनिव्हर्सिटी ) या संस्थेत दाखल झाले. कालांतराने ते तेथेच १९५४ मध्ये प्राध्यापक झाले.

स्टाइन व मुर यांनी ⇨ वर्णलेखना विषयी १९४५ मध्ये संशोधन करण्यास प्रारंभ केला. प्रथिने व जैव द्रायू ( द्रव आणि वायू ) यांपासून मिळालेल्या ⇨ ॲमिनो अम्लांच्या व पेप्टाइडांच्या विश्लेषणासाठी त्यांनी वर्णलेखन तंत्राचा वापर केला. हे उपकरण पुढे सर्वत्र वापरात आले. या उपकरणाच्या साहाय्याने स्टाइन व मुर यांनी रिबोन्यूक्लिएज या एंझाइमातील ( जीवरासायनिक विक्रिया घडवून आणण्यास मदत करणार्‍या प्रथिनातील ) ॲमिनो अम्लांचा क्रम निर्धारित केला. अशा तर्‍हेची संरचना ठरविले जाणारे हे दुसरे प्रथिन, परंतु पहिलेच एंझाइम होते. स्टाइन व मुर यांनी रिबोन्यूक्लिएजमधील १२४ ॲमिनो अम्लांच्या साखळीचा उलगडा केला व तीमधील १,८७४ अणूंची स्थाने निर्धारित केली.

स्टाइन यांचे न्यूयॉर्क येथे निधन झाले.

दीक्षित, रा. ज्ञा.