रूपनारायण : भारताच्या पश्चिम बंगाल राज्यातून वाहणारी गंगा (हुगळी) नदीची उपनदी. लांबी २४० किमी. छोटा नागपूर पठाराच्या पूर्वेकडील पायथ्याच्या टेकड्यांपैकी तिलाबानी टेकडीत पुरूलिया शहराच्या ईशान्येस ही नदी उगम पावते. दुमडा गावाजवळ ती पुरूलिया जिल्हातून बांकुरा जिल्ह्यात प्रवेश करते. पुरूलिया व बांकुरा जिल्ह्यांत ती आग्नेयवाहिणी आहे. बांकुरा जिल्ह्यातील नदीची लांबी १०७ किमी. असून तेथील प्रवाह बराचसा नागमोडी आहे. वरच्या टप्प्यातील बांकुरा ते आरामबाग यांदरम्यानचा प्रवाह द्वारकेश्वर या नावाने ओळखला जातो. बांकुरा जिल्हा ओलांडून पुढे हुगळी-बरद्वान जिल्ह्यांच्या सरहद्दीवरून काही अंतर वाहत गेल्यावर ही नदी जिल्ह्यात प्रवेश करून दक्षिणेस वाहू लागते. मिदनापूर−हुगळी जिल्ह्यांच्या प्रवेश सरहद्दीवर बंदर येथे करून द्वारकेश्वरला सिलाई नदी येऊन पुढे त्यांच्या संयुक्त प्रवाह रूपनारायण नावाने ओळखला जातो. मातोडा गावाजवळ रूपनारायण नदी हावडा जिल्ह्यांच्या सरहद्दीवरूनच सु. ५६ किमी. अंतर वाहत गेल्यावर ती नदी तमलूकपासून जवळच हुगळी नदीला मिळते. रूपनारायण नदीमुळेच अलग झाला. मुखाकडे नदीप्रवांहाची रुंदी बरीच वाढत गेली असून काही ठिकाणी ती पाच किमी. पर्यंत आढळते. तेथे नदीपात्रात काही ठिकाणी बेटांचीही निर्मिती झालेली दिसते. या नदीतून भरतीच्या लाटा भक्षी खाल नदीच्या मुखापर्यंत आत येतातय त्यामुळे नदीप्रवाहात गाळ साचून जलवाहतुकीला अडथळा निर्माण होतो. मिदनापूर जिल्ह्यातील घाटाल गावापर्यंत या नदीतून तीन व चार टनी बोटी वाहतूक करू शकातात. जलसिंचनाच्या दृष्टीनेही रूपनारायण नदी महत्त्वाची आहे. मिदनापूर जिल्ह्यात नदीच्या उजव्या तीरावर ४८ किमी. लांबीचा तसेच बक्षी खाल नदीमुखापासून हुगळी नदीला मिळेपर्यंतच्या डाव्या तीरावरही संरक्षक बांध घातले आहेत. कोलाघाटजवळ (मिदनापूर जिल्हा) नदीवरून कलकत्ता−नागपूर लोहमार्ग गेलेला आहे.

चौधरी, वसंत