बौद्ध देवता : बौद्ध धर्मामध्ये जगन्नियंत्या परमेश्वराला स्थान नसले, तरी बौद्धांना देवदेवता मान्य आहेत. जुन्या पाली वाङ्मधयातदेखील देवदेवतांचा सर्वसाधारणपणे ठोकळ रीत्या उल्लेख येतो. झाडांवरील देवता, वनातील देवता ह्यांचे अस्तित्व मान्य केलेले असून त्या अनेक वेळा माणसाचे हित पाहणाऱ्या (अत्थकामिनी) म्हणून समजल्या गेलेल्या आहेत. यक्ष, गंधर्व ह्याप्रमाणेच निराळे जीवन असणारे प्राणी पुढे बौद्धांच्या विश्वरचनाकल्पनेमध्ये समाविष्ट होऊन त्यांना सुमेरू पर्वतावर निवासस्थान मिळाले आणि त्यांची विभागणी कामलोक, रूपलोक व अरूपलोक ह्या तीन ठिकाणी झाली.कामलोकात चातुर्महाराजिक, त्रयस्त्रिंशत (तावतिंस), याम, तुषित, निर्माणरती व परनिर्मितवशवर्ती ह्या सहा प्रकारचे देव आहेत. रूपलोकात निरनिराळ्या ध्यानामुळे प्राप्त होणाऱ्या चार भूमी असून त्यात वास करणारे सोळा प्रकारचे देव आहेत. ते येणेप्रमाणे आहेत : ब्रह्मपारिषद्य, ब्रह्मपुरोहित, महाब्रह्मा, परीत्ताभा, अप्रमाणाभा, आभास्वरा, परित्तशुभा, अप्रमाणशुभा, शुभकृत्स्ना, बृहत्फला, असंज्ञीसत्त्वा व शुद्धावासांच्या पोटांत येणारे अवृहा, अतप्या, सुदर्शा, सुदर्शी व अ-कनिष्ठा, अरूप वा अरूपावचरलोकात आकाशानन्त्यायतन, विज्ञानानन्त्यायतन, आर्किचन्यायतन व नैवसंज्ञा-नासंज्ञायतन ह्या चार अपूपावचर भूमीत राहणारे चार प्रकारचे देव आहेत. ह्या चार प्रकारच्या देवांना एक म्हणजे रूप नसल्याकारणाने ते अदृश्य आहेत. येथे विशेष रीतीने नमूद करण्याजोगी गोष्ट आहे ती ही, की महाभारतात (१२.३२५) ह्या सर्व देवतांचा उल्लेख असून नारायणाची जी सहस्त्र नावे सांगितलेली आहेत, त्यांत ह्याचा अंतर्भाव केलेला आहे. येथे आणखीही एक गोष्ट नमूद केली पाहिजे ती ही, की ह्या देवदेवतांना रूप, वर्ण, लांबी-रुंदी प्राप्त झालेली नाही पण त्यांची आयुर्मर्यादा मात्र भरमसाट वर्षात गणली गेलेली आहे. अगदी प्राचीन काळजी जी बौद्ध स्मारके उपलब्ध आहेत, त्यांत खुद्द बुद्धाचीही प्रतिमा नाही. त्याचे स्थान केवळबोधिवृक्ष किंवा बुद्धाच्या पादुकांनी निदर्शित केलेले आहे. पुढे महायानिकांनी बुद्धाच्या व बोधिसत्त्वाच्या प्रतिमांना सुरुवात केली व तेथपासून तो तांत्रिक बौद्धांच्या अखेरच्या काळापर्यंत देवदेवतांची वाढ सारखी होतच राहिली.
होऊ लागली.⇨अवलोकितेश्वर हा करूणेचे मूर्तिमंत रूप बनला व शरणागताला अभयदान व संरक्षण देणे हे त्याचे कर्तव्य होऊन बसले. तो लोकांना आपले स्वतःचे पुष्प देऊन वाचवू शकतो. ह्यालाच लोकेश्वर किंवा लोकनाथ असेही म्हणतात. नंत ⇨मंजुश्री नावाचा चिरकाल कुमार राहणारा बोधिसत्त्व हा मैत्रेयाला उपदेश करतो एवढेच नव्हे, तर जलचर प्राण्यांना उपदेश करून त्यांना मुक्तिमार्ग दाखवितो.⇨मैत्रेय बुद्ध नावाचा बोधिसत्त्व हा पुढे केव्हा तरी बुद्ध होऊन येणार आहे, अशी कल्पना पाली ग्रंथांतही आढळते. समंतभद्र नावाचा आणखी एक बोधिसत्त्व आहे. तो लोकप्रिय असून धर्माचरण करणाऱ्यांचा पाठीराखा आहे. वज्रपाणी हा मूळ इंद्राचा बौद्ध अवतार वाटतो. क्षितिगर्भ हा निरयांतील प्राण्यांना मदत करून त्यांना दुःखातून वाचवतो.
अनेक बोधिसत्त्वांप्रमाणे अनेक बुद्धांचीही कल्पना प्रसृत झाली. आदी बुद्धापासून पाच ध्यानी बुद्ध उत्पन्न झाले व त्यांच्या बरोबर स्त्रीरूप धारण करणाऱ्या शक्तीही आल्या तसेच संलग्नम बोधिसत्त्वही आले. हे बुद्धही विशिष्ट रंगांत
दिसणारे विशिष्ट मुद्रांचे निदर्शन करणारे व विशिष्ट स्कंधांचे प्रतीक म्हणून मानण्यात आले. ह्या सर्वांची सांगड (लामा धर्मावरील दिलेली मंडलाची आकृती पहा) खाली दाखविल्याप्रमाणे आहे :
ध्यानी बुद्ध |
मुद्रा |
रंग |
स्कंध |
शक्ती |
बोधिसत्त्व |
|
१ |
अक्षोभ्य |
भूमिस्पर्श |
निळा |
विज्ञान |
लोचना किंवा धर्मधात्वेश्वरी |
बोधिसत्त्व किंवा वज्रपाणी |
२ |
वैरोचन |
धर्मचक्र |
पांढरा |
रूप |
वज्रधात्वेश्वरी |
समंतभद्र |
३ |
अमिताभ |
ध्यान |
रक्त |
संज्ञा |
पंडरा |
पद्मपाणी किंवा अवलोकितेश्वर |
४ |
रत्नसंभव |
वरद |
पीत |
वेदना |
मामकी |
रत्नपाणी |
५ |
अमोघसिध्दी |
अभय |
हिरवा |
संस्कार |
तारा |
विश्वपाणी |
2. Getty, Alice, The Gods of Northern Buddhism,Tokyo, 1962.
“