बेसाल्ट : गडद रंगाच्या, घट्ट, अल्पसिकत (सिलिकेचे प्रमाण कमी असलेल्या ) आणि लोह व मॅग्नेशियम यांचे प्रमाण सापेक्षतः जास्त असलेल्या ज्वालामुखी (अग्निज ) खडकांचा गट.

गुणधर्म व संघटन : बेसाल्ट भूपृष्ठावर सर्वात विपुलपणे आढळतो. हा सूक्ष्मकणी ते घट्ट असून याचे वयन (पोत ) व संरचना निरनिराळी असल्याने भौतिक गुणधर्म विविध प्रकारचे असतात. याचे सरासरी वि. गु. २.८५ परंतु पोकळ्यायुक्त प्रकाराचे वि. गु. २.६ ते २.७ आणि रंग सामान्यपणे निळसर ते हिरवट काळा, कधीकधी गडद करडा वा तपकिरी असतो. ज्या लाव्हापासून बेसाल्ट बनतो त्याचे तापमान १,०००० ते १,२२०० से., श्यानता (दाटपणा ) १०३ ते १०६ पॉइज (१ पॉइज म्हणजे पाण्याच्या १०० पट दाटपणा होय ) आणि पृष्ठताण २७० ते ३५० डाइन/सेंमी. असतो [⟶ पृष्ठताण ]. बेसाल्ट हा खोल जागी तयार होणाऱ्‍या ⇨ गॅब्रो   या खडकाशी तुल्य असा ज्वालामुखी खडक आहे. कॅल्शियमाचे प्रमाण जास्त असणारी प्लॅजिओक्लेज (लॅब्रॅडोराइट) व पायरोक्सीन (ऑजाइट ) ही बेसाल्टाची आवश्यक खनिजे असून ती जवळजवळ समप्रमाणात असतात आणि यातील इतर खनिजे आकारमानाने २० टक्क्यांपेक्षा कमी असतात. ऑलिव्हीन, कॅल्शियमाचे प्रमाण कमी असणारे पायरोक्सीन इ.खनिजे, कधीकधी सल्फाइडी खनिजे व काचही बेसाल्टात असते. ऑलिव्हिनाचे सामान्यपणे सर्पेटाइनात रुपांतर झालेले आढळते. मॅग्नेटाइट, इल्मेनाइट व कधीकधी लिमोनाइट ही बेसाल्टातील गौण खनिजे असून सर्व लोह ऑक्साइडांचे एकूण प्रमाण १० टक्क्यांपर्यंत असू सकते. पैकी मॅग्नेटाइट हे पृथ्वीचा चुंबकीय इतिहास समजून घेण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. क्वचित हॉर्नब्लेंड, कृष्णाभ्रक, ल्यूसाइट, नेफेलीन, ॲनॅलसाइम, ॲपेटाइट, कॉर्ट्झ इ. खनिजे व धातुरुप लोह ही बेसाल्टात, आढळतात.

आढळणारी रुपे : बेसाल्ट सामान्यतः लाव्हा प्रवाहांच्या कधीकधी लहान भित्ती (खडकांच्या थरांना छेदून जाणाऱ्या व समांतर पृष्ठे असलेल्या भेगांत शिलारस थिजून बनलेल्या भिंतीसारख्या राशी) व शिलापट्ट (खडकांच्या दोन थरांमध्ये थरांच्या रुपांत तर क्वचित काचमय, तंतू . रुपांतही आढळतो.

वयन व संरचना : लाव्हा कोणत्या स्थितीत व कसा थंड झाला यांनुसार बेसाल्टातील विविध संरचना, वयन व खनिजांचे स्वरुप ही ठरतात. जलदपणे थंड झालेला लाव्हा सूक्ष्मस्फटिकी होतो, तर सावकाश थंड झालेल्या लाव्ह्यात चांगले व मोठे स्फटिक तयार होतात. कधीकधी मोठे स्फटिक उद्गिरणापूर्वीच (उद्रेकापूर्वीच) बनलेले असतात. अशा तऱ्हेने एकाच लाव्हा प्रवाहात विविध आकारमानांचे स्फटिक आढळतात व त्यामुळे बेसाल्ट वयन सामान्यतः पृष्युक्त (सूक्ष्मकणी आधारकात मोठे स्फटिक–येथे फेल्स्पार, ऑजाइट आणि ऑलिव्हीन यांचे विखरलेले असे) असते. कधीकधी फेल्स्पाराच्या पात्यासारख्या स्फटिकांमधअये ऑजाइटाचे स्फटिक (वाउलट) वेढले गेलेले आढळतात. अशा वयनाला सर्पचित्रित वयन म्हणतात.

थंड होताना लाव्ह्याचे कुंचन होते त्यामुळे त्याच्या पृष्ठाला काटकोनात म्हणजे उभे संधी (तडे) निर्माण होतात. या संधीमुळे लाव्हाप्रवाहात स्तंभाकार संरचना तयार होते. हे स्तंभ सामान्यतः षट्कोणी तर कधीकधी ३ ते ९ बाजूंचे असतात. असे संधी हे कित्येक बेसाल्टांच वैशिष्ट्य आहे. उदा., मुंबईची गिल्बर्ट टेकडी, आयर्लंडमधील जायंट्स कॉजवे इत्यादी. [⟶जावालामुखी–२ दक्षिण ट्रॅप].

बेसाल्टाचे रासायनिक संघटन विविध प्रकारचे असून ही विविधता विविध परिस्थितींशी निगडित असते. अशा तऱ्हेने वयन, संरचना व संघटन यांवरून बेसाल्टाच्या उत्पत्तीविषयी व लाव्हा कोणत्या परिस्थितीत बाहेर पडला याविषयी निष्कर्ष काढता येतात.

प्रकार : भूपृष्ठावर थिजलेल्या लाव्हा प्रवाहाचे पृष्ठ खडबडीत वा स्पंजासारखे सच्छिद्र सते कारण लाव्ह्यातील वायू व वाफ बुडबुड्यांच्या रुपात बाहेर पडताना पृष्ठांवर असंख्य छिद्रे व पोकळ्या निर्माण होतात. लाव्हा प्रवाहाचे पृष्ठ सपाट वा गुळगुळीत असल्यास त्याला ‘पाहोहो’ आणि अशा पृष्ठाच्या व ठोकळ्याप्रमाणे दिसणाऱ्या लाव्ह्याला ‘ठोकळ्या’ किंवा ‘आआ’ लाव्हा म्हणतात. पाण्याखाली किंवा पाणथळ जमिनीवर थिजलेला लाव्हा एकमेकांवर ठेवलेल्या लोडांसारखा दिसतो, म्हणून त्याला ‘गिरदी’ लाव्हा म्हणतात [⟶जावालामुखी–२]. बेसाल्टामध्ये नळीच्या आकारच्या पोकळ्याही आढळतात. या पोकळ्याही वरीलप्रमाणे बनलेल्या असतात. कधीकधी या पोकळ्यांमध्ये नंतर विद्रावांद्वारे क्वॉर्टझ, झिओलाइटे, कॅल्साइट यांचे चांगले स्फटिक कधीकधी प्रेहनाइट, क्लोराइड आणि क्वचित धातुरुप तांबे साचलेले आढळते. अशा बेसाल्टांना ‘कहरयुक्त’ व ‘भरित कुहरी’ बेसाल्ट म्हणतात.

रासायनिक व खनिज संघटनांच्या दृष्टीने बेसाल्टाचे कित्येक प्रकार होतात. त्यांपैकी कल्शियम ऑक्साइड व सोडियम ऑक्साइड अधिक पोटॅशियम ऑक्साइड ही जवळजवळ सारख्या प्रमाणात सलेला कॅल्क-अल्कली आणि सोडियम व पोटॅशियम ऑक्साइडांचे प्रमाण अपेक्षेपेक्षा जास्त असलेला अल्कली हे प्रमुख गट हेत. कॅल्क-अल्कली बेसाल्टात प्लॅओक्लेज, ऑजाइट, पिजिओनाइट अथवा हायपर्स्थीन व ऑलिव्हीन ही प्रमुख खनिजे असून यात सिलिका सु. ४५ टक्के असते. ऑलिव्हीन विपुल असणाऱ्या पिक्रिटिक बेसाल्टापासून अँडेसाइटी बेसाल्टापर्यंतचे सर्व प्रकार या गटात येतात. असे लाव्हे मुख्यत्वे गिरिजनक (प्रवतनिर्मितीच्या पट्ट्यात आढळतात व त्यांची मोठी पठारे बनलेली आहेत उदा., महाराष्ट्रातील कातळाचे पठार, दक्षिण अमेरिकेतील पारानाचे पठार. माउनालोआ आणि कीलाउआ या हवाईतील ज्वालामुखींतील असाच लाव्हा बाहेर पडत असून तेथील निद्रित ज्वालामुखींतील खडकही असेच हेत. अल्कली बेसाल्टात मुख्यत्वे ऑलिव्हीन, डायोप्साइड किंवा टिटॅनियमयुक्त पायरोक्सीन ही खनिजे असतात मात्र पिजिओनाइट व हायपर्स्थीन ही नसतात. या गटातील खडक गिरिजनक पट्ट्याच्या अग्र व पश्च भूमीतील लाव्ह्यात विपुलपणे आढळतात. खनिजांच्या विपुलतेनुसारही बेसाल्टांचे प्रकार पाडले जातात. उदा., ऑलिव्हीन विपुल असणारा ऑलिव्हीन बेसाल्ट, तर आधारकात अल्प प्रमाणात क्वॉर्ट्झ असणारा क्वॉर्ट्झ बेसाल्ट. ऑलिगोक्लेज विपुल असणाऱ्या बेसाल्टाला म्युगेअराइट आणि अल्बाइटी फेल्ल्पार विपुल असणाऱ्या ट्रॅचिबेसाल्ट म्हणतात. फेल्स्पार, पायरोक्सीन यांच्याबरोबरच फेल्स्पॅथॉइडे (उदा.,नेफेलीन, ॲनॅलसाइम, ल्यूसाइट इ.) असलेल्या बेसाल्टाला टेफ्राइट म्हणतात. फेल्स्पाराऐवजी पूर्णपणे फेल्स्पॅथॉइडे असणाऱ्या बेसाल्टाला फेल्स्पॅथॉइडी बेसाल्ट म्हणतात व यातील फेल्स्पॅथॉइडानुसार नेफेलिनाइट (नेफेलीन बेसाल्ट), ल्यूसिटाइट (ल्यूसाइट बेसाल्ट) . प्रकार होतात. तथापि फेल्स्पारांच्या जागी अंशतःच फेल्स्पॅथॉइडे आलेली असल्यास अशा बेसाल्टाला नेफेलीन वा ल्यूसाइट बेसानाइट म्हणतात. काच विपुल प्रमाणात असणाऱ्या बेसाल्टाला टॅचिलाइट म्हणतात.


उत्पत्ती : भूपृष्ठातील भेगा अथवा नलिकाकार छिद्रे यांतून शिलारस बाहेर पडून व थिजून बेसाल्ट बनतात. जगातील बहुतेक बेसाल्टी लाव्हापठारे ही भेगांतून झालेल्या भेगी द्गिरणांद्वारे बनलेली आहेत. या भेगा अरुंद पण लांब असून बेसाल्टी लाव्हा प्रवाही किंवा तरल असल्याने तो दूरवर पसरत जाऊन ही पठारे बनली आहेत. भेगेच्या जवळपास मात्र लहान शंक्वाकार राशी आढळतात. उलट केंद्रीय प्रकारच्या म्हणजे नलिकाकार छिद्रांतून झालेल्या उद्गिरणांद्वारे बेसाल्टाच्या शंक्वाकार राशी वा ज्वालामुखी डोंगर बनतात.

आढळ : हा भूपृष्ठावरील सर्वांत सामान्य खडक असून त्याने पृष्ठाचा २५ लाख चौ. किमी. पेक्षा जास्त भाग व्यापला आहे. अलीकडील ज्या भागातील ज्वालामुखी क्रिया होऊन गेली आहे, अशा सुप्त ज्वालामुखींच्या क्षेत्रात हा विपुलपणे आढळतो. हल्लीच्या बहुतेक जागृत ज्वालामुखींतून बेसाल्टी लव्हा बाहेर पडत हे (उदा., टना, व्हीस्यूव्हिअस). बेसाल्ट भूपृष्ठाखालीही आढळतो. महासागरांचे खोल तळ मुख्यत्वे बेसाल्टाचे बनलेले असून महासागरांतील पर्वतरांगा, बेटे (उदा., पॅसिफिक व अटलांटिकमधील ज्वालामुखी बेटे) व द्वीपसमूह तसेच खंडांच्या डोंगराळ सीमा अशा सर्व प्रकारच्या संरचना असणाऱ्या परिसरात बेसाल्ट मुख्यत्वे आढळतो.

दक्षिण ट्रॅप (महाराष्ट्र), कोलंबिया, सायबीरिया, पीरान्या, कारू, टास्मानिया . पठारे बेसाल्टाची हेत. याशिवाय ग्रीनलंड, आइसलँड, पूर्व आस्ट्रेलिया, हवाई बेटे, सिसिली, इटली, ब्रह्मदेश इ. प्रदेशांतही बेसाल्ट मोठ्या प्रमाणात आढळतो. जर्मनी, ट्रिपोली, केपव्हर्द बेटे इ. भागांत नेफेलीन बेसाल्ट जर्मनी, बोहीमिया, इटली, जावा इ. भागांत ल्यूसाइट बेसाल्ट आमि युगांडा व झईरे येथे सोडियम व पोटॅशियम यांचे प्रमाण जास्त सणारे बेसाल्ट आढळतात. भारतात महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, बिहार-बंगाल (राजकमल टेकड्या) इ. राज्यांत बेसाल्ट आढळतो. महाराष्ट्रातील बहुतेक जिल्ह्यांत बेसाल्टाचे खाणकाम चालते.

उपयोग : हा घट्ट, टिकाऊ व कठीण खडक असल्याने तसेच तो विपुलपणे आढळत सल्याने त्याचा मुख्यत्वे बांधकाम व खडी यांसाठी वापर केला जातो. मात्र मंद व मळकट रंगामुळे तो बांधकामासाठी लोकप्रिय ठरलेला नाही. मूर्तीसाठीही हा वापरतात. बेसाल्टामध्ये रासायनिक बदल होऊन आर्थिक दृष्टीने महत्त्वाचे ⇨जांभा व ⇨बॉक्साइट हे खडक तयार होतात तसेच त्यांच्यापासून शेवटी महाराष्ट्रातील काळ्या शेतजमिनींसारख्या सुपीक शेतजमिनी तयार होतात. बेसाल्टांच्या चुंबकीय गुणधर्माचा अभ्यास करून पृथ्वीच्या भूतकालीन चुंबकीय क्षेत्राविषयी व महासागरांचे तळ पसरण्याच्या त्वरेविषयी माहिती मिळते. तसेच बेसाल्टाच्या स्वरुपावरून पृथ्वी व तंद्र यांच्या अंतरंगाचे संघटन व तापमान यांविषयी अनुमान करता येते.

पृथ्वीच्या बाहेरील बेसाल्ट : पृथ्वीशिवाय चंद्र आणि कदाचित सूर्यकुलातील इतर खस्थ पदार्थांच्या पृष्ठभागावरही बेसाल्ट हा प्रमुख खडक असावा. चंदारवरील ज्ञात असलेले सर्व बेसाल्टी खडक सब-अल्कालइन प्रकारचे असून ते पृथ्वीवरील बेसाल्टासारखे आहेत मात्र त्यांच्यात धातुरुपातील लोखंड आढळते. त्यांपैकी पुष्कळांत लोखंड व टिटॅनियम अतिविपुल प्रमाणात आढळतात. सोडियम, पोटॅशियम व निकेलयुक्त खनिजे कमी प्रमाणात असतात व पाणी आढळत नाही. चंद्रावरील सूक्ष्मकणी बेसाल्टी खडक छिद्रे व पोकळ्यांनी युक्त सून त्यांच्या उघड्या पडलेल्या बाजूवर काचेचे अस्तर असलेले खळगे आढळले हेत. हे खळगे म्हणजे सूक्ष्म अशनींच्या आघातांच्या खूणा असाव्यात. बाह्य अवकाशातून पृथ्वीवर येऊन पडलेले काही खडक म्हणजे अशनी बेसाल्टाचे बनलेले असून ते चंद्रावरील बेसाल्टाहून बरेच वेगळे हेत. सूर्या ज्या मूळ अभ्रिकेपासून बनला असे मानतात, त्या अभ्रिकेच्या अगदी प्रथम झालेल्या संघननांनंतर (वायू आणि द्रव यांचे घनरुपात रुंपांतर झाल्यानंतर) लगचेच हे शनी सूर्यकुलात कोठे तरी निर्माण झाले असावेत.

बेसाल्ट हा शब्द प्रथम थोरले प्लनी (इ.स. पहिले शतक) यांनी वापरला. त्यांच्या मते हा खडक प्रथम इथिओपियात आढळला. थिओपियन भाषेतील ‘लोखंड देणारा दगड’ या अर्थाच्या ‘बेसाल’ या शब्दावरून त्याचे बेसाल्ट हे नाव आले सावे व नंतर बदल न होता ते इंग्रजी रुढ झाले असावे. ग्रीक भाषेत याचा अर्थ ‘कसाचा (काळा) दगड’ असा होतो. बेसाल्टाच्या पठाराची झीज होऊन बनलेल्या टेकड्या राक्षसी पाऱ्यांप्रमाणे दिसतात म्हणून याला ‘ट्रॅप’ (पायरी) असेही म्हणतात.

पहा :  अग्निज खडक ज्वालामुखी–२ दक्षिण ट्रॅप.

संदर्भ : 1. Hatvh. F.H. Wells, A.K. Well, M. K. Petrology of the Igneous Rocks, London, 1961.

             2. Thrner, F.J. Verhoogen, J. Igneous and Metamorphic Petrology, BomBay, 1961.

             3. Tyrell, G. W. The Principles of Petrology. Bombay, 1977.             ४. सोवनी, प्र. वि. पाषाणशास्त्र, पुणे, १९७४.

ठाकूर, अ.ना.