बुशमन लॅंड : दक्षिण आफ्रिका प्रजासत्ताकाच्या केप प्रांताच्या वायव्य भागातील ऑरेंज नदीच्या डाव्या काठा वरील पठारी प्रदेश, यापैकी ग्रेट बुशमनलॅंडचा विस्तार प्रामुख्याने २०° पू. रेखावृत्ताच्या पश्चिमेस आढळतो. तर

लिटल बुशमनलॅंड प्रदेश ऑरेंज नदीच्या काठाजवळ आढळतो. दोन्ही प्रदेश अर्धवाळवंटी आणि खनिज संपत्तीच्या दृष्टीने समृद्ध आहेत.

पहा : दक्षिण आफ्रिका प्रजासत्ताक

चौधरी, वसंत