फ्रीडेल – क्राफ्ट्स विक्रिया  :   निर्जल ॲल्युमिनि यम क्लोराइड उत्प्रेरक  ( विक्रियेमध्ये प्रत्यक्ष भाग न घेता तिची गती बदलणारा पदार्थ )  म्हणून वापरले असता ,  ॲरोमॅटिक हायड्रोकार्बनांतील [→  ॲरोमॅटिक संयुगे ]  हायड्रोजन अणूच्या जागी अल्किल व ॲसिड गट [ →  मू लके] प्रतिष्ठापित करून  ( बसवून )  अनुक्रमे हायड्रोकार्बन व किटोन वर्गाची संयुगे  बनविता येतात ,  हे  १८७७  मध्ये शार्ल फ्रीडे ल  व जेम्स मेसन क्रा फ्ट्‌ स यांनी दाखविले व त्यावरून या विक्रियेला फ्री डेल – क्राफ्ट्‌ स विक्रिया हे नाव देण्यात आले  परंतु त्यानंतर झालेल्या संशोधनामुळे या विक्रिया क्षेत्राची व्याप्ती बरीच वाढली आहे .  आधुनिक व्याख्येप्रमाणे ल्यूइस अम् ल प्रकारची  ( जी . एन् .  ल्यूइस या रसायनशास्त्रज्ञांच्या नावावरून ओळखण्यात येणाऱ्या अम्ल प्रकारची )  हॅलाइडे किंवा प्रोटॉन अम्ले [ → अम्ले   व क्षारक  अम्ल  –  हॅलाइडे] हे उत्प्रेरक वापरून घडविलेल्या प्रतिष्ठापन , ⇨ समघटकीकरण , निरास , ⇨ बहुवारि कीकरण व समावेशन अशा विविध विक्रियांचा [ →  रा सायनिक विक्रिया] यात समावेश केला जातो .  मूळच्या विक्रियेत कार्बन अणूंमध्येच परस्परात बंध निर्माण करता येत  पण नंतरच्या प्रगतीमुळे कार्बन व ऑक्सिजन ,  कार्बन व नायट्रोजन ,  कार्बन व गंधक ,  कार्बन व हॅलोजने ,  कार्बन व फॉस्फरस या अणूंमध्येही बंध निर्माण करणे साध्य झाले आहे .  तसेच मूळ विक्रिया ॲरोमॅटिक हायड्रोकार्बनांपुरतीच मर्यादित होती ,  तशी ती आता राहिलेली नाही .  ॲलिफॅटिक व ॲलिसायक्लिक संयुगांवरही [⟶ ॲलिफॅटिक संयुगे ॲलिसायक्लिक संयुगे] ती घडविता येते ,  असे सिद्ध झाले आहे .

  

उत्प्रेरक :  या विक्रियांमध्ये वापरले जाणारे उत्प्रेरक इलेक्ट्रॉन स्वीकारणारी संयुगे असतात .  त्यांचे वर्गीकरण पुढे दिल्याप्रमाणे करतात .

 (१) अम्ल – हॅलाइडे  ( ल्यूइस अम्ले ) :  ॲल्युमिनियम क्लोराइड व ब्रोमाइड आणि बोरॉन ट्रायल्युओराइड ही या वर्गाची संयुगे विशेष वापरली जातात .  ॲल्युमिनियम क्लोराइड स्वस्त व सहज मिळणारे असल्यामुळे औद्योगिक उत्पादन विक्रियांमध्ये विशेष पसंत केले जाते .  बेरियम क्लोराइड ,  कॅडमि य म क्लोराइड , झिंक क्लोराइडे  ( ZnCl2 व ZnCl4 ) ,  फेरिक क्लोराइड व बोरॉन ट्रायक्लोराइड ही संयुगेही उत्प्रे रक म्हणून उपयोगी पडतात .  [⟶ अम्ल – हॅलाइडे ] .

  

 ( २ )  धातु – अल्किल वर्गाची संयुगे व अल्कॉक्साइडे  :  ॲल्युमिनियम ,  बोरॉन व जस्त यांची अल्किल संयुगे आणि ॲल्युमिनियम फिनॉक्साइड ही या वर्गात येतात .

  

 ( ३ )  प्रोटॉन अम्ले  ( ब्रॉन्स्टेड अम्ले  जे .  एन् .  ब्रॉन्स्टेड या रसायनशास्त्रज्ञांच्या नावाने ओळखण्यात येणारी अम्ले ):  सल्फ्यू रिक अम्ल ,  निर्जल हायड्रोजन  फ्ल्यु ओराइड ,  फॉस्फोरि क व पॉलि फॉस्फोरि क अम्ले , तसेच परक्लोरिक ,  क्लोरोसल्फॉनिक ,  पॅराटोल्यूइन सल्फॉनिक व क्लोरोॲसिटिक अम्ले या वर्गात येतात .

  

 ( ४ )  अम्लीय ऑक्साइडे व सल्फाइडे  :  ॲल्युमिना व सिलि का किंवा त्यांची नैसर्गिक अथवा संश्लेषि त  ( कृत्रिम री तीने तयार केलेली )  मिश्रणे उत्प्रेरक म्हणून वापरण्यात येतात .  त्यांमध्ये क्रोमियम ,  मॅग्नेशियम , मॉलिब्डेनम ,  थोरियम ,  टंगस्टन व झिर्कोनियम यांची ऑक्साइडेही मिश्ररूपात असण्याची शक्यता असते .  त्याचप्रमाणे मॉलिब्डेनमाची सल्फाइडे असू शकतात .

  

 ( ५ )  ॠनायन – विनियमक रेझिने  :  [⟶  रेझिने ] .  उदा . ,  सल्फॉनीकरण केलेली पार्श्व संबद्ध स्टायरीन व डायव्हिनि ल बें झी न यांची बहुवारिके  ( एक अथवा अधिक अणुसमुच्चय पुनः पुन्हा जोडले जाऊन बनलेली मोठा रेणु भार असलेली संयुगे ).

 सूत्र १. नॅप्थॅलीन

  विद्रावक  : ( विरघळविणारा पदार्थ ).  या विक्रिया घडविण्यासाठी सामान्यतः ज्या हायड्रोकार्बनावर विक्रिया घडवावयाची ते द्रवरूप असेल ,  तर तेच अतिरिक्त प्रमाणात विद्रावक म्हणून वापरले जाते .  ते शक्य नसेल ,  तर कार्बन डायसल्फाइड ,  पेट्रोलियम ईथर ,  एथिलीन क्लोराइड ,  मिथिलीन क्लोराइड ,  कार्बन टेट्राक्लोराइड ,  नायट्रोबें झी न ,  नायट्रोमिथेन ,   नायट्रोएथेन व नायट्रोप्रोपेन ही संयुगे विद्रावक म्हणून वापरतात .  ही नायट्रोसंयुगे ॲल्युमिनियम क्लोराइड आणि इतर अम्ल धातू – हॅलाइडे यांच्याबरोबर जटि ल संयुगे बनवितात .  त्यामुळे ती वापरली असता असमान विभा जन होणे ,  डांबरासारखे पदार्थ बन णे इ .  अनिष्ट गोष्टी टळतात .  ज्या ठिकाणी विक्रियाकारक सौम्य आणि ज्यावर विक्रिया व्हावयाची ते संयुग अतिविक्रियाशील असेल अशा ठिकाणी ऑ र्थोडायक्लोरोबें झी न ,  डाय- एथिल ई थर किंवा बें झी न हे विद्रावक म्हणून वापरतात  पण अशा ठिकाणी विद्रावकावर रासायनिक विक्रिया होण्यास अवसर मिळणार नाही ,  इतक्या त्वरेने विक्रिया घडणे आवश्यक असते .  काही विक्रियांमध्ये विद्रावकानुसार वेगवेगळी विक्रियाफले मिळतात ,  असे दिसून आले आहे . उदा . ,  कार्बन डाय सल्फाइड किंवा टेट्रानायट्रोमिथेन हे विद्रावक वापरले ,  तर नेप्थॅलिनात  १  या स्थानी आणि नायट्रोबें झी न किंवा नायट्रोमेसिटीलीन वापरले ,  तर  २  या स्थानी प्रतिष्ठापन घडते ,  असे दिसून आले आहे . 


  अल्किलीकरण  :  [ एखाद्या कार्बनी संयुगाच्या रेणूमध्ये प्रतिष्ठापन किंवा समावेशन विक्रियेने अल्किल गटाचा प्रवेश घडविण्याला अल्कि ली करण म्हणतात ⟶  अल्किलीकरण ] .  ॲरोमॅटिक केंद्रकातील हायड्रोजन अणूंचे अल्किल गटांनी प्रतिष्ठापन झाले म्हणजे अल्किलीकृत हायड्रोकार्बने निर्माण होतात .  यासाठी प्रारंभी अल्किल हॅलाइडे अल्किलीकारक म्हणून वापरली   जात .  ही विक्रिया सू त्र  २  मध्ये दर्शविल्याप्रमाणे घडते .  

        

 Alcl3

        

 ArH

 +

 RX

 ⟶

 ArR

 +

 HX

 ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन

  

 अल्किल  हॅलाइड

  

 अल्किल हायड्रोकार्बन

  

 हॅलोजन अम्ल

 सूत्र २.  ॲरोमॅटिक हायड्रोकार्बना चे अल्किलीकरण

 आधुनिक काळात अल्किलीकारके म्हणून अल्कोहॉले ,  अल्किने [ द्विबंध असलेली ॲलिफॅटिक हायड्रोकार्बने  ⟶ अलिफॅटिक संयुगे ],  अल्काइने  ( त्रिबंध असलेली ॲलिफॅटिक हायड्रोकार्बने ) ,  कार्‌बॉक्सिलिक व खनिज अम्लांची एस्टरे ,  इथरे ,  आल्डिहाइडे ,  किटोने ,  पॅराफिने ,  सायक्लोपॅराफिने ,  थायॉले ,  सल्फाइडे ,  अमाइने व थायोसायनेटे अशी विविध संयुगे वापरली जातात .

    

 विक्रियेसाठी वापरलेल्या उत्प्रेरकाची आणि अल्किलीकारकाची विक्रियाशी लता ,  प्रमाण ,  विक्रियेचे तापमान ,  कालावधी आणि विद्रावक यांवर संश्लेषणा ने मिळणाऱ्या संयुगात एक किंवा अधिक अल्किल गट प्रतिष्ठापनाने येतील हे व द्विप्रतिष्ठापि त संयुगे बनली असता ऑर्थो , मेटा व पॅरा यांपैकी कोणता समघटक जास्त प्रमाणात तयार होईल हे अवलंबून असते .

  

 विक्रिया होतांना विक्रियाकारकाचा पुनर्विन्यास  ( नवी निराळी मांडणी )  होण्याची शक्यताही असते  त्यामुळे अपेक्षित संयुगाऐवजी वा त्याच्याबरोबर समघटकी संयुगे मिळण्याची शक्यता ही असते .  उदा . , n– ब्युटिल क्लोराइड हा विक्रियाकारक ॲल्युमिनि यम क्लोराइड या उत्प्रेरकाबरोबर वापरला असता मुख्यतः द्वितीयक ब्युटिल बेंझीनच बनते  पण हाच उ त्प्रे रक असताना n– प्रोपिल क्लोराइड वापरले ,  तर प्रोपिल बेंझिनाबरोबर विक्रियाकारकाचा पुनर्विन्यास झाल्यामुळे आयासोप्रोपिल बेंझिनही तयार होते ( सू त्र  ३ ) . उत्प्रेरक ,  अल्किलीकारक ,  तापमान आणि विद्रावक यांवर हे फेरफार अवलंबून असतात .

सूत्र ३. पुनर्विन्यासाने मिळणारी समघटकी संयुगे.

 एका रेणूमध्ये असलेले अल्किल गट तेथून निघून दुसऱ्या रेणूत प्रतिष्ठापनाने जाणेही या विक्रियांत शक्य असते . उदा . , बेंझीन व पॉलिएथिल बेंझिन यांमध्ये विक्रिया होऊन एथिल बेंझिन निर्माण होते . आयसोप्रोपिल व तृतीयक ब्युटिल गट अशा तऱ्हेने फार सुकरतेने   स्थानांतरित होतात . एका गटाच्या जागी दुसरा गटही या विक्रियांत येऊ शकतो .

  

 ॲरोमॅटिक वलयात मेटा स्थानी प्रतिष्ठापन होण्यास अनुकूल असे गट असतील ,  तर फ्रीडेल – क्राफ्ट्‌ स विक्रिया घडून येत नाही  उदा . ,  नायट्रोबेंझीन व ॲसिटोफेनोन यांचे अल्किलीकरण घडविता येत नाही  परंतु अशा गटांच्या बरोबर ऑर्थो व पॅरा स्थानी प्रतिष्ठाप ना स अनुकूल असे प्रभावी गट असतील ,  तर मात्र विक्रिया घडून येते .  उदा . ,  सूत्र  ४ मधील विक्रिया ,  येथे OCH3 गटाच्या प्रभावामुळे पॅरा स्थानी प्रतिष्ठापन होते .

  


 अल्किलीकारकामध्ये जर दोन कार्यकारी केंद्रे असतील  ( उदा . ,  डायहॅलाइडे , अतृप्त – विक्रियेत इतर अणूंचा समावेश होऊ शकणारी  –  हॅलाइडे ,  डायॉले ,  अतृप्त अल्कोहॉले ,  डायओलेफिने इ . संयुगे ) ,  तर त्यांच्या विक्रियेने ॲरोमॅटीक हायड्रोकार्बनापासून विवृत  ( टोके मोकळी असलेली )  शृंखलायुक्त संयुगे काही प्रमाणात तयार होतात  पण वलयीभवनास अनुकूल परिस्थिती असेल ,  तर मुख्यतः वलयी अल्किल संयुगे बनतात .  ती बनताना बहुधा एका केंद्राची विक्रिया होऊन  प्रथम दुसरा कार्यकारी गट शिल्लक असलेले ॲरोमॅटीक संयुग प्रथम बनत असावे आणि त्यानंतर दुसऱ्या केंद्राची विक्रिया होऊन वलय बनत असावे  ( सूत्र  ५ ) . 

सूत्र ४. प्रतिष्ठापन विक्रिया

 एखाद्या रेणूमधील पार्श्व शृंखलेत वलयीभवनास योग्य अशा स्थानी हॅलोजन उपस्थित असेल ,  तरीही या विक्रियेने वलय निर्माण होते . ( सूत्र  ६ ). पार्श्व शृंखलेत  द्वि बंध असेल ,  तरीही वलयीभवन घडून येते  ( सूत्र  ७ ). या पद्धतीने संघनित वलय समूह निर्माण करता येतात .

  

 मूळ फ्रीडेल – क्राफ्ट् स विक्रियेत ॲरोमॅटीक हायड्रोकार्बनां च्या अल्किलीकरणाचाच अंतर्भाव आहे  परंतू आधुनिक संशोधनामुळे मिथे न व एथेन वगळ्यास इतर पॅराफिनांचे अल्किलीकरण या विक्रियेने करणे साध्य झाले आहे . उदा . ,  ॲल्युमिनियम क्लोराइड हा उत्प्रेरक वापरला असता आयसोब्युटेनापासून एथिलिनाच्या विक्रियेने हेक्झेन ,  ऑक्टेन व डेकेन आणि त्यांची संघटक संयुगे बनविता येतात .  त्याचप्रमाणे संहत  ( ज्याचे विद्रावातील प्रमाण जास्त आहे असे )  सल्फ्यूरिक अम्ल  (९६ – ९७ %)  उत्प्रेरक म्हणून वापरून आयसोब्युटेन ,  आयसोपेंटेन व आ यसोहेक्झेन यांचे अल्किलीकरण ओलेफीन संयुगांच्या विक्रियेने घडवून आणता येते .  या प्रकारे उच्च ऑक्टेन अंक असलेली [  ठोका – वि रोधक गुण दर्शविणारा निर्देशांक उच्च असलेली ⟶  अंतर्ज्वलन – एंजिन ] इंधने औद्योगिक प्रमाणावर बनविण्यात आली आहेत .  

 सूत्र ५. दोन कार्यकारी केंद्रांमुळे होणारे वलयीभवन

 सूत्र ६. पार्श्व शृंखलेतील हॅलोजन अणूमुळे होणारे वलयीभवन


 सूत्र ७. पार्श्व शृंखलेतील द्विबंधामुळे होणारे वलयीभवन

 सूत्र ८. कार्बोनियम आयननिर्मिती व बेंझिनाचे अल्किलीकरण

  

   यंत्रणा  :  अल्किलीकरण विक्रियेत प्रथम ॲल्युमिनियम क् लोराइडासारख्या ल्यूइस अम्लाचा विक्रियाकारकावर परिणाम होतो व कार्बोनियम आयन  ( कार्बनाचा समावेश असलेला सहसंयुजी बंध – ज्यात प्रत्येक बंधि त अणूने एकेक इलेक्ट्रॉन देऊन इलेक्ट्रॉनांची जोडी तयार होते असा बंध – तुटून बनणारा अल्पायुषी धन विद्युत्   भारित खंड )  निर्माण होतो .  उदा . ,  प्रोपिल क्लोराइडापासून प्रोपिल कार्बोनियम आयन सूत्र  ८  मध्ये दाखविल्याप्रमाणे बनतो व ॲल्युमिनि यम क्लोराइडाबरोबर त्याचे जटि ल संयुग बनते .  प्रोपिल कार्बोनियम आयनापासून आयसोप्रोपिल कार्बोनियम आयन ही बनतो .  नंतर कार्बोनियम आयनांची ॲरोमॅटिक हायड्रोकार्बनाशी  ( उदा . ,  बें झि नाशी )  विक्रिया होते आणि अखेरीस एक प्रोटॉन मुक्त होऊन अल्कि लीकृत संयुग निर्माण होते .

  

 हॅलो – अल्कि लीकरण  :  हॅलो – अल्कि ल ई थरे व सल्फा इडे ,  डाय आणि पॉलि हॅलो हायड्रोकार्बने ,  हॅलो – अल्किने ,  हॅलो – अल्कोहॉले ,  हॅलो – अल्किल सल्फेटे आणि आ ल्डिहाइडे व हायड्रोजन हॅलाइडे यांची किंवा ॲसिटाले व हायड्रोजन हॅलो इडे यांची मिश्रणे विक्रियाकारक म्हणून वापरली असता ॲरोमॅटिक संयुगामध्ये हॅलोजनयुक्त अल्किल गट प्रतिष्ठापित करता येतात. या प्रकारे हॅलोमिथिलीकरण, हॅलोएथिलीकरण  व उच्च हॅलो – अल्किलीकरणे घडवून आणली जातात .  झिंक क्लोराइड हा उत्प्रेरक सामान्यतः वापरला जातो.  ॲ ल्युमिनियम क्लोराइडाबरोबर वितळवून हा वापरला असता त्याची विक्रियाशीलता वाढते. कित्येक ठिकाणी खनिज अम्लेही उत्प्रेरक  म्हणून वापरतात .  ॲसिटिक अम्ल ,  डाय – एथिल ईथर ,  डायऑक्झेन ,  कार्बन टेट्राक्लोराइड ,  एथिलीन क्लोराइड ,  नायट्रोबेंझीन इ .  पदार्थ विद्रावक म्हणून वापरले जातात .

  

  हॅलो – अल्किलीकरणाने बनलेल्या संयुगाची पुन्हा मुळ हायड्रोकार्बनावर विक्रिया होऊन डाय – अरिल अल्केने किंवा अल्किलीकृत वलयी संयुगे सहविक्रिया फले म्हणून मिळतात  ( सूत्र  ९ ).  


  ॲरोमॅटिक संयुगांचे अरिलीकरण  :  ॲरोमॅटिक वलयाला जोडलेले हॅलोजन अणू हे अल्किल गटाला जोडलेल्या हॅलोजन अणूइतके विक्रियाशील नसतात .  त्यामुळे अरिल हॅलाइडांचा उपयोग करून ॲरोमॅटिक वलयाला अरिल गट जोडणे सोपे नसते  परंतु  फ्ल्यु ओरोबेंझीन वापरले असता व इतर परिस्थिती अनुकूल असेल ,  तर ॲल्यु मिनी यम क्लोराइडाच्या उपस्थितीत बायफिनि ल अनुजात  ( एका संयुगापासून मिळणारी दुसरी संयुगे )  मिळतात .

  

  या  बाबतीत क्लोराइडांची विक्रियाशीलता  फ्ल्यु ओराइडांपेक्षा कमी व ब्रोमाइडांची सर्वांत कमी असते .

  ॲल्युमिनियम क्लोराइड किंवा तत्सम उत्प्रेरकाच्या योगाने ॲरोमॅटिक वलयांतील हायड्रोजन अणूंचा निरास घडवून ॲरोमॅटिक वलयामध्ये बंध निर्माण करता येतात . ( सूत्र  १० ).

  ॲसिलीकरण :  [⟶  ॲसिलीकरण ] .  ॲरोमॅटिक संयुगात ॲल्युमिनियम क्लोराइड, बोरॉन  

 C 6 H 6      ⟶      C 6 H 5· CH 2 ·C I           ⟶            C 6 H 5 ·CH 2 ·C 6 H 5  

 बेंझीन              बें झिल क्लोराइड  

 सूत्र ९ .  हॅलो – अल्किलीकरणाने बनलेल्या संयुगाची बेंझिनाशी विक्रीया होऊन मिळणारी सहविक्रिया फले .

 सूत्र १०. ॲरोमॅटिक वलयांतील हायड्रोजन अणूंचा निरास होऊन वलयांमध्ये होणारी बंधनिर्मिती.

  

  ट्राय फ्ल्यु ओराइड इ .  उत्प्रेरकांच्या उपस्थितीत ॲसिल गट प्रतिष्ठापित करून कीटोने बनविता येतात  ( सूत्र  ११ ).  त्यासाठी ॲसिल हॅलाइडे ,  अम्ल ॲनहायड्राइडे ,  एस्टरे ,  अम्ले ,  कीटोने ,  अमाइडे आणि नायट्राइले विक्रियाकारक म्हणून उपयोगी पडतात  ( सूत्र  १२ ).

     

Alcl3

     

ArH

+

R·COX

ArCOR

+

HX

 ॲरोमॅटिक संयुग

 

 अल्किल  हॅलाइड

 

 कीटोन

 

 हॅलोजन अम्ल

 सूत्र ११.अरोमॅटिक संयुगाच्या असिलीकरणाने कीटोनाचे संश्लेषण.


सूत्र १२. फ्यूरानाचे ॲसिटिक ॲनहायड्राइडाने होणारे ॲसिटीलीकरण

  

  

  

  

 सूत्र १३. वलयी कीटोनाचे संश्लेषण

 सामान्यतः एकापेक्षा जास्त ॲसिल गट ॲरोमॅटिक वलयास जोडता येत नाहीत .  ऑर्थो व पॅरा स्थानी प्रतिष्ठापन करण्यास अनुकूल असे गट वलयात असतील ,  तर ॲसिल गट पॅरा स्थानी जोडला जातो .

  

    ॲरोमॅटिक संयुगाला पार्श्व शृंखला असून तीमध्ये COC I  गट असेल ,  तर ॲल्यु मिनि यम क्लोराइड उत्प्रेरक वापरून वलयी की टोने बनविता येतात .  पार्श्व शृंखलेत COOH  गट असेल ,  तर हायड्रोजन  फ्ल्यु ओराइड या उत्प्रेरकाने अशीच विक्रिया घडविता येते  ( सूत्र  १३ ).

    

  ॲरोमॅटिक आल्डिहाइडांचे संश्लेषण  : फॉर्मिल फ्ल्युओराइड हा विक्रियाकारक वापरला असता ॲरोमॅटिक संयुगातील हायड्रोजनाच्या जागी CHO  गट प्रतिष्ठापित होऊन आल्डिहाइड बनते  ( सूत्र  १४ ).

 ArH

 +

 FCHO

 ⟶

 Ar COR

 +

 HF

 ॲरोमॅटिक संयुग

  

 फॉर्मिल फ्ल्युओराइड

  

 अरोमॅटिक आल्डिहाइड

  

 हायड्रोजन फ्ल्युओराइड

 सूत्र १४.अरोमॅटिक आल्डिहाइडाचेसंश्लेषण.


 कार्बन मोनॉक्साइड व हायड्रोक्लोरिक अम्ल यांचे मिश्रण विक्रियाकारक म्हणून आणि ॲल्युमिनियम क्लोराइड व क्युप्रस क्लोराइड यांचे मिश्रण उत्प्रेरक म्हणून वापरले असताही आल्डिहाइडे निर्माण होतात  ( सूत्र  १५ ).  

 सूत्र १५. पॅरामिथिल बेंझाल्डिहाइडाचे संश्लेषण

  ॲरोमॅटिक कार्‌बॉक्सिलिक अम्लांचे संश्लेषण  :  ॲल्युमिनियम क्लोराइड हा उत्प्रेरक आणि कार्बन डायसल्फाइड हा विद्रावक म्हणून वापरला असता ॲरोमॅटिक संयुगावर कार्बोनिल क्लोराइडाची विक्रिया होऊन प्रथम अरिल क्लोराइड बनते .  त्याच्या जलीय विच्छेदनाने  ( पाण्याच्या विक्रियेने रेणूचे तुकडे करण्याने )  कार्‌बॉक्सिलिक अम्ल मिळविता येते  ( सूत्र  १६ ).

   

  ॲलिफॅटिक व सायक्लोॲलिफॅटिक संयुगांचे ॲसिलीकरण  :  ॲसिल हॅलाइडांच्या विक्रियेने ओलेफिने व सायक्लोओलेफिने यांपासून अनुरूप अतृप्त  कीटोने  बनविता येतात  ( सूत्र  १७ ).

  

  अम्ल ॲनहायड्राइडांनीही अशीच विक्रिया घडते .  ॲसिटिलिनिक संयुगांपासून बीटा क्लोरोव्हिनील कीटोने मिळतात .

  

  ॲलिफॅटिक कार्‌बॉक्सिलिक अम्लांचे संश्लेषण  :  स ल्फ्यू रिक अम्ल आणि बोरॉन ट्रायफ्ल्युओराइड हे उत्प्रेरक ,  ७५º– १००º  से .  तापमान आणि उच्च दाब  ( वातावरणीय दाबाच्या  ६००– ७००  पट दाब )  वापरून अल्किनावर कार्बन मोनॉक्साइडाची विक्रिया घडविली , तर ॲलिफॅटिक कार्‌बॉक्सिलिक अम्ले बनतात  ( सूत्र  १८ ).

 

 सूत्र १७. ॲसिल हॅलाइडाच्या विक्रियेने अतृप्त कीटोनाची निर्मिती

   

 कार्बन मोनाॅ क्साइडाऐवजी फॉर्मिक अम्ल वापरले ,  तर ही च विक्रिया  ० – ४०  से .  तापमानास व कमी दाबास घडून येते .

 

   सूत्र १८ . अलिफॅटिक कार् ‌ बॉक्सीलिक अम्लाचे संश्लेषण


 सल्फॉनीकरण  :  [⟶  सल्फॉनीकरण ] .  हायड्रोजन फ्ल्युओराइड किंवा बोरॉन ट्रायफ्ल्युओराइड हा उत्प्रेरक वापरला , तर ॲरोमॅटिक हायड्रोकार्बनां चे सल्फॉनीकरण होऊन सल्फानिक अम्ले बनतात  ( सूत्र  १९ ).  

 

 सूत्र १९ .  अरोमॅटिक हायड्रोकार्बनाचे सल्फॉनीकरण  

   

  सल्फो निलीकरण  :  सल्फॉनिक हॅलाइडे किंवा सल्फानिक अम्ल ॲनहायड्राइडे यांची ॲरोमॅटिक हायड्रोकार्बनावर विक्रिया ॲल्युमिनियम क्लोराइड हा उत्प्रेरक वापरून घडविली म्हणजे सल्फो निलीकरण होऊन सल्फाॅ न वर्गाची संयु गे बनतात .

  

  नायट्रीकरण  :  स ल्फ्यू रिक व परक्लोरिक ही प्रोटॉ न अम्ले आणि बोरॉन ट्रायफ्ल्युओराइड , ॲ ल्युमिनियम क्लोराइड ,  फेरिक क्लोराइड इ .  ल्यू इस अम्ल हॅलाइ डे उत्प्रे रक म्हणून वापरून नायट्रिक अम्लाने ,  त्याचप्रमाणे नायट्रिल क्लोराइड आणि डाय नायट्रो जन पेंटाक्साइड या विक्रियाकारकांनी ॲरोमॅटिक हायड्रोकार्बनांचे नायट्री करण घडविता येते .  [⟶  नायट्री करण ] .

  

   हॅलोजनीकरण  :  क्लोरीन ,  ब्रोमीन व आयोडीन किंवा आयोडिन मोनोक्लोराइड ,  ब्रोमीन मोनोक्लोराइड या विक्रियाकारकांनी फेरिक क्लोराइड ,  ॲल्युमिनियम क्लोराइड  इ. उत्प्रेरक वापरून ॲरोमॅटिक हायड्रोकार्बनांचे हॅलोजनीकरण करता येते .  [⟶  हॅलोजनीकरण ] .

  

  समघटकीकरण :    n– ब्यूटेन व त्यासारख्या सरळ कार्बन शृंखला असलेल्या हायड्रोकार्बनाचे समघटकी क रण करून आयसोब्युटेन व तत्सम हायड्रोकार्बने मिळविता येतात .  याकरिता ॲल्युमिनियम क्लोराइड ,  बोरान ट्रायफ्ल्युओराइड ,  स ल्फ्यू रिक अम्ल इ .  उत्प्रे र क वापरण्यात येतात [⟶  समघट की करण ] .

  बहुवारिकीकरण  :  ॲ ल्युमिनियम क्लोराइड ,  बोराॅ न ट्रायफ्ल्युओराइड इ .  ल्यू इस अम्लांच्या उत्प्रेरण क्रियेने आयसो – ब्युटिली न ,  स्टायरीन ,  आल्फा मिथिल स्टायरीन , ब्युटाडा इ न आणि व्हिनिल आल्कि ल ईथरे यांचे बहुवारिकीकरण घडविता येते .  गॅसोलिना सारखी इंधने ,  वंगणे व उच्च रेणुभाराची बहुवारिके बनविण्यासाठी या विक्रियेचा उपयोग होतो [⟶  बहुवारिकीकरण ] .

  

   उपयोग  :  डीडीटी ,  फिनॉलप्थॅलीन ,  एथिल बेंझीन ,  क्युमीन ,  ॲसिटोफेनोन ,  प्रोपियोफेनोन इ .  उपयुक्त संयुगे ,  तसेच गॅसोली न व प्रक्षालके  ( वस्तू स्वच्छ करण्यासाठी वापरण्यात येणारे संश्लेषित पदार्थ  डिटर्जंट्स )  बनविण्यासाठी आणि प्लॅस्टिके व कृ त्रि म रबरे इत्यादीं साठी उपयोगी पडणारी अनेक बहुवारिके तयार करण्याकरिता ,  त्याचप्रमाणे रासायनिक संशोधनात ही विक्रिया उपयोगी पडते .

  

 संदर्भ : 1. Mark, H. F. MacKetta, J. J Othmer, D. F., Ed. Kirk-Othmer Encyclopedia of Chemical Technology, Vol. 10 , New York,  1966 .

           2. Olah, G. A., Ed.,  Friedel-Crafts and Related Reactions,  4  Vols ., New York,  1963 – 65 .  

 केळकर ,  गो .  रा .   मिठारी ,  भू .  चिं .