फोरोनिडा : सागरी जीवांचा एक लहानसा संघ आहे. या प्राण्यांच्या अनन्य शरीररचनेमुळे व त्यांचा इतर गटांतील प्राण्यांशी स्पष्टपणे संबंध जोडता येत नसल्यामुळे या सापेक्षतःएकजिनसी असलेल्या गटाचा वेगळा संघ मानण्यात आलेला आहे. ⇨ ॲनेलिडा (वलयी संघ), ⇨ मॉलस्का (मृदुकाय संघ) व ⇨ कॉर्डेटा (रज्‍जुमान संघ) या संघांतील प्राण्यांशी या प्राण्यांचा संबंध जोडण्याचे प्रयत्‍न पूर्वी करण्यात आलेले होते. या लहान संघात फोरोनिसफोरानॉप्सिस हे दोन वंश असून सु.१६ जाती ओळखण्यात आलेल्या आहेत. येथे सर्वसामान्यतः फोरोनिस या वंशातील प्राण्यांचे वर्णन केलेले असून त्यावरून या संघातील प्राण्यांची वैशिष्ट्येलक्षात येतील.

आ. १. फोरोनिडा : फोरोनिस सॅमोफिला : (१) वालुका कणांनी व प्राण्यांच्या छोट्या कवचांनी आच्छादिलेल्या नलिका, (२) संस्पर्शकांचे वलय.

  हे प्राणी नितलस्थ (समुद्राच्या तळाशी राहणारे) आहेत. हे प्राणी समूहजीवन जगत असले, तरी या समूहातील प्राण्यांचे एकमेकांशी आंगिक संबंध नसतात. ते वैयक्तिक स्थानबद्ध जीवन जगतात. प्रत्येक प्राणी आपल्या शरीरातील विशिष्ट प्रकारच्या स्‍त्रावाने स्वतःच तयार केलेल्या नलिकेत राहतो. या नलिकेत त्याला स्वतःच्या शरीराचे आकुंचन करता येते. ही नलिका तयार होण्यास शरीराच्या अग्रभागापासून सुरूवात होते. हा स्‍त्राव प्रथम घनरूप होऊन त्यापासून शरीरावर एक पारदर्शक आवरण तयार होते. लवकरच हे आवरण अपारदर्शक होऊन त्यावर रेतीचे बारीक कण, शंखांचे बारीक तुकडे, स्पंजाचे काटे वगैरे चिकटतात व यामुळे नलिकेत राहणाऱ्या जीवाला इतर प्राण्यांपासून संरक्षण मिळते. या नलिका समुद्रतळावर विखुरलेल्या अवस्थेत अथवा खडकांना चिकटलेल्या आढळतात. यूरोप, उत्तर व दक्षिण अमेरिका, ऑस्ट्रेलिया, आशिया आणि दक्षिण आफ्रिका या प्रदेशांच्या आसपासच्या उष्ण कटिबंधी व समशीतोष्ण उथळ समुद्रांत हे प्राणी पुष्कळदा आढळतात.

  फोरोनिडांच्या नलिका उथळ समुद्राच्या भरती-ओहोटीच्या भागात तळाच्या वाळूत अगर चिखलात वरवर पुरलेल्या आढळतात किंवा एखाद्या खडकावर या नलिकांचे एकमेकांत गुंतलेले जाळे आढळते. कित्येक वेळा नलिका खडकांच्या भेगांमध्ये किंवा शिंपल्यासारख्या मृदुकाय प्राण्यांच्या कवचात सापडतात. ध्रुवीय प्रदेशातील समुद्रामध्ये हे प्राणी विशेषेकरून आढळत नाहीत.

  शरीररचना व कार्य : फोरोनिडाच्या शरीराची लांबी निरनिराळ्या जातींत एक सेंमी. पेक्षाही कमी१५सेंमी. इतकी असू शकते. त्याचे शरीर लांबट दंडगोलाकार असून त्याचा व्यास सरासरी३ मिमी. असतो. तोंडाकडील बाजूला, तोंडाभोवतीच संस्पर्शकांचा (स्पर्शज्ञान, शोध घेणे, पकडणे वा चिकटणे इ. कार्यांसाठी उपयोगात आणल्या जाणाऱ्या लांब, सडपातळ व लवचिक इंद्रियांचा) मोठा झुबका असतो. या संस्पर्शकांच्या वलयाकार रचनेस ‘लोफोफोर’ असे म्हणतात. तोंडाचा आकार सामान्यतःचंद्रकोरीसारखा असून संस्पर्शकत्याच्या भोवती एकात एक दोन वलयांत असतात. निरनिराळ्या जातींमध्ये संस्पर्शकांची संख्या६० पासून३०० पर्यंत असू शकते. प्रत्येक संस्पर्शकावर पक्ष्माभिका (ज्यांच्या लयबद्ध फटकाऱ्यांनी प्राणी एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतात वा द्रव पदार्थात प्रवाह उत्पन्न होतात अशा केसासारख्या संरचना) असतात. ह्या पक्ष्माभिकांच्या सतत होणाऱ्या हालचालींमुळे पाण्यात जो प्रवाह तयार होतो त्याचा उपयोग अन्नकण तोंडाच्या दिशेकडे लोटण्यासाठी होतो. गुदद्वार तोंडाजवळच असते व त्यातून बाहेर पडलेली उत्सर्जित (निरूपयोगी म्हणून टाकून दिलेली) द्रव्ये दूर वाहून नेण्यासही या प्रवाहाचा उपयोग होतो.

  संस्पर्शकांची टोके गुंडाळली जाऊन दोन सर्पिले बनतात व या सर्पिलांच्या बुडाशी दोन पक्ष्माभिकामय खड्डे असतात. यांचे कार्य ग्रंथींसारखे असावे व यांच्या स्‍त्रवणापासूनच फोरोनिडांच्या नलिका तयार होत असाव्यात.  

त्वचेवर अधित्वचेच्या स्‍त्रवणापासून तयार झालेल्या उपत्वचेचे आवरण असते. अधित्वचेच्या खाली आधारकला (आधार देणारे पटल) आणि त्याखाली वर्तुळाकार व अनुदैर्ध्य (शरीराच्या लांबीला समांतर असणाऱ्या दिशेतील) स्‍नायूंच्या तंतूंचा थर असतो. या थरावर पट्टकीय (सपाट व दृढ संरचना असलेल्या) कोशिकांचे (पेशींचे) आवरण असते. देहगुहेच्या (शरीरातील पोकळीच्या) सर्व बाजूंस या पट्टकीय कोशिका असतात.

  देहगुहेचे आडवे विभाजन एका पटलाने होते. हे पटल संस्पर्शकांच्या खालील थरावर शरीराच्या एका बाजूपासून दुसऱ्या बाजूपर्यंत पसरलेले असते. या विभाजनाने निर्माण झालेली देहगुहेची अग्रपोकळी संस्पर्शकांच्या पोकळीशी संलग्‍न असते. रक्तवाहिन्या व ग्रसिका (घशापासून जठरापर्यंतचा अन्ननलिकेचा भाग) पश्च (मागील) पोकळीतून या पटलास छेदून अग्र पोकळीत जातातपण गुदद्वारासहित बाकीचा आहारानाल (अन्नमार्ग), वृक्कके (नलिकाकार मूत्रपिंडे) आणि जनन ग्रंथी हे सर्व देहगुहेच्या पश्च पोकळीतच असतात. देहगुहा तीन अनुदैर्ध्य आंत्रबंधांनीही (अन्नमार्गाला आधार देणाऱ्या बंधांनीही) विभागलेली असते. हे आंत्रबंध अन्नमार्गापासून देहभित्तीपर्यंत गेलेले असतात.

  गुदद्वार व तोंड एकाच टोकाला जवळजवळ आल्यामुळे आहारनालाचा आकार इंग्रजीU अक्षरासारखा होतो. संस्पर्शकाच्या वलयाच्या बाहेरच्या बाजूस असलेल्या एका उंचवट्यावर गुदद्वार असते. तोंड व गुदद्वार यांना विभागणारी देहभित्तीची एक झडप असते. ग्रसिका, जठर, आंत्र (आतडे) आणि गुदांत्र (मलाशय) एवढेच आहारनालाचे भाग असतात. पहिले तीन भाग पक्ष्माभिकायुक्त असतात. काही जातींमध्ये ग्रसिका व जठर यांच्या मध्ये एक स्‍नायुमय झडप असते. शरीराच्या दुसऱ्या टोकापर्यंत जठर पसरलेले असून तेथून आहारनाल परत तोंडाकडे वळल्यावर आंत्र सुरू होते. सूक्ष्म प्लवक (समुद्र, नद्या, सरोवरे इत्यादींच्या पाण्यात तरंगणारे प्राणी व वनस्पती) व सूक्ष्मजीव हा या प्राण्यांचा प्रमुख आहार असून काही वेळा यांच्या आहारनालामध्ये डायाटमांची (लहान गोळ्या ठेवण्याच्या डबीसारखे शरीर असलेल्या आणि एकाच कोशिकेच्या बनलेल्या अतिसूक्ष्म वनस्पतींची) कवचेही आढळली आहेत.

  संस्पर्शक पोकळ नळीसारखे असतात व त्यांना रक्ताचा पुरवठा करणारी रक्तवाहिनी असते. तशीच एक तंत्रिकाही (मज्‍जाही) असते. कॉरी या शास्‍त्रज्ञांना असे आढळले की, काही वेळा फोरोनिस सॅमोफिला या जातीच्या प्राण्यांच्या संस्पर्शकांचा नाश झालेला असतो व काही काळाने त्याच जागी नवे संस्पर्शक तयार होतात. यावरून असेअनुमान निघते की, या प्राण्यांत इंद्रियाच्या पुनरूत्पादनाची क्षमता असावी.

  फोरोनिसाच्या वैशिष्ट्यांत त्याचे वाहिनीमय रक्ताभिसरण तंत्र (संस्‍था) हे एक महत्त्वाचे वैशिष्ट्यहोय. केंद्रकयुक्त (कोशिकेतील कार्यावर नियंत्रण ठेवणाऱ्याजटिल गोलसर पुंजांनी युक्त असलेल्या) दीर्घवर्तुळाकार चपट्यालाल कोशिका रक्तात आढळतात. या कोशिकांमध्ये मानवी रक्तात आढळणाऱ्याहीमोग्‍लोबिनासारखे असणारे हीमोग्‍लोबिन हे रंगद्रव्य असते. अभिवाही (इंद्रियाकडे रक्त आणणारी)

आ. २. फोरोनिस बस्काय : नलिकेतून बाहेर काढलेला व मागील बाजूकडून दिसणारा प्राणी.

 रक्तवाहिनी व अपवाही (इंद्रियाकडून रक्त नेणारी) रक्तवाहिनी अशा दोन मुख्य रक्तवाहिन्या शरीराच्या संपूर्णलांबी भर एकमेकींना समांतर जातात. यांपैकी अभि‌वाही रक्तवाहिनी गुदांत्र कप्प्यात, U आकाराच्या आहारनालाच्या दोन नलि‌कांच्या मध्ये असते. या रक्तवाहिनीचे दोन रक्तवाहिन्यांत विभाजन होते या रक्तवाहिन्यांतून पुढे लहान रक्तवाहिन्या निघून संस्पर्शकांना रक्‍ताचा पुरवठा करतात.याला समांतरच लहान रक्तवाहिन्या संस्पर्शकातून निघून रक्तबाहेर घेऊन जातात व यांच्या संयोगापासून पुढे अपवाही रक्तवाहिनी तयार होते व ती अ‌भि‌वाही रक्तवाहिनीस समांतर अशी शरीराच्या मागील टोकापर्यंत जाते. येथे रक्तवाहिन्यांचे जाळे असते. याच जाळ्याभोवती एक जेलीसदृशऊतक (समान रचना आणि कार्यअसलेल्या कोशिकांचा समूह) असते, याला ‘वसापिंड’ म्हणतात. या ऊतकाच्या अर्धद्रव कोशिकांमध्ये आढळणाऱ्याविविध आकाराच्या व आकारमानाच्या कणांपैकी काही ग्वानीन या उत्सर्जित द्रव्याचे, तर काही हीमोग्‍लोबिनाच्या रेणूंचे तुकडे होऊन तयार झालेले असावेत. या प्राण्यात दोन वृक्कके असतात. ती नलि‌केची बनलेली असतात. ही नलिका एका बाजूने देहगुहेत तर दुसऱ्याबाजूने शरीराबाहेर उघडते. बाहेरील तोंड गुदद्वाराच्या बाजूस असते. ही ‌नलिका आडव्या विभाजन पटलाच्या खाली देहगुहेत गेल्यावर विभाजन पावते. प्रत्येक विभागलेल्या नलिका भागाच्या तोंडावर एक नसराळ्यासारखे पक्ष्माभि‌का असलेले इं‌द्रिय असते. या दोन इंद्रियांपैकी लहान इंद्रिय बाजूच्या अनुदैर्घ्य आंत्रबंधास भेदून बाजूच्या देहगुहेत शिरलेले असते, तर मोठे इंद्रिय देहगुहेच्या गुदांत्रीय भागात आढळते. ह्यावृक्ककांची सर्व नलि‌का आतून पक्ष्माभि‌कायुक्तअसते. या नलिकेतूनदेहगुहेत विसर्जीत झालेले उत्सर्गी द्रव्य बाहेर टाकले जाते.

  फोरोनिसाचे तं‌त्रिका तंत्र (मज्‍जासंस्था) अधि‌त्वचेच्या खाली असते. या प्रकारची तंत्रिका तंत्र व्यवस्था ही आद्यप्रकारची समजली जाते. तं‌त्रिका-ऊतक शरीरात सर्वत्र पसरलेले असले, तरी त्याचे केंद्रीभवन तोंडाजवळ होऊन वलयाकृती आकार घेते व या वलयातूनच सूक्ष्म तं‌त्रिका संस्पर्शिकांकडे जातात. गुदद्वार या तंत्रिका वलयाच्या बाहेर असते. या प्राण्यात इतर ज्ञानेंद्रिये आढळत नाहीत.

  प्रजोत्पादन :फोरोनिस हा उभयलिंगी (पुं- आणि स्‍त्री-जननेंद्रिये एकाच व्यक्तीत असणारा) प्राणी आहे. वृषण (पुं-जनन ग्रंथी) आणि‌ अंडकोश (स्‍त्री-जनन ग्रंथी) हे पांढऱ्यारंगाच्या ऊतकांच्या लहान दोन गोळ्यांच्यारूपात असून ते उदराच्या वर, अपवाही रक्तवाहि‌नीच्या दोनबाजूंसअसतात. याग्रंथींनारक्तपुरवठाउत्तमहोतो. तसेपाहि‌लेतरयाग्रंथींचीवाढचयारक्तवाहिनीवरअसलेल्याउपकलाअस्तरापासूनहोते. अंडी (स्‍त्री-जननकोशिका) वशुक्राणू (पुं-जननकोशि‌‌का) तयारझाल्यावरदेहगुहेत 

आ. ३. फोरोनि‌स ऑस्ट्रॅलिस (पृष्ठीय दृश्य) : (१) तोंड, (२) तोंड व गुदद्वार यांना विभागणारी देहभितीची झडप, (३) संस्पर्शकांच्या आतील वलयातील खंडीत भाग, (४) डाव्या वृक्ककाचे छिद्र, (५) गुदद्वार, (६) संस्पर्शक (संस्पर्शकांची मांडणी दाखविण्यासाठी डावीकडील संस्पर्शक कापून टाकलेले व उजवीकडील सर्वांत आतील आखूड दाख‌विले आहेत प्रत्यक्षात हे सर्व संस्पर्शक सारख्याच लांबीचे असतात).सोडलीजातातवतेथूनतीवृक्ककाच्या नालिकेद्वारे बाहेर फेकली जातात. बाहेर समुद्राच्या पाण्यात अंड्याचे निषेचन (फलन) होते. निषेचित अंड्याची वाढ काही काळपर्यंत तोंडाजवळील संस्पर्शिकांच्या जाळ्यात होते व यातून ॲक्टिनोट्रोका नावाचा डिंभ (भ्रूणानंतरची स्वतंत्रपणे अन्न मिळवून जगणारी आणि प्रौढाशी साम्य नसणारी सामान्यतः क्रियाशील पूर्व अवस्था) बाहेर पडतो. या डिंभावर पक्ष्माभि‌कायुक्तसंस्पर्शकांचे वलय असते व तोंडावर एक लहानशी स्‍नायुमय ऊतकाची पडदी असते. ही दोन ॲक्टिनोट्रोकाडिंभाची वैशिष्ट्येम्हणून ओळखली जातात.

  ॲक्टिनोट्रोका डिंभ जवळजवळ महिनाभर पाण्यात मुक्तपणे पोहत असतो. या वेळी तो प्लवक जीवांवर जगतो व त्याची झपाट्याने वाढ होते. यानंतर तो तळावर जाऊन चिकटतो व रूपांतरणाने त्याचे फोरोनि‌ड प्राण्यात रूपांतर होते.

  काही वेळा अलैंगिक रीतीने देखील यांचे प्रजोत्पादन होते. या प्रकारात प्राण्याच्या शरीराचे अनेक तुकडे होतात व प्रत्येक तुकड्यापासून नवीन प्राणी तयार होतो.

संदर्भ : 1. Harmer, S. F. Shipley A. E., Ed., The Combridge Natural History., Vol. II, Codicote, 1968 

            2. Hyman, L. H. The Invertebrates, Vol. V. New York, 1959.

इनामदार, ना. भा. जोशी, लीना