अब्राकाडब्रा : पश्चिमी जादूतील एक मंत्र एक गूढार्थक शब्द. अस्पष्ट अर्थाच्या व गंभीरपणे उच्चारलेल्या वाक्यास वा शब्दप्रयोगास लाक्षणिक अर्थाने ‘अब्राकाडब्रा’ म्हणतात. प्राचीन हिब्रू भाषेतील ‘आशीर्वाद’ या अर्थाच्या शब्दावलीचे हे अपभ्रष्ट रूप आहे, असे एका संशोधकाचे मत आहे.

जोशी, लक्ष्मणशास्त्री