सिंध : (सिंद). पाकिस्तानमधील एक प्रांत. हा पाकिस्तानच्याआग्नेय भागात असून १९७० मध्ये पुनर्रचित झाला. याच्या पश्चिमेस वउत्तरेस बलुचिस्तान, ईशान्येस पंजाब हे पाकिस्तानचे प्रांत आहेत, तरपूर्वेस राजस्थान व गुजरात ही भारताचीराज्येआणि दक्षिणेस अरबीसमुद्र आहे. सिंधू नदीच्या त्रिभुज प्रदेशातील हा महत्त्वाचा भाग असून,सिंधू नदीवरुनच या प्रांतास ‘सिंध’ हे नाव पडले आहे. अरबी समुद्रकिनाऱ्यावरील कराची हे या प्रांताचे मुख्यालय आहे. क्षेत्रफळ१,४०,९१४चौ. किमी. लोकसंख्या सु. ३,४२,४०० (२००३).

विद्यमान सिंध प्रांत हा प्राचीन सिंधू संस्कृतीचे प्रमुख केंद्र होय. येथीलमोहें-जो-दडो, आमरी, कोटदिजी इ. स्थळेपुरातत्त्वीय अवशेषांसाठीप्रसिद्घ आहेत. सिंधू संस्कृतीचा काल इ. स. पू. २५००–१७५०मानण्यात येतो. त्यानंतर पहिल्याडरायस (कार. इ. स. पू. ५२२–४८६)राजाच्या काळापर्यंतचा इतिहास अस्पष्ट आहे. त्यानंतर सु. दोन शतकानंतर अलेक्झांडर द ग्रेट (कार. इ. स. पू. ३५६–३२३) याने हा प्रदेशपादाक्रांत करुन तिथे क्षत्रप नेमला. त्याच्या मृत्यूनंतर सेल्यूकस पहिलानिकेटर व पहिला चंद्रगुप्त मौर्य यांच्या साम्राज्यांतर्गतहा प्रदेश काहीवर्षे होता. इ. स. पू. दुसऱ्याशतकात सिथियन व नंतर कुशाण (इ. स.पू. पहिले ते इ. स. तिसरे शतक) वंशाच्या आधिपत्याखाली सिंधअसताना सिंध-मधील बहुसंख्य लोकांनी बौद्घ धर्माचा अंगीकार केला.कुशाणांनंतर सिंधवर इराणच्या सॅसॅनिडी वंशाची सत्ता प्रस्थापित झाली.

अरबांनी इ. स. ७११ मध्ये सिंधवर स्वारी करुन ती पादाक्रांत केला.त्यांच्या विजयामुळे भारतीय उपखंडात इस्लामचा प्रवेश झाला. त्यानंतरया प्रदेशावर अनुक्रमे उमय्या (६६१– ७५०) आणि अब्बासी (७५०–१२५८) या खिलाफतींतीलखलिफांनी आपल्या साम्राज्याचाएकप्रशासकीय विभाग करुन सिंधवर राज्यपालनेमला. या विभागाचे मुख्यालयहैदराबादच्या उत्तरेला सु. ७२ किमी.वर अल्-मन्सूर येथे होते पणखलिफांच्या अकार्यक्षम कारभारामुळे राज्यपालशिरजोर होऊन त्यांनी वत्यांच्या वंशजांनी सिंधवर दहाव्या ते सोळाव्या शतकाअखेर अधिसत्तागाजविली. त्यानंतर सिंध मोगल अंमलाखाली आला (१५९१–१७०८).ब्रिटिशांनी तेथील स्थानिक सत्ताधिशांकडून तो हस्तगत केला (१८४३).पुढेतो मुंबई इलाख्यात समाविष्ट करण्यात आला. अव्वल इंग्रजी अमदानीत१९३७ मध्ये तो स्वतंत्र प्रांत करण्यात आला.पाकिस्तानच्या निर्मितीनंतर त्याचा अंतर्भाव पश्चिम पाकिस्तानचा एक प्रांत म्हणून करण्यातआला. १९७१ मध्ये त्यास स्वतंत्र प्रांताचा दर्जा प्राप्त झाला.

सिंध प्रांताचे तीन समांतर दक्षिणोत्तर भूपट्टे हे भूवैशिष्ट्य आहे :(१) पश्चिमेकडील कीर्थर पर्वतरांग. ही तीन समांतर स्तरांच्या उंचचिंचोळ्या कटकांची बनलेली आहे. यामध्ये सुपीक जमिनीचा भागअगदीच कमी असून, बहुतांशी जमीन कोरडवाहू व नापीक (ओसाड)आहे. (२) सिंधू नदीखोऱ्यातील मध्यवर्ती गाळाची मैदाने (जलोढ). हीसुपीक मध्यवर्तीमैदाने सिंधू नदीमुळे बनलेली आहेत. मैदानांची लांबीसु. ५८० किमी. व क्षेत्रफळ सु. ५१,८०० चौ. किमी. असून, तीउत्तरेकडून दक्षिणेकडे क्रमाक्रमाने उतरती आहेत. (३) पूर्वेकडीलवाळवंटी पट्टा. या वाळवंटी प्रदेशात उत्तरेकडे कमीउंचीच्या टेकड्या  वसपाट भाग आहे, तर दक्षिणेकडे ‘आच्चर्रो थर’ (पांढऱ्या वाळूचे वाळवंट)असून आग्नेयीस थर वाळवंट आहे.

सिंध प्रांतात उन्हाळे अतीउष्ण व हिवाळे अती थंड असतात. मे वऑगस्टमध्ये ४६° से. पर्यंत तापमान असते, तर डिसेंबर व जानेवारीमध्ये कमीत कमी तापमान २°  से. असते. वार्षिक सरासरी पर्जन्यमान१८० मिमी. असून पाऊस मुख्यतः जुलै व ऑगस्ट महिन्यांत पडतो.

सिंधू नदीखोऱ्यातील जलसिंचन क्षेत्राशिवाय सिंध प्रांतातील इतरभूभाग ओसाड असून वनस्पतीतुरळक आहेत. आखूड पाम, खैर वआयोचिरा हे वृक्ष आणि जांद, करील, बकीन ही झुडुपे आढळतात.यांस ‘राख’ जंगले म्हणतात. नदीखोऱ्यात शिसव व बाभूळ हे वृक्षविपुल असून सिंधू नदीच्या दोन्ही किनाऱ्यांवर त्यांची घनदाट जंगलेआहेत. त्यास ‘बेला’ म्हणतात. तसेच समुद्रकिनारपट्टी व खाड्यांमध्येविविध प्रकारच्या पाणवनस्पती विपुल प्रमाणात आढळतात. त्यास कच्छवनस्पतींची खाजणीची जंगले म्हणतात. सिंधूच्या त्रिभुज प्रदेशातरानडुक्कर, अजगर, सुसर, तसेच पाणकोंबडे, खोकड, रानमांजर, कोल्हाहे प्राणी आढळतात. कच्छच्या रणास लागून असणाऱ्या प्रदेशातरानगाढवांचे तुरळक कळपही दिसून येतात.

मोठ्या प्रमाणात गैरमार्गाने स्थलांतरित लोक आल्यामुळे सिंधप्रांतातील लोकसंख्या वांशिकदृष्ट्या संमिश्र बनली आहे. मेहस किंवामुहान्नास, मेडस, अम्मास हे सिंधमधील मूलनिवासी असून लाखास,लोहानास, निगमरस, कहाहस, चन्नास, सहतास, भट्टीस हे त्यांच्याशीसंबंधित गट आहेत. तसेच मूळ राजपूतवंशाचे ठाकूर, जाट आणिलोर्रास हे प्राचीन सिथियनवंशात मिसळले गेले. आठव्या शतकात सिंधप्रांतात इस्लाम धर्माचे आगमन झाल्यामुळे अरब, इराणी व तुर्कीलोकांनी तेथेकायम वसाहती केल्या. यामध्ये बलुची लोक बहुसंख्येनेहोते. तेराव्या शतकात बलुची लोकांनी सिंधमध्ये स्थलांतर करण्याससुरुवात केली आणि बलुचिस्ताननंतरचा त्यांचा दुसरा स्वदेश सिंध प्रांतझाला. तसेच १९४७ मध्ये भारतपाकिस्तान फाळणीमुळे भारतातूनमुस्लिम निर्वासितांचा लोंढा सिंधमध्ये आल्यामुळे आणखी एक मोठाबदल लोकसंख्येतझाला. सध्याच्या एकूण लोकसंख्येत भारतातूनआलेले निर्वासित मुस्लिम हे बहुसंख्येने आहेत.

सिंधी, सेराईकी आणिबलुची या सिंध प्रांतातील मुख्य मूळ भाषाआहेत. १९४७ नंतर भारतातून अनेक बहुभाषिक जनसमूह सिंधमध्येआल्यामुळेनागरी भागातसुद्घा अनेक भाषा बोलल्या जाऊ लागल्याआहेत. त्यांपैकी उर्दू ही सर्वसामान्य भाषा असून त्याचबरोबरपंजाबी,गुजराती आणि राजस्थानी भाषासुद्घा बोलल्या जातात. राष्ट्रीय कार्यालयीन कामकाजाची भाषा उर्दू असून शाळांमध्ये सिंधी भाषेबरोबरचउर्दूही शिकविली जाते. सिंध प्रांताच्या लोकसंख्येत प्रामुख्याने बहुसंख्यमुस्लिम आहेत.

सिंध प्रांतामध्ये १९४७ पासून लोकसंख्या झपाट्याने वाढली आहेआणि ती मुख्यतः शहरांमध्ये व जलसिंचन असलेल्या मध्यवर्तीखोऱ्यात केंद्रित झाली आहे. तसेच नागरीकरणाचा वेगही झपाट्यानेवाढतो आहे. पाकिस्तानातील मोठ्या शहरांपैकी ⇨ कराची  आणि⇨हैदराबाद  ही दोन मोठी शहरे सिंध प्रांतात आहेत.


शेती हा सिंध प्रांताच्या अर्थव्यवस्थेचा पाया आहे. सिंधमधीलशेतीची उत्पादनक्षमता मुख्यतः १९६१ नंतर वाढली कारण प्रगत कृषीसंशोधन, अकार्बनीजोरखताचा (वरखताचा) वापर, जमिनीतील क्षारताव पाणथळ (दलदल) यांची योग्य विल्हेवाट इ. कारणांनी कृषीउत्पादनात वाढ झाली आहे. सिंधमधील सर्वांत मोठ्या गुडू बंधाऱ्यातून जलसिंचनासाठी पाणीपुरवठा केला जातो. कापूस, गहू, साळ, ऊस,मका, ज्वारीआणि तेलबिया ही मुख्य पिके होत. तसेच अनेक प्रकारच्याफळबागा असून त्यांत आंबा, पेरु, केळी, संत्री, खजुराची झाडे यांसारख्याफळझाडांची लागवड नदीखोऱ्यात केली जाते. गुरे पाळणे व पैदासकरणे हादेखील महत्त्वाचा व्यवसाय असून त्यामध्ये गाय, बैल, म्हैस,मेंढी आणि बकरी ही जनावरे प्रामुख्याने पाळतात. सिंधच्या समुद्रकिनारीभागात झिंगे, कोळंबी, पॉम्फ्रेट (पापलेट), शॅड आणि मांजर मासे विपुलप्रमाणात सापडतात.

सिंध हा पाकिस्तानातील सर्वांत जास्त औद्योगिकीकरण झालेल्याप्रदेशांपैकी एक आहे. स्थूलमानाने निर्मितिउद्योगांचे केंद्र कराची येथेआहे. संपूर्ण देशाला लागणाऱ्या कच्च्या कापसाचे उत्पादन करणारा हाप्रांत देशाचे एक महत्त्वाचे औद्योगिक केंद्र आहे. या ठिकाणी देशातीलकापडगिरण्यांपैकी सर्वांत जास्त कापडगिरण्या आहेत. तसेच येथेमोठमोठेसिमेंट कारखाने असून ते पाकिस्तानच्या एकूण सिमेंट उत्पादनापैकी सर्वांत जास्त उत्पादन काढतात. त्याचप्रमाणे येथेसाखरउद्योगमोठ्या प्रमाणात असून या भागात अनेक साखर कारखाने आहेत.कराचीमध्ये पोलाद उत्पादनाचे व मोटारगाड्यांचे कारखाने आहेत.

दोन मुख्य महामार्ग सिंधू नदीच्या पूर्व व पश्चिम काठाने सिंध प्रांतातूनदक्षिण-उत्तर जातात. कराची हे रस्त्याने व लोहमार्गाने लाहोर व क्वेट्टा याशहरांशी जोडले आहे, तर सिंधू नदी व तिच्या कालव्यांचा मुख्यजलमार्ग म्हणून फारपुरातन काळापासून उपयोग होत आहे. या जलमार्गांचा वापर सध्या मुख्यतः धान्यवाहतुकीसाठी व इतर कृषी उत्पन्नाच्या वाहतुकीसाठी केला जातो.

सिंध प्रांतातील कराची हे पाकिस्तानातील मोठे शहर असून सर्वोत्तममुख्य बंदर आहे. येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. राष्ट्री य वर्तानपत्रांचेप्रकाशन-वितरणाचे हे मुख्य केंद्र असून येथे कराची विद्यापीठ आहे.व्यापार, उद्योगधंदे व शिक्षण याक्षेत्रांतही कराचीला पाकिस्तानी जनजीवनातविशेष महत्त्व आहे. हैदराबाद हे दुसरे मोठे शहर असून, येथेसिंध विद्यापीठ,सिंध-प्रांतिक वस्तुसंग्र हालय व ग्रंथालय आणि सिंधीअदबी मंडळ आहे. सिंधी अदबी मंडळ ही सिंधी संस्कृति-साहित्य प्रकाशित करणारी प्रमुख संस्था आहे.

कुंभारगावकर, य. रा.