कुकरनाग : जम्मू व काश्मीर राज्याच्या अनंतनाग जिल्ह्यातील हवा खाण्याचे ठिकाण. लोकसंख्या १,७२३ (१९७१). हे श्रीनगरपासून ८० किमी. असून येथील झऱ्याचे पाचक पाणी प्रसिद्ध आहे. आसमंतातील सृष्टिशोभा पाहण्यासाठी येथे प्रवासी येतात. येथून जवळच झेलम नदीचे केरीनाग हे उगमस्थान आहे.

दातार, नीला