ओसाड प्रदेश : जेथे लोकवस्ती नसते किंवा असलेली लोकवस्ती उठून गेलेली असते असा प्रदेश. सामान्यतः जगातील वाळवंटी प्रदेश, बर्फाच्छादित ध्रुवप्रदेश, समुद्रापासून दूरवर असलेले रुक्ष प्रदेश यांचा यात समावेश होतो. डोंगराळ वा अरण्यमय प्रदेशाचा मात्र ते निर्जन असले तरी यात समावेश होत नाही. 

पहा : ध्रुव प्रदेश रुक्ष प्रदेश वाळवंटी प्रदेश.

कुमठेकर, ज. ब.