उटिका : अमेरिकेच्या न्यूयॉर्क राज्यातील औद्योगिक शहर. लोकसंख्या ९१,६११ (१९७०). हो मोहॉक नदीकाठी, ऑल्बनीच्या वायव्येस १४६ किमी. आहे. लोहमार्ग, जलमार्ग आणि हमरस्ता तसेच समृद्ध कृषी आणि दुग्धोत्पादक प्रदेशाचे सान्निध्य यांमुळे उटिकामध्ये उद्योगधंदे वाढले. कापड, धातुकाम, यंत्रे, कागद, छोटी शस्त्रास्त्रे, विद्युत् उपकरणे इत्यादींचे उद्योग येथे चालतात. शिक्षण व कला यांचे हे केंद्र असून शहराच्या आसपासची उद्याने तसेच ॲडिराँडॅक गिरिउद्यानामुळे उटिकाला प्रवासी भेट देतात.

लिमये, दि. ह.