इस्लामाबाद : पाकिस्तानची राजधानी, येथील लोकसंख्या २,३५,००० (१९७२). ही रावळपिंडीच्या ११ किमी. ईशान्येस पोटवार पठारावर १९५९ मध्ये वसविण्यास सुरुवात झाली. राजधानीसाठी अतिशय सुरक्षित म्हणून ही जागा पसंत करण्यात आली. नव्या शहरात मध्यवर्ती शासनाच्या प्रमुख केंद्र कचेऱ्या आहेत. अद्याप शहर योजनाबद्ध बांधले जात आहे. हे रावळपिंडीच्या आसमंतात असल्याने सगळीकडे संपर्क साधला जातो. 

ओक, द. ह.