काक्रापारा: गुजरात राज्यातील गाव. हे सुरतपासून ८० किमी. पूर्वेकडे असून येथे तापी नदीवर ६३२ मी. लांब व १४ मी. उंच धरण बांधण्यात आले आहे. १९५३ मध्ये ते पुरे झाले. सुरत जिल्ह्यातील सु. सव्वादोन लाख हेक्टर जमिनीला याच्या पाण्याचा लाभ होतो.

काक्रापारा धरण

ओक, शा. नि.