झाकॉपाने : पोलंडचे प्रमुख हिवाळी क्रीडास्थान. लोकवस्ती २७,००० (१९७०). हे दक्षिण पोलंडमध्ये कार्पेथियन पर्वतश्रेणीतील तात्रा पर्वताच्या पायथ्याशी ४०६ मी. उंचीवर असून येथे अनेक अतिथीगृहे, विश्रामगृहे व आरोग्यभवने आहेत. हे उन्हाळी विश्रामस्थानही आहे. येथे जाण्यास लोहमार्गाची व सडकांची चांगली सोय आहे. हे सांस्कृतिक केंद्रही असून येथे स्मारके, कलाप्रदर्शने, संग्रहालये व उद्याने आहेत. येथे एक जलविद्युत् निर्मिती केंद्र आहे.

लिमये, दि. ह.