इस्मेइलीया : सुएझ कालव्याच्या मध्यभागी असलेले ईजिप्तचे महत्त्वाचे शहर. लोकसंख्या १,६७,५०० (१९७०). कालव्याच्या बांधकामासाठी १८६३ मध्ये बांधण्यात आलेल्या या शहरावर फ्रेंच ठसा उमटलेला दिसतो. हे कैरोपासून रेल्वेने १४९ किमी., सुएझपासून ७२ किमी. व पोर्ट सैदपासून ७६ किमी. आहे. तिमसॅह सरोवराच्या वायव्य काठावर इस्मेइलीया बसलेले आहे या सरोवराच्या दक्षिणोत्तर सुएझ कालवा जातो व पश्चिमेकडून नाईलवरून आणलेला इस्मेइलीया कालवा शहराच्या दक्षिणेस त्याला मिळतो. सुएझमधील वाहतुकीवर नियंत्रण ठेवणारे व इझ्राएल सरहद्दीजवळचे ठाणे म्हणून याला महत्त्व आहे. 

लिमये, दि. ह.