हिस्पेनिआ : रोमन काळात आयबेरिया द्वीपकल्पात व सांप्रत पोर्तुगाल व स्पेन या देशांत समाविष्ट असलेला प्रदेश. रोमन काळात हा प्रदेश हिस्पेनिआ किंवा हिस्पेनिया म्हणून ओळखला जात होता. पूर्वेस भूमध्य समुद्र, पश्चिमेस व उत्तरेस अटलांटिक महासागर आणि फ्रान्स यांनी हा सीमित झाला आहे. ईशान्येकडील पिरेनीज पर्वतामुळे हिस्पेनिआ यूरोप खंडापासून तर दक्षिणेस जिब्राल्टरच्या सामुद्रधुनीमुळे आफ्रिका खंडापासून अलग झालेला आहे. 

 

इ. स. पू. २०६ मध्ये रोमनांनी नॉर्थेजियनांकडून हा प्रदेश जिंकूनघेतला होता. त्या वेळी त्यांनी त्याची दोन प्रांतांमध्ये विभागणी केली होती. (१) हिस्पेनिआ सिटिअरिअर किंवा टॅरक नेंसस : सांप्रत हा संपूर्ण प्रदेश पूर्व, दक्षिण मध्य व उत्तर स्पेन (२) हिस्पेनिआ अल्टिअरिअर : यांमध्ये सांप्रत स्पेनचे अँडालुसिया, दक्षिण लिओन व एश्त्रिमुदुरा हे विभाग आणि पोर्तुगालचा बहुतांश भाग समाविष्ट होतो. ऑगस्टस ( ऑस्टेव्हियन) याचे (कार. इ. स. पू. २७ – इ. स. १४) हिस्पेनिआ अस्टिअरिअरचे (१) ल्युसिटेनीया : सांप्रत पोर्तुगाल व पश्चिम स्पेनचा भाग, (२) बिटिका काही सांप्रत स्पेनचे अँडालुसिया व दक्षिण एश्त्रिमुदुरा याप्रमाणे दोन विभाग करण्यात आले होते. 

 

पहा : पोर्तुगाल स्पेन. 

गाडे, ना. स.