हाइन्रिख हाइनहाइन, हाइन्रिख : (१३ डिसेंबर १७९७–१७ फेब्रुवारी १८५६). जर्मन कवी. जन्म ड्यूसेलडॉर्फ, प्रशिया (जर्मनी) येथे ज्यू आई–वडिलांच्या पोटी. वडील व्यापारी होते पण त्यांना व्यापारात फारसे यश नव्हते. आई त्या काळाच्या मानाने पाहता सुशिक्षित होती आणि मुलाच्या संदर्भात खूप महत्त्वाकांक्षी होती. ‘ड्यूसेलडॉर्फ लायसीअम’ मधून शिक्षण घेतल्यानंतर त्याला एक यशस्वी व्यापारी बनविण्याचा अयशस्वी प्रयत्न झाला. त्यानंतर त्याच्या श्रीमंत चुलत्याने त्याच्या विद्यापीठीय शि क्ष णा चा खर्च उचलल्यामुळे त्याने बॉन, गटिंगेन आणि बर्लिन विद्यापीठांतून शिक्षणघेतले. यांपैकी गटिंगेन विद्यापीठातून त्याने कायद्याची पदवी मिळवली (१८२५). त्याच वर्षी सरकारी खात्यात नोकरी मिळवून तेथे आपली प्रगती करण्याचा त्याने प्रयत्न केला तथापि सरकारी नोकरीची दारेज्यूंसाठी बंद असल्यामुळे नाइलाजाने आणि उद्वेगाने धर्मांतर करून तो प्रॉटेस्टंट ख्रिस्ती झाला. कायद्याची पदवी मिळवूनही त्याने कधी वकिली केली नाही. सरकारी नोकरीत त्याला कधी उच्च स्थान मिळाले नाही. विद्यार्थिदशेत त्याचे अभ्यासाकडे फारसे लक्ष नव्हते. तो कविता, साहित्य, इतिहास ह्या विषयांत रमत असे.

 

विद्यापीठीय शिक्षण घेण्यापूर्वीचे हाइनचे जीवन फारसे ज्ञात नाहीतथापि त्याच्या श्रीमंत चुलत्याच्या दोन मुलींकडे तो आकर्षित झाला.त्याच्यासारख्या स्वप्नाळू आणि यशस्वी मनुष्य होण्यासाठी लागणारीक्षमता नसलेल्या तरुणाला त्यांच्यापैकी एकीकडूनही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आलेल्या एकाकीपणाच्या भावनेला द बुक ऑफ साँग्ज( इं. भा.) ह्या त्याच्या काव्यसंग्रहातील कवितांतून वाट मिळाली.

 

हाइन कवी म्हणून आरंभी स्वच्छंदतावादाने प्रभावित झाला होतातथापि पुढे स्वच्छंदतावादापेक्षा ‘तरुण जर्मनी’ ह्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या प्रवृत्तीचा तो प्रमुख प्रतिनिधी बनला. स्वच्छंदतावाद्यांनी जर्मन राष्ट्रवाद चेतवून आणखी प्रखर केला होता तथापि ह्या राष्ट्रवादाने जोपासलेली स्वप्ने पुरी झाली नाहीत. राष्ट्रवादाचा उद्घोष करणाऱ्या स्वच्छंदतावाद्यांना अ-भौतिक आदर्शांची ओढ होती पण राष्ट्रवादाला सर्वदेशीय (कॉस्मॉपॉलिटन) दृष्टीचे परिमाण लाभले पाहिजे व्यावहारिक–भौतिक दृष्टी जोपासली पाहिजे, अशा विचारांचे वातावरण जर्मनीतनिर्माण होऊ लागले होते. ह्या वातावरणाने प्रभावित झालेले काही तरुण साहित्यिक उदयाला आले. ते संघटित नव्हते प्रत्येकजण स्वतंत्रपणे काम करीत होता. त्यामुळे त्यांच्या लेखनाला चळवळीचे स्वरूप नव्हते पणह्या नसलेल्या चळवळीला ‘तरुण जर्मनी’ म्हटले जात होते. उदारमतवाद आणि स्वातंत्र्यप्रेम ‘तरुण जर्मनां’ ना मोलाचे वाटत होते परंतु नेपोलियनचा पराभव झाल्यानंतरही देशात स्वातंत्र्याचा अपहार तसेच दडपणूक होतहोती. त्यामुळे अनेक ‘तरुण जर्मन’ परागंदा झाले. हाइनही १८३१ मध्ये पॅरिसला आला आणि अखेरपर्यंत तेथेच राहिला.

 

पॅरिसमध्ये असताना स्वदेशातील दांभिकतेवर आपल्या ‘आट्टा ट्रोल ङ्ख ‘डॉइचलांड’ यांसारख्या काव्यांतून त्याने उपरोधप्रचुर टीका केली.तसेच जर्मन आणि फ्रेंच ह्यांच्यामध्ये सांस्कृतिक संवाद साधण्याचा प्रयत्न त्याने केला.

 

सामाजिक-राजकीय विषयांसंबंधी त्याला चिकित्सक आस्थाहोती. सेंट-सायमोनिअन पंथाकडे तो आरंभी आकर्षित झाला होता.ह्या पंथाची विचारप्रणाली समाजवादी होती. सर्व मालमत्ता राष्ट्राचीअसावी आणि प्रत्येक श्रमिकाला त्याच्या कामाचे प्रमाण आणि गुणवत्ताह्या निकषांवर वेतन दिले जावे, हे या विचारसरणीचे सार होते. ह्या विचारसरणीतून माणसांच्या दडपणुकीला कारण ठरणाऱ्या सर्व भूत-कालीन प्रणालींना मागे टाकता येईल आणि मानवी समाज अधिकसुखी करता येईल, अशी आशा त्याच्या मनात निर्माण झाली. १८३०मध्ये बूर्बाँ घराण्याची राजसत्ता संपुष्टात आल्यानंतर लूई फिलिप ह्याने फ्रान्सची राजसूत्रे स्वीकारली होती. त्याच्या कारकीर्दीत भांडवलदारांचेप्रस्थ आणि भ्रष्टाचार वाढला. फ्रान्समधल्या ह्या स्थितीबद्दल वर्तमान-पत्रांतून त्याने लेखमाला लिहिली. ती ‘फ्रेंच अफेअर्स’ (१८३२,इं. शी.) ह्या नावाने पुस्तकरूप झाली. ह्यांखेरीज जर्मन संस्कृतीवरत्याची दोन पुस्तके –द रोमँटिक स्कूल (१८३३–३५, इं. भा.) आणि’ ऑन द हिस्टरी ऑफ रिलिजन अँड फिलॉसॉफी इन जर्मनी’ (१८३४-३५, इं. शी. )– प्रसिद्ध झाली. ह्या पुस्तकांतून त्याने जर्मनीच्या वर्तमान-काळाची चिकित्सा केली आणि जर्मनीतील धर्मसुधारणेच्या चळवळी, ज्ञानोदय आणि आधुनिक चिकित्सक तत्त्वज्ञान ह्यांतून प्रकट होणाऱ्या जर्मनीच्या क्रांतिकारी अंतःशक्तीचे स्मरण करून दिले. फ्रेंच वाचक मनात ठेवून ही पुस्तके मुळात फ्रेंच भाषेत लिहिलेली होती. १८४०–४३ ह्या कालखंडात त्याने फ्रेंच जीवन, संस्कृती, राजकारण ह्या विषयांवर वृत्त-पत्रांतून अनेक लेख लिहिले. त्यांच्यावर संस्करण करून संपादित स्वरूपात त्याने ते ल्यूतेझिआ (पॅरिसचे प्राचीन रोमन नाव) ह्या शीर्षकाने १८५४ मध्ये प्रसिद्ध केले.

 

हाइनने समकालीनतेशी नाते सांगणारी कविताही लिहिली. न्यू पोएम्स् (१८४४, इं. भा.) ह्या त्याच्या कवितासंग्रहातून हे परिवर्तन दिसून येते. ह्यातील काही कवितांतून तीव्र राजकीय उपरोध प्रकट झाला आहे. त्याच्या अनेक कविता कार्ल मार्क्सच्या ‘फॉरवर्ड’ (इं. शी.) ह्या वृत्तपत्रातून प्रसिद्ध झाल्या होत्या. ह्याच सुमारास जर्मनीला जाऊन तो आपल्या कुटुंबीयांना भेटला होता. त्यानंतर त्याने जर्मनी, ए विंटर्स टेल (१८४४, इं. भा.) ही जर्मनीतील प्रतिगामी वातावरणावर दीर्घ उपरोधप्रचुर कविता लिहिली.कार्ल मार्क्सबरोबरचे त्याचे संबंध जिव्हाळ्याचे नसले, तरी चांगले होते तथापि साम्यवादाशी त्याचे विचार फारसे जुळले नाहीत.

 

राइझबिल्डर (१८२६–३१) ह्या नावाने लिहिलेली प्रवासचित्रे आणि डी रोमांटिश शूल (१८३६, इं. शी. ‘द रोमँटिक स्कूल’) हे त्याचेदोन गद्यग्रंथ विशेष उल्लेखनीय होत. डी रोमांटिश शूल हा ग्रंथ जर्मन संस्कृतीवरील एक अभ्यासपूर्ण ग्रंथ होय.

 

हाइन पॅरिसमध्ये असला, तरी जर्मनीतील घटनांनी तो त्रासला होता. १८३५ मध्ये त्याच्या सर्व ग्रंथांवर तेथे राष्ट्रव्यापी बंदी घालण्याचाप्रयत्न झाला. त्याच्या चिकित्सक आणि उपरोधप्रचुर लेखनाचा हापरिणाम होता. त्याच्या अवतीभवती गुप्तहेर असत. देश सोडून पॅरिसमध्ये तो स्वेच्छेने आला होता तथापि त्याची ही परागंदा अवस्था एकलादणूकच झाली.

 

त्याने १८४१ मध्ये एका सामान्य मुलीशी लग्न केले. हाइनलापैशाची चणचण नेहमीच भासत असे. शिवाय त्याची प्रकृतीहीखालावत चालली होती. पाठीच्या कण्याच्या दुखण्याने तो त्रस्त होता. त्याची दृष्टीही अधू झाली होती. अशा अवस्थेतच रोमांझेरो (१८५१)हा त्याचा कवितासंग्रह प्रकाशित झाला. माणसाच्या स्थितीवर हृदय-विदारक भाष्य करणाऱ्या कविता त्यात आहेत आणि ह्या कवितात्याच्या सर्वोत्कृष्ट कविता समजल्या जातात. पोएम्स १८५३ अँड १८५४ हा त्याचा अखेरचा कवितासंग्रह. त्यातल्या कविताही रोमांझेरोमध्ये व्यक्त झालेल्या मनःस्थितीच्याच आहेत. आजारपणाच्या यातना जवळपास आठ वर्षे भोगल्यानंतर पॅरिसमध्ये तो मृत्यू पावला.

 

स्वतःच्याच देशात अत्यंत वादग्रस्त ठरलेला हाइनसारखा थोर कवी विरळाच म्हणावा लागेल. देशद्रोही असा शिक्काही त्याच्यावर बसलाहोता. जन्माने ज्यू असल्यामुळे ज्यू विरोधाच्या झळाही त्याला बसल्या. एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकांत जर्मनीतील शहरांमधून त्याची स्मारके उभारण्याच्या प्रयत्नांनी दंग्याधोप्यांनाच निमंत्रण दिले. नाझींच्या राजवटीत जर्मन कवींच्या कवितांची जी संकलने प्रसिद्ध झाली, त्यांतत्याच्या कविता टाळणे अशक्यच होते तथापि त्या कवितांवर त्याचेनाव छापण्याऐवजी ‘अज्ञात लेखक’ असे छापण्यात आले मात्र अनेक दशके त्याची वाङ्मयीन कीर्ती जर्मनीबाहेर – विशेषतः फ्रान्स, इंग्लंडआणि अमेरिकेत – वाढत राहिली. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात त्याची राजकीय भूमिका आणि मार्क्सशी असलेले संबंध पूर्व जर्मनी आणिपश्चिम जर्मनीमधील एक वादाचा विषय झाला. जर्मनीचे एकीकरणत्यावेळी झालेले नव्हते.

 

पहा : जर्मन साहित्य.

कुलकर्णी, अ. र.