जॉन हचिन्सनहचिन्सन, जॉन : (७ एप्रिल १८८४-२ सप्टेंबर १९७२). वनस्पतिविज्ञानातील ब्रिटिश वर्गीकरणवैज्ञानिक. ते आवृतबीज वनस्पतीउपविभागाच्या जातिविकसित वर्गीकरणाच्या काऱ्यामुळे प्रसिद्धीस आले. त्यांनी आ वृ त बी जवनस्पतींचे लि ग्नो सी (काष्ठमय) व हर्बेसी (अकाष्ठमय) असे दोनमुख्य गट करून २२ लक्षणांच्या यादीच्या साह्याने त्यांचा क्रमविकास ठरविला. त्यांच्या द्विदलिकित वर्गीकरणापेक्षा एकदलिकित वर्गीकरण अधिक समर्पक व ग्राह्य मानले जात असून अमेरिकेत ते अधिक लोकप्रिय आहे. [→ वनस्पति, आवृतबीज उपविभाग वनस्पतींचे वर्गीकरण].

हचिन्सन यांचा जन्म वार्क ऑन टाईन (इंग्लंड) येथे झाला. स्वप्रयत्न व उद्यमशीलता यांच्या जोरावर त्यांना वनस्पतिविज्ञानाच्या क्षेत्रात लौकिक मिळाला. त्यांचे शिक्षण खेड्यातील शाळेत झाले. वयाच्या सोळाव्यावर्षी त्यांनी आपल्या वडिलांच्या हाताखाली माळी म्हणून कामालासुरुवात केली. १९०४ मध्ये ते क्यू उद्यानात गेले व लवकरच त्यांची बदली वनस्पतिसंग्रह विभागाकडे झाली. तेथे त्यांची भेट सुप्रसिद्ध वनस्पतिवैज्ञानिक ⇨ सर जोसेफ डाल्टन हूकर यांच्याशी झाली. तेथेत्यांनी हूकर यांचे कार्य पुढे चालू ठेवले. हचिन्सन यांनी सेवानिवृत्ती-पर्यंत क्यू हर्बेरियामध्ये अभिरक्षक म्हणून कार्य केले (१९३६-४८).

फ्लोरा ऑफ वेस्ट ट्रॉपिकल आफ्रिका (१९२७-३६) या ग्रंथाचे लेखन करताना हचिन्सन यांना आवृतबीज वनस्पतींविषयीचे ज्ञान प्राप्त झाले. त्यासाठी क्यू हर्बेरियममध्ये त्यांनी अकरा वर्षे वनस्पतिवैज्ञानिक म्हणून कार्य केले. आपल्या अध्ययनात त्यांनी ⇨ जॉर्ज बेंथॅम व जे. डी. हूकर या ब्रिटनमधील आणि ⇨ आडोल्फ (हाइन्रिक गुस्टाफ) एंग्लर व कार्ल फोन प्रांट्ल या जर्मनीतील वनस्पतिवैज्ञानिकांच्या सपुष्प वन-स्पतींच्या तत्कालीन वर्गीकरणाचा सतत परामर्श घेतला. एंग्लर-प्रांट्ल यांच्या वर्गीकरण पद्धतीवर त्या वेळी अमेरिकेतील चार्ल्स एडविन बेसी, जर्मनीतील हान्स हॅलियर आणि ब्रिटनमधील ए. आर्बर व जे. पार्किनअसे विविध वनस्पतिवैज्ञानिक टीका करीत होते.

परिणामतः हचिन्सन यांनी एका बाजूने बेंथॅम व हूकर यांच्या वर्गीकरण पद्धतीत प्रथम स्थान असलेल्या ⇨ रॅनेलीझ या सुट्यापाकळ्या, सुटी केसरदले व सुटी किंजदले युक्त सर्वांत आद्य अशा कुलांचा सखोल अभ्यास केला व दुसऱ्या बाजूने अमेंटिफेरी या सुपरिचित नावाने ओळखल्या जाणाऱ्या गटाचा अभ्यास केला. यातील बहुतेकांचे फुलोरे नतकणिश प्रकारचे असून फुलांस पाकळ्या नसतात. त्यानंतर त्यांनी लगेच हा निष्कर्ष काढला की, मॅग्नोलिएसी व रॅनन्क्युलेसी या कुलांतील द्विलिंगी फुले, सुट्या पाकळ्या, सुटी किंजदले इ. लक्षणे असलेल्या जिवंत वनस्पतींचा सर्वांत आद्य गट दुसऱ्या बाजूला आहेआणि पाकळ्या नसलेली फॅगेसी (ओक), मोरेसी (तुती) व फ्लॅकोर्टिएसी (अत्रुण) ही सर्वांत जास्त प्रगत कुले आहेत. कारण फुलांतील पाकळ्या व अन्य अवयवांचा र्‍हास व त्यामुळे ती मुख्यतः एकलिंगतेकडे झुकलेली आहेत. त्याच वेळेला त्यांना हेही पटले होते की, समांतर क्रमविकासा-मुळे मॅग्नोलिएसी व रॅनन्क्युलेसी या कुलांत समान प्रकारची पुष्पसंरचना असते परंतु ती कुले एकमेकांशी संबंधित नाहीत व प्रत्येककुल क्रमविकासाच्या दोन स्वतंत्र मार्गांचा प्रारंभ बिंदू मानले पाहिजेत.एक (मॅग्नोलिएसी) मूलतः काष्ठमय असून त्यालाच लिग्नोसी म्हणतातव दुसरा (रॅनन्क्युलेसी) मूलतः तृणमय (अकाष्ठमय) आहे, त्यालाहर्बेसी म्हणतात. या गृहीतकावर आधारित वर्गीकरण द फॅमिलीज ऑफ फ्लॉवरिंग प्लँट्स (१९५९) या ग्रंथाच्या द्वितीय आवृत्तीत अधिक स्पष्ट करण्यात आले होते. त्यातील चित्रे कृष्णधवल असून बहुतांश चित्रेत्यांनी स्वतः काढलेली आहेत. तसेच त्याच्या जोडीला कुलांसाठी एक कृत्रिम मदत करणारी पद्धत (key) दिलेली असून ती जगात सर्वत्र उपयुक्त असल्याचे सिद्ध झाले आहे.

हचिन्सन यांना वनस्पतींविषयीचे ज्ञान हे मुख्यतः वनस्पतिसंग्रहातील नमुन्यांवरून झालेले होते, तरी त्यांनी वनस्पतींचा नैसर्गिक अवस्थेत अभ्यास करण्यासाठी पुष्कळ प्रवास केला होता. १९२८-२९ मध्येत्यांनी दक्षिण आफ्रिकेचे समन्वेषण केले व वनस्पतिसंग्रहासाठी विपुलनमुने गोळा केले आणि त्याचबरोबर क्यू उद्यानासाठी जिवंत रसाळ वनस्पतीही गोळा केल्या. कुशाग्र क्षेत्र वनस्पतिवैज्ञानिक फील्ड मार्शलजे. सी. स्मट यांची भेट घेण्याची व मैत्री करण्याची अमूल्य संधी हचिन्सन यांना लाभली होती. त्याबरोबर त्यांनी उत्तर ट्रान्स्व्हालाला भेट दिली. १९३० मध्ये हचिन्सन यांनी स्मट यांच्याबरोबर व्हिक्टोरिया फॉल्सच्यामार्गे उत्तरेस टांगानिका सरोवरापर्यंत जाऊन प्रिटोरियाची शोध सफर पार पाडली. या सफरीत त्यांनी टेरोनिया (ॲस्टरेसी) या प्रजातीतील नवीन जातींचा शोध लावला. त्या जातीला त्यांनी टेरोनिया स्मटसीआय हेनाव दिले. या शोध सफरीचे निष्कर्ष हचिन्सन यांच्या मुलाने बोटॅनिस्टइन सदर्न आफ्रिका (१९४६) या ग्रंथात प्रसिद्ध केले. या ग्रंथाची प्रस्तावना स्मट यांनी लिहिली आहे.

हचिन्सन यांना द फॅमिलिज ऑफ फ्लॉवरिंग प्लँट्स (दोन खंड, १९२६ व १९३४) या सुप्रसिद्ध ग्रंथाच्या लेखनाबद्दल स्कॉटलंडमधील सर्वांत जुन्या सेंट अँड्र्युज या विद्यापीठाची सन्माननीय डॉक्टरेट ऑफ लॉजही पदवी मिळाली (१९३४). त्यांना लिनीयन सोसायटी ऑफ लंडनचे डार्विनवॉलिस पदक मिळाले (१९५८). हे पदक वीस वनस्पतिवैज्ञानिकांना त्यांच्या क्रमविकास व वर्गीकरण यांवरील काऱ्याच्या गौरवार्थ देण्यातआले. तसेच त्याच सोसायटीचे सुवर्ण पदकही त्यांना देण्यात आले (१९६४). लंडनच्या रॉयल सोसायटीचे अधिछात्र (फेलो) म्हणूनत्यांची निवड झाली होती (१९४७).

हचिन्सन यांनी आर्. मेल्व्हिल यांच्या समवेत द स्टोरी ऑफ प्लँट्स अँड देअर यूझेस टू मॅन (१९४८) ब्रिटिश वाइल्ड फ्लॉवर्स ( पेंग्विन प्रकाशन संस्थेने याच्या खंडांची मालिका प्रसिद्ध केली ) द जेनरा ऑफ फ्लॉवरिंग प्लँट्स (अँजिओस्पर्मी) (१९६४) व इव्होल्यूशन अँड फायलोजेनी ऑफ फ्लॉवरिंग प्लँट्स (१९६९) हे ग्रंथ लिहिले आहेत.

हचिन्सन यांचे क्यू सरे (इंग्लंड) येथे निधन झाले.

जमदाडे, ज. वि.