कपूरीमधूरी : (कपुरफुटी हिं. गोरखबुटी, कपुरीजडी सं. कर्पुरमाधुरी लॅ. एरुआ लॅनॅटा कुल-ॲमरँटेसी). भारत, श्रीलंका, अरबस्तान, आफ्रिका,जावा, फिलिपीन्स इ. प्रदेशांत सर्वत्र तणासारखी वाढणारी लहान ⇨ ओषधी. फांद्या अनेक पाने एकाआड एक व केसाळ फुले द्विलिंगी, लहान, पांढरी,बिनदेठाची, कक्षास्थ (बगलेत) स्तबकात वा कणिशात [→Ž पुष्पबंध] ऑगस्ट – नोव्हेंबरात येतात. छदके खोलगट परिदले पाच व केसाळ केसरदले पाच,वंध्यकेसराशी एकांतरित (एकाआड एक) व तळाशी जुळून नलिका अगर पेला बनलेला [Ž→ फूल]. शुष्क व एकबीजी फळ (क्लोम).

ही ओषधी कृमिनाशक व मूत्रल (लघवी साफ करणारी) आहे. मूळ वेदनाहारक व मूत्रल डोकेदुखीवर आणि कफावर गुणकारी. दम्यावर सुकी पाने व फुले चिलमीतून ओढतात.

पहा :ॲमरँटेसी.

चौगले, द. सी.