खॉझ्यूफ : पोलंडच्या काटोव्हीत्से प्रांतातील औद्योगिक शहर. लोकसंख्या १,५३,००० (१९७२). लोहमार्गांचे हे केंद्र असून लोखंड व पोलाद, रेल्वेचे डबे काचसामान, लोखंडी सामान, दारू गाळणे, लाकूड कापणे, विजेचे साहित्य वगैरेंचे उद्योग येथे आहेत. येथे जगातील मोठ्या नायट्रेट उत्पादन केंद्रांपैकी एक केंद्र आहे. आसमंतात कोळशाच्या व लोखंडाच्या विपुल खाणी आहेत. हे शहर १९२१ पर्यंत जर्मनांच्या ताब्यात होते. १९३९ पर्यंत हे पोलंडचे सरहद्दीवरील ठाणे होते.

लिमये, दि. ह.