कॅमेरून : विषुवृत्तीय पश्चिम आफ्रिकेतील एक नवोदित राष्ट्र. सु. १० ४३’ उ. ते १२ ४०’ उ. व ८० ३०’ पू. ते १६० ३’ पू. यांचे दरम्यान क्षेत्रफळ सु. ४,७५,५०१ चौ. किमी. लोकसंख्या सु. ५८,४०,००० (१९७० अंदाज). याच्या उत्तरेस चॅड, पूर्वेस चॅड व मध्य आफ्रिका प्रजासत्ताक, आग्‍नेयीस काँगो (ब्रॅझा.), दक्षिणेस काँगो (ब्रॅझा), गाबाँ व रीओमूनी आणि पश्चिमेस गिनीच्या आखातातील बीआफ्राचा उपसांगर व नायजेरिया आहेत. याचा समुद्रकिनारा ३५४ किमी. आहे. सांधारणतः त्रिकोणी आकाराच्या या देशाचा पूर्व कॅमेरून हा प्रामुख्याने फ्रेंच भाषिक, ४,३२,००० चौ. किमी क्षेत्रफळाचा व ७९⋅५ टक्के लोकसंख्येचा आणि पश्चिम कॅमेरून हा प्रामुख्याने इंग्रजी भाषिक, ४४,००० चौ.किमी क्षेत्रफळाचा व २०⋅५ टक्के लोकसंख्येचा असे दोन घटक विभाग आहेत. यांऊदे ही पूर्व कॅमेरूनची व सबंध देशाची आणि बूएआ ही पश्चिम कॅमेरूनची राजधानी आहे. दोन यूरोपीय (इंग्रजी व फ्रेंच) भाषा राज्यभाषा असलेला आफ्रिकेतील हा एकमेव देश आहे.

भूवर्णन :  कॅमेरूनमध्ये मध्य आफ्रिकेच्या ढालप्रदेशातील ग्रॅनाइटीनाईस, ग्रॅनाइट व रूपांतरित खडक आढळतात. एक मोठी खचदरी फर्नांदो पो बेटापासून चॅडपर्यंत यादेशातून गेलेली आहे. तिच्या अनुरोधाने कॅमेरून, कूपे, मॅनेन्गूबा, बांबूटो, ॲलांटिका, नामेबी व मांदारा हे पर्वत उभे आहेत. कॅमेरून(४,०७० मी.)हा पश्चिम आफ्रिकेतील सर्वांंत उंच व जागृत ज्वालामुखी पर्वत आहे. तृतीयक व चतुर्थककालीन १६ ते८० किमी. रुंदीच्या किनारी मैदानांमागे याऊंदेजवळ ७०० मी. व गांऊडेरेजवळ १,०००–१,२०० मी.  पर्यंत उंचीचा डोंगराळ प्रदेश व ॲडामावाचा पठारी प्रदेश असून त्याच्या उत्तरेस बेन्वे नदीचे खारे आहे. त्याच्याही उत्तरेस गारूआपासून चॅड सरोवरापर्यंत पूर्वेस मैदानी प्रदेश व पश्चिमेस मोकोलोकडे मांदारा पर्वत आहे. कॅमेरूनमधील वूरी, सांनागा, न्यॉंग क्रॉस व टेम या ऩद्या अटंलाटिककडे, बेन्वे ही नायजरची उपनदी व तिला मिळणाऱ्या मायोकेबी व डाेंगा या नायजर खोऱ्याकडे, लोगोन ही काही अंतरापर्यंत कॅमेरून व चॅडमधील सीमा असलेली व शारी नदीला मिळणारी नदी चॅड सरोवराकडे व डूमे, लोम आणि जा ह्या नद्या काँगोची उपनदी सॅग्गा हिला मिळण्यासांठी काँगो खोऱ्याकडे वाहतात.

कॅमेरूनमध्ये सांपडणारे मुख्य खनिज म्हणजे बॉक्सासांइट होय. त्याचा मोठा सांठा ॲडामावा पठारावर आहे. पंरतु वाहतुकीच्या सांधनां-अभावी त्याचा अधिक उपयोग होत नाही. अल्प प्रमाणात सोने व कॅसिटेराइट सांपडते. 

कॅमेरूनचे हवामान विविध प्रकारचे आहे. हवामानाच्या दृष्टीने ५ उ. अक्षवृत्ताच्या उत्तरेचा व दक्षिणेचा असे दोन ढोबळ विभाग पडतात. सरासरी वार्षिक तापमान २६ से. असते. दूआला येथे आर्द्रता ९१% तर एडेआ येथे ९५% असते. चॅड सरोवराच्या बाजूस यात फार फरक पडतो. तेथे सहारावरून आलेले उष्ण, कोरडे, धुळीने भरलेले हर्माटन वारे वाहतात. तर गिनीच्या आखातावरून आर्द्र मोसमी वारे आणि त्यामागोमाग मोठी वादळे येतात. उंचीमुळे याऊंदे येथे २३⋅५ से., एबोलोवा व बतौरी येथे २४से. तापमान असते. तेथील किमान तापमान अनुक्रमे १४० से., ११० से. व १०⋅९० से. असते. ॲडामावा पठारावर कमी होत गेलेले सुखावह तापमान उत्तरेकडे गारूआ व मारूआ विभागांत पुन्हा वाढत जाते. पावसांच्या प्रमाणातही दक्षिणेकडून उत्तरेकडे फरक पडत जातो. वूरी नदीच्या मुखाजवळ मानोका येथे ६४० सेंमी., दूआला येथे ३८० सेंमी., एडेआ २५० सेंमी., व क्रिबी येथे ३०० सेंमी पाऊस पडतो. बाकी सर्व दक्षिण भागात १५० ते २०० सेमं. पाऊस पडतो. याऊंदे येथे एप्रिल – मे व सप्टेंबर – आक्टोबर हे अधिक पावसांचे दोन काळ असतात. तेथे एकूण पाऊस १५८ सेंमी. पडतो. उत्तरेकडे नोव्हेंबर ते मे हा काळ कोरडा जातो त्यानंतर १२० ते १६० सेंमी पाऊस पडतो.

कॅमेरूनच्या दक्षिण भागात दाट, मूळची विषुववृत्तीय अरण्ये, ती काही ठिकाणी फिरत्या शेतीसांठी तोडून, जाळून टाकल्यावर तेथे पुन्हा उगवलेली दुय्यम अरण्ये व नद्यांकाठची अरण्ये आहेत. त्यांत कठीण लाकडाचे बहुविध वृक्ष आहेत. १६० लक्ष हे. प्रदेशात उत्तम इमारती लाकूड मिळण्याजोगे आहे. त्यांपैकी सध्या फक्त ५० लक्ष हे. प्रदेशाचा उपयोग करण्यात येतो. उत्तरेकडे मांदारपर्यंत व बामिलेके विभाग येथे ॲडामावा पठार ते चॅड सरोवरापर्यंत विस्तीर्ण सॅव्हाना गवताळ प्रदेश आणि नद्यांकाठची अरण्ये आहेत. कमी पाऊस व अधिक तपमान हे येथील वैशिष्ट्य होय.

कॅमेरूनमध्ये हत्ती, गोरिला, बबून, सितातुंगा हा दुर्मिळ काळवीट, अरण्यातील आखूड शिंगी व गवताळ प्रदेशातील लांब शिंगाच्या म्हशी, डोंगर व बेन्वे नदी यांच्या दरम्यान बुबल व एल्क, तृण प्रदेशात गॅझेल हरिण, मांदारा भागात चित्ता आणि उत्तरेकडील काही भागांत सिंह आढळतात. मुंगीखाऊ, पॅंगोलिन, हायरॅक्स व खारीच्या जातीचे छोटे प्राणीही पुष्कळ आहेत. त्से त्से माशी, इतर अनेक कीटक, विषारी व बिनविषारी अनेक प्रकारचे सर्प यांचीही संख्या मोठी आहे.

इतिहास : अनेक इतिहासपूर्व अवशेषांवरुन कॅमेरूनमधील प्राचीन वसत्या व पिग्मी लोक यांचा संबंध दिसून येतो. बेती हे मूळचे लोक सांनागा नदीपर्यंत पसरले होते पंरतु त्यांना फॅग लोकांनी हुसकावून दिले. बॅसो, बासां व बाकोको हे मध्य भागात व सांनागाच्या खालच्या खोऱ्यात आढळतात. बामिलेके हे डोंगराळ भागात एक लाखाहून अधिक असलेले टिकार मोठया प्रदेशात विरळ वस्ती करून आहेत. त्याच भागात बामुम हेही आहेत. सॅंग्गाच्या वरच्या खोऱ्यातून आलेले दूआला लोक किनाऱ्यापर्यंत पोहोचले व कॅमेरून पर्वत आणि कॅलॅबार यांमध्ये पसरले. माका व जेम हेही किनाऱ्यापर्यंत गेले. फुलानींनी नैर्ऋत्येकडे रेटलेले पाहुइन सु. सांत लक्ष भरतील. उत्तरेकडे किर्दी लोक मांदारा पर्वतभागात येऊन राहिले. बाम, मॉंडांग, फाली व सांओ कोटोको यांनीही आपापली राज्ये स्थापन केली ती उत्तरेकडे अठराव्या व एकोणिसांव्या शतकात आलेल्या मुस्लीमामुळे पुष्कळच बदलली. या सर्व जमातींची छोटी छोटी राज्ये व त्यांचे प्रमुख, यूरोपीयांच्या संपर्काअाधीपासून कॅमेरूनमध्ये होते. पोर्तुगीज खलाशी फर्नांदो पो याने वूरी नदीची खाडी व येथील किनारा शोधून काढला. या नदीत भरपूर मिळणाऱ्या कोलंब्यावरून तिला रीओ डॉस कॅमॅरोस हे नाव मिळाले. त्याचे स्पॅनिश रूप कॅमेरोन्स, जर्मन कामेरून फ्रेंच कॅमेरुँ व इंग्रजी कॅमेरून असे झाले.

सोळाव्या व सतराव्या शतकांत येथून यूरोपीय व नंतर अमेरिकन व्यापारी हजारो निग्रो गुलाम घेऊन जात. एकोणिसांव्या शतकाच्या सुरुवातीस ब्रिटिशानी गुलामांच्या व्यापाराला आळा घालून मौंट कॅमेरूनच्या पायथ्याशी १८५८ मध्ये व्हिक्टोरिया येथे पहिली कायम मिशनरी वसांहत स्थापिली . पोर्तुगीजांच्या पाठोपाठ डच, फ्रेंच व जर्मन लोक येथे आले होते. फ्रेंचांनी व जर्मनांनी येथे पाय रोवले होते तसे ब्रिटिशांना जमले नव्हते. १८८४ मध्ये जर्मनीने दूआला प्रमुखांशी तह करून येथे जर्मन संरक्षक राज्य स्थापन केले. १९१४ पर्यंत जर्मनांनी तेथे आर्थिक व दळणवळणाच्या बाबतीत बराच विकास घडवून आणला. पहिल्या महायुद्धात १९१६ मध्ये जर्मनांचा पराभव करून येथील ८०% प्रदेश फ्रांन्सने व २० % ब्रिटनने घेतला. शांतता तहान्वये राष्ट्रसंघांने येथील कारभार याच देशांकडे सोपविला. जर्मनांनी लावलेली केळी, रबर, कोको वगैरेचे मळे पश्चिमेकडील अरुंद ब्रिटिशशासित प्रदेशाच्या दक्षिण भागात होते. ते त्यांच्या मूळ मालकांनी पून्हा विकत घेतले होते. त्या भागात फारशी प्रगती झाली नाही. फ्रांन्सने सार्वजनिक प्रकल्पांसांठी सक्तीची मजूर भरती केली आणि आपल्याकडील प्रदेशात सामाजिक किंवा राजकीय प्रगती केली नाही म्हणून बरीच टीका झाली. दुसऱ्या महायुद्धात कॅमेरूनने दोस्त राष्ट्रांसच मदत केली. युद्धानंतर फ्रान्स व ब्रिटन यांची कारभारविषयक धोरणेही बदलली. आपणाकडे सोपविलेल्या प्रदेशात स्वायत्तता किंवा स्वातंत्र्य साध्य करण्याच्या दृष्टीने राजकीय प्रगती करण्याचे या दोन्ही देशांनी मान्य केले व संयुक्त राष्ट्राचे विश्वस्त प्रदेश म्हणून ते ते प्रदेश त्यांच्याकडे सोपविण्यात आले.

आता देशात कॅमेरूनच्या लोंकाना प्रातिनिधिक भाग घेता येईल अशा संस्था उदयास आल्या. त्यांच्या जोडीला ब्रिटिश व फ्रेंच वासाहतिक धोरणातील अनुरूप बदल व विश्वस्ततेच्या उत्तेजनकारक अटी यामुंळे १९४८ मध्ये रूबेन उम न्योबे याच्या नेतृत्वाखाली युनियन दे पाप्युलेशन्स दू कमेरूँ (यू.पी.सी.) हा राजकीय पक्ष स्थापन झाला. त्याने फ्रान्सपासून स्वंतत्र्य व दोन्ही कॅमेरूनचे एकीकरण या मागण्या केल्या. १९५७ मध्ये आंद्रे मारी बीदा या फ्रांन्सशासित कॅमेरूनचया पहिल्या मुख्य प्रधानाच्या नेतृत्वाखाली डेमोक्राते कॅमेरुने हा पक्ष व १९५८ मध्ये पुढे संघराज्याचा पहिला अध्यक्ष झालेल्या अहमदू आहिजू याच्या नेतृत्वाखाली युनियन कॅमेरुने(यु.सी.) हा पक्ष स्थापन झाला. १९५७ मध्ये बीदा व अहिज्‌ यांच्या पक्षांचे पहिले फ्रेंच कॅमेरून सरकार स्थापन झाले. १९५८ मध्ये बीदाचे सरकार पडले व अहिज मुख्य प्रधान झाला. राज्याला १९५९ मध्ये संपूर्ण अंतर्गत स्वायत्तता मिळाली आणि १ जानेवारी १९६० रोजी संपूर्ण स्वंतत्र कॅमेरून प्रजासत्ताक अस्तित्वात आले.


ब्रिटिश कॅमेरूनमध्येही तीन राजकीय पक्ष उदयास आले. डॉ. एंडेले यांच्या कॅमेरून पीपल्स नॅशनल कन्व्हेन्शनचे धोरण नायजेरियात विलीन होण्याचे होते. जॉन एन्‌. फांचा यांच्या कॅमेरून नॅशनल डेमोक्रॅटिक पार्टीचे आणि वन्‌ कॅमेरून या डे टुमाझा या पक्षाचेही धोरण दोन्ही कॅमेरूनच्या एकीकरणाचे होते. संयुक्त राष्ट्रांतर्फे आगॅस्ट १९५९ मध्ये आणि पुन्हा फेब्रुवारी १९६१ मध्ये उत्तर व दक्षिण दोन्ही भागात सांर्वमत घेतले. उत्तर विभागाने नायजेरियात विलीन होण्याचे पतकरले व दक्षिण विभागाने कॅमेरून प्रजासत्ताकात विलीन होण्याचे ठरविले.

१ ऑक्टोबर १९६१ रोजी कॅमेरूनचे लोकसत्ताक संघराज्य स्थापन झाले. ब्रिटिश कॅमेरूनचा उत्तर विभाग जुलै १९६१ मध्ये नायजेरियात विलीन झाला होता. संघराज्यांच्या पूर्व कॅमेरून व पश्चिम कॅमेरून या दोन विभागांत शिक्षणपद्धती, न्यायपद्धती, चलन इ. अनेक बाबतींत मूलभूत फरक होते ते दूर करून दोन्ही भागाचे एकीकरण करण्याचे जोरदार प्रयत्न १९७२ मध्ये यशस्वी झाले आहेत.

राजकीय स्थिती : १९७२ पूर्वी घटक राज्यांची सार्वत्रिक मतदानाने निवडलेली प्रत्येकी एक विधानसभा असे. पूर्व कॅमेरूनच्या विधानसभेत १०० तर पश्चिम कॅमेरूनच्या विधानसभेत ३७ सदस्य असत. या राज्यांच्या मुख्य मंत्र्यांची नेमणूक बहुमतवाल्या पक्षाच्या मान्यतेने अध्यक्ष करी.  मुख्य मंत्र्याच्या मदतीला त्यांचे मंत्रिमंडळ असतेच. पश्चिम कॅमेरूनमध्ये प्रमुख-सभा (हाउस ऑफ चीफ्‌स) फक्त सल्ला देण्यासांठी कायम ठेवलेली होती. एप्रिल १९६४ मध्ये संसदेची पहिली निवडणूक झाली. १९६८ मध्ये तिची मुदत एकमताने सव्वा वर्षाने वाढविण्यात आली. १९६६ मध्ये देशातील चार प्रमुख पक्ष एकत्र येऊन युनियन नॅशनल कॅमेरून(यू.एन्‌.सी) हा एकच पक्ष अस्तित्वात आला. यात सांमील न झालेल्या पक्षांनीही त्याच्याशी सहकार्य करण्याचे ठरविले. १९६५ प्रमाणेच १९७० मध्येही अहिजू अध्यक्ष व फांचा उपाध्यक्ष प्रचंड बहुमताने(९७.५% ) निवडून आले. २१ मे १९७२ रोजी पूर्व व पश्चिम कॅमेरूनचे, १२० सदस्यांच्या एकाच नॅशनल असेंब्लीचे( संसद)युनायटेड रिपब्लिक ऑफ कॅमेरूनअसे राज्य करण्याबाबत ३० लाख लोकांचे सांर्वमत घेण्यात आले. ९९.९७% लोकांनी अनुकूल मत दिले आणि ३ जुलै १९७२ रोजी संयुक्त प्रजासत्ताक कॅमेरून हे राज्य अस्तित्वात आले. २४ मंत्री आणि ४ उपमंत्री यांच्या मंत्रिमंडळात पश्चिम कॅमेरूनचे ८ इंग्लिशभाषी मंत्री होते. अध्यक्ष व उपाध्यक्ष पूर्वीचेच राहिले. १८ मे १९७३ च्या निवडणुकीत संसदेवर ७ स्त्रिया निवडून आल्या. या निधर्मी, समाजवादी संयुक्त राज्याचे अध्यक्ष व उपाध्यक्ष पाच वर्षांसांठी सांर्वत्रिक गुप्त व प्रौढ मतदानाने निवडले जातात. ते पुनः पुन्हा निवडून येऊ शकतात. त्यांनी दूसऱ्या कोणत्याही पदावर रहावयाचे नसते १९६५ च्या निवडणुकांनंतर उपाध्यक्षांनी आपल्या पश्चिम कॅमेरूनच्या मुख्य प्रधानकीचा राजीनामा दिला होता. कार्यकारी सत्ता अध्यक्षाच्या हाती असते. तो शासनप्रमुख व सेनाप्रमुखही असतो. तो स्वतःला जबाबदार असलेले मंत्रिमंडळ नेमतो. हे मंत्री राज्याच्या संसदेचे सभासद असता कामा नयेत. संसदेचे सदस्य पाच वर्षांसांठी प्रौढ सार्वत्रिक मतदानाने निवडून आलेले असतात. संसदेची वर्षातून दोन अधिवेशने भरतात. दोन तृतीयांश सभासदांच्या किंवा अध्यक्षाच्या विनंतीवरून आणीबाणीच्या वेळी खास अधिवेशन भरते. अध्यक्ष संसद केव्हाही बरखास्त करू शकतो. संरक्षण, परराष्ट्रसंबध, न्याय व संघराज्य न्यायालय, बाह्य देशांशी आर्थिक संबंध, राष्ट्रीयत्व, एकूण आर्थिक विकास, चलन व बॅंका, वाहतूक, दळणवळण, उच्च शिक्षण, माहिती, रेडिओ, सांर्वजनिक आरोग्य या राज्यांच्या जबाबदाऱ्या आहेत. फ्रेंच व इंग्रज पद्धतींत फरक असेल, तर त्याबाबतचा बदल हलके हलके झाला पाहिजे, अशी तरतूद आहे. कॅमेरून हा देश संयुक्त राष्ट्रांचा व त्यांच्या अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांचा सभासद आहे.

संघराज्य उच्चन्यायालय राजधानी याऊंदे येथे असून तेथे अध्यक्ष, उपाध्यक्ष व मंत्री यांच्याविरुद्धचे काम व संकल्पित कायदा दाखल करता येईल की नाही याची शहानिशा होते. कायदेविषयक कामाच्या वेळी न्यायमूर्तीच्या जोडीला तितकेच संसद सदस्य अध्यक्षाने निवडलेले असतात. पूर्व कॅमेरूनची न्यायपद्धती फ्रेंच पद्धतीवर आधारलेली आहे. एक सर्वोच्च न्यायालय, चार अपील न्यायलये व प्राथमिक, कामगारविषयक आणि तडजोडीची अनेक न्यायाधिकरणे असतात. पश्चिम कॅमेरूनचीही स्वतःची न्यायपद्धती आहे. त्यात बूएआ येथे एक उच्च न्यायालय व दंडाधिकारी यांचे न्यायालय आहे. तद्देशीयांसांठी त्यांच्या कायद्याप्रमाणे निवाडा करणारी ७० न्यायालये आहेत.

सैन्यात तीन पलटणी, एक चिलखती गाड्यांचे पथक व इतर मिळून एकूण ३,००० सैनिक आहेत. हवाई दलात सु. ३०० सैनिक आहेत. संरक्षणविषयक शिक्षण आणि सुसज्जता करून घेण्याची जबाबदारी करारान्वये फ्रांन्सने स्वीकारलेली आहे.

आर्थिक स्थिती : कॅमेरून हा शेतीप्रधान देश असूनही उष्ण कटिबंधीय आफ्रिकेतील सर्वांत जास्त दरडोई उत्पन्न असलेल्या देशांपैकी तो एक आहे. प्रमुख नगदी पिके कोको, कॉफी, रबर व ताडाचे तेल ही आहेत. केहयांचे निर्यातउत्पन्न अलीकडे कमी होऊ लागल्यामुळे कॅमेरून विकास मंडळाने त्याऐवजी इतर लाभदायक लागवडी करण्यास सुरुवात केली आहे. १९६६–७१ च्या पंचवार्षिक योजनेप्रमाणे कापसांचे उत्पादन वेगाने वाढत आहे. निर्वाह शेतीत दक्षिणेकडे मारॅबो व तारो, मध्यभागात मॅनिऑक, पश्चिमेकडे मका आणि उत्तरेकडे ज्वारीबाजरीसांरखी भरड धान्ये व अलीकडे तांदूळ होतो. १९६६–६७ मध्ये पूर्व कॅमेरूनमध्ये सोरघम ( जोंधळा ), मका, तांदूळ , ऊस, भुईमूग, घेवडे, तारो, मॅनिऑक, याम, तीळ, भाजीपाला, केळी ही मुख्य उत्पन्ने झाली. उत्तरेकडील काही भागात त्से त्से माशीचा उपद्रव बराच कमी आहे. तेथे व ॲडामावा पठारावर पशुपालनाचा व्यवसांय चागला चालतो. डिसेंबर १९६७ सालीपूर्व कॅमेरूनमध्ये गुरे १८,५०,००० मेंढ्या ११,५०,०००( १९६५) शेळ्या ३५,००,००० डुकरे ३,००,००० कोंबड्या बदके ७५,००,००० घोडे २०,००० व गाढवे ५१,२०० होती. १९६६ मध्ये ५,८०० घ.मी. इमारती लाकूड जंगलातून मिळाले. १९६६ मध्ये ११,२४० मे. टन मासे पकडले गेले.

उद्योगधंदे : पश्चिम कॅमेरूनमध्ये लागवडींची तर पूर्व कॅमेरूनमध्ये उद्योगधंद्यांची वाढ झाली आहे. ॲल्युमिनियम, रसांयने व दुर्मिळ वायू ही प्रमुख औद्योगिक उत्पादने आहेत. एडेआ येथे गिनीतून आणलेल्या बॉक्सासांइटपासून ॲल्यूमिनियम तयार होते. दूआला हे औद्योगिक व व्यापारी केंद्र आणि प्रमुख बंदर आहे. स्थानिक उपयोगासांठी पादत्राणे, सिगारेट, प्लॅस्टिकच्या व ॲल्युमिनियमच्या वस्तू, टोप्या, सांबण, बीअर इ. माल तयार केला जातो. सांनागा नदीवरील धरणावर उत्पन्न होणारी जलविद्यूत् दूआला येथील उद्योगधंद्यास पुरविली जाते. एडेआपासून ७००किमी. मकाकू–तिबाती येथे दुसरा प्रकल्प पूर्ण होत आहे. १९६९ मध्ये जागतिक बॅंकेने ७९ लक्ष डॉलर व फ्रान्सने ३६ लक्ष डॉलर कर्ज ताडतेल धंद्याच्या विकासांसांठी व पूर्वेकडील अरण्य प्रदेशात लागवड करण्यासांठी दिले. अमेरिकेच्या आयात–निर्यात बॅंकेने दूरसंदेशवहन वाढीसांठी सु. ७६ कोटी सीएफ्ए फ्रँक दिले.

देशाचे चलन सीएफ्‌ए फ्रॅंक हे असून एका सीएफ्‌ए फ्रॅंकचे १०० सेंट असतात. १,२,१०,२५,५०,१०० सीएफ्‌ए फ्रॅंकची नाणी असून ५०,१००,५००,१,०००,३,००० सीएफ्‌ए फ्रॅंकच्या नोटा असतात. ६६६⋅५० सीएफ्‌ए फ्रॅंक १ पौंड व २७७⋅७१ सीएफ्‌ए फ्रॅंक१ अमेरिकन डॉलर असां विनिमय दर होता. एक फ्रॅंच फ्रॅंकचे ५० सीएफ्‌ए फ्रॅंक होतात.

१९६६–६७चा बरोबरीचा अर्थंसंकल्प २,४५० कोटी सीएफए फ्रॅंक आयव्ययाचा व १९६७–६८ चा २,६१८ कोटी सीएफए फ्रॅंक आयव्ययाचा होता. १९६७चा एकूण व्यवहारशेष १,०१९⋅२ कोटी सीएफ्‌ए फ्रॅंक होता. १९६८ चा बरोबरीचा अर्थसंकल्प २,७५० कोटी सीएफ्‌ए फ्रॅंकचा होता १९७१–७२चा बरोबरीचा अर्थसंकल्प ४,५३० कोटी सीएफ्‌ए फ्रॅंकचा होता.

व्यापार : पूर्व कॅमेरूनची १९६५,६६ व ६७ची आयात अनुक्रमे ३,२९८⋅८,३,२३०⋅८ व ४,३७७⋅९ कोटी सीएफ्‌ए फ्रॅंकची होती. त्यात प्राणिज पदार्थ, उद्‌भिज्ज पदार्थ, पेये, तंबाखू, खनिजे, रसांयने, कापड,धातू, यंत्रसांमग्री व वाहतूक सांमग्री हे प्रमुख होते. एकूण निर्यात वरील वर्षी अनुक्रमे २,९२७⋅६, ३,२४१⋅७ व ३,४१४⋅७ कोटी सीएफ्‌ए फ्रॅंकची होती. त्यात कोको कॉफी, ऍल्युमिनियम, इमारती लाकूड, कापूस, रबर, केळी, ताडाचे पदार्थ, भुईमूग, तंबाखू हे प्रमुख होते. फ्रान्स, इतर फ्रॅंक देश, पश्चिम जर्मनी, इटली,जपान, नेदर्लंड्स ब्रिटन व अमेरिका येथून प्रमुख आयात व त्याच देशांकडे प्रमुख निर्यात होते.


पश्चिम कॅमेरूनमधून १९६५, ६६ व ६७ मध्ये अनुक्रम ४४०.९,३८०⋅७ व २६४ कोटी सीएफ्‌ए फ्रॅंकची आयात व तेथून अनुक्रम ५०८⋅७, ३४६⋅६ व ३३९⋅३ कोटी सीएफ्‌ए फ्रॅंकची निर्यात झाली. निर्यातीच्या प्रमुख वस्तू केळी, हिरवी कॉफी, चहा, मिरी, ताडफळे ताडतेल, कोको,रबर व इमारती लाकूड या होत्या.

आयात निर्यातीचे देश बहुतेक पूर्व कॅमेरूनप्रमाणेच आहेत. कॅमेरूनची १९७०ची आयात ६,७१६ कोटी सीएफ्‌ए फ्रॅंक व निर्यात ६,२७८ कोटी सीएफ्‌ए फ्रॅंक होती. आयातीत फ्रान्सकडून ५०%, प. जर्मनी ८% अमेरिका ८% व निर्यातीत फ्रान्सकडे ३१%, नेदर्लंडस २३%, प.जर्मनी १२% अमेरिका १०% असे प्रमाण होते. निर्यातीत कोको २४%, कॉफी २३%, ॲल्युमिनियम ९%, कापूस ८% व इमारती लाकूड ७% होते. कॅमेरून मध्ये सात देशी व दोन परदेशी बॅंका आहेत. एकूण सतरा विमा कपंन्या असून त्याची कार्यालये दूआला येथे आहेत.

वाहतूक व दळणवळण : १९७० मध्ये कॅमेरूनमध्ये २,००० किमी. चांगले रस्ते धरून एकूण २५,५१६ किमी. रस्ते होते. दूआला चीको मार्गावर मुंगो नदीवर नवीन पूल १९६९ मध्ये झाला. रस्त्यांचे एक वैशिष्टय म्हणजे पश्चिम कॅमेरूनमधील रस्ते नायजेरियातील रस्त्यांना जोडलेले आहेत व पूर्व कॅमेरूनमधील रस्ते पूर्वींच्या फ्रेंच विषुववृत्तीय आफ्रिकी देशांती रंस्त्यांशी जोडलेले आहेत. १९७० मध्ये प्रवासी मोटार वाहने ३२,४०० व व्यापारी मोटार वाहने सु. ३२,००० होती. १९६९ मध्ये ८३९ किमी. लोहमार्ग होते.यात बोनाबेरा ते अंगकाँगसांबा १७२ किमी. दूआला ते याऊंदे व दूआला येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ असून दूआलाची एअर कॅमेरूनची बंदरे असून तेथे अनेक देशंची जहाजे ये जा करतात. याऊंदे व दूआला येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ असून दूआलाची एअर कॅमेरून व व्हिक्टोरियाची कॅमेरून एअर ट्रान्सपोर्ट लि. या कंपन्याशिवाय एअर ॲफ्रिक, पॅन, ऍम, यू.टी.ए. यांचीही वैमानिक वाहतूक आहे. १९७१ मध्ये संयुक्त कॅमेरून प्रजासत्ताकाची कॅमेरून एअरलाइन्स ही विमान वाहतूक कंपनी अस्तित्वात आली.

देशात सहा दैनिके व नऊ नियतकालिके प्रसिद्ध होतात. दूरध्वनींची संख्या जानेवारी १९७० मध्ये ६,००० होती, रेडिओची संख्या डिसेंबर १९६९ मध्ये २१० लक्ष होती.

लोक व समाजजीवन : कॅमेरूनची भूरचना व हवामान यांत जसे वैचिष्ट्य आढळून येते तसेच तेथील लोकांत व त्यांच्या भाषांतही ते दिसून येते. अरण्यवासी पिग्मींंपासून ते रुक्ष प्रदेशातील भटक्या जमातींपर्यंत सर्व प्रकारचे लोक तेथे आहेत. आयुर्मान, जीवनमान, लोकवस्तीची घनता इ. अनेक बाबतींत तेथील लोक बरेच मागासलेले आहेत. तथापि विकासांचा वेगही तेथे वाढता आहे. याऊंदे भोवतीचा पूर्व कॅमेरून चा उंच प्रदेश, गारूआ व मारूआ या भोवतीचा प्रदेश व पश्चिम कॅमेरून चा गवताळ प्रदेश येथे लोकवस्ती अधिक केंद्रीत झालेली आहे. १९६० ते ७० या दशकाच्या अखेरीअखेरीस सु. ३७% लोक १५ वर्षांखालील वर्षांचे ३८% लोक १५ ते ४० वर्षे वयाचे व २५% लोक ४० वर्षापेक्षा अधिक वयाचे होते. पश्चिम कॅमेरूनमध्ये लोकवस्तीची घनता दर चौ. किमी. ९ व पूर्व कॅमेरून मध्ये दर चौ. किमी. ३⋅६ होती. ८० % लोक ग्रामीण वस्तीत होते.

१९६९ मध्ये सु. ४०% ते ४५% लोक पारंपारिक धार्मिक समजुती आणि सांमाजिक रीतिरिवाजाप्रमाणे चालणारे होते. ३५% ते ४०% ख्रिश्चन आहेत, २०% ते २५% मुस्लिम असून ते बहुतेक उत्तर विभागात आहेत.

शासन आणि ख्रिश्चन मिशनरी काही दवाखाने, रुग्णालये वगैरे चालवितातपंरतु सर्व लोकांना उपयोगी पडतील अशी कल्याण केंद्रे जवळजवळ नाहीतच. हिवताप, श्वसनेंद्रियाचे रोग, क्षयरोग, कुष्ठरोग, गुप्तरोग, निद्रारोग वगैरे अनेक रोगानं लोक पछाडलेले दिसतात. १९६९ मध्ये देशात २३० डॉक्टर (२५,००० लोकांस १) व २०५ परिचारिका व १,२००–१,३०० वैद्यकीय व्यवसांय करणारे होते. ४४ रुग्णालये, ९५ दवाखाने, २९ कुष्ठरोग संस्था व ४४ वैद्यकीय आणि प्रसूती केंद्रे होती. रुग्णालयात १०,००० व दवाखान्यात ३,००० खाटा आहेत.

पूर्व कॅमेरूनमध्ये मालकांच्या तीन संस्था आहेत. एक विकास संघटना आहे. पश्चिम कॅमेरूनमध्ये तीन विकास संघटना आहेत. पूर्व कॅमेरूनमध्ये ८३ व पश्चिम कॅमेरूनमध्ये १८२ सहकारी संस्था आहेत. त्या केळी, कॉफी, कोको वगैरे मळ्यातील पिकांची विक्री, कृषिसाहाय्य कर्जे इत्यादींच्या सोयी करतात. दोन्ही विभागांत हजारोंनी सभासद संख्या असलेलया कार्यक्षम व मान्य कामगार संघटना आहेत. कॅमेरूनमधील हस्तव्यवसांयाच्या वस्तूंचे उत्पादन, प्रदर्शन व विक्री यांसांठी चार प्रमुख केंद्रे मारूआ, फूंबान, बामेडा व दूआला येथे आहेत.

शिक्षण पूर्व कॅमेरूनमध्ये १९६६–६७ मध्ये १,४९८ सांर्वजनिक प्राथमिक शाळांतून २,८९,०६२ विद्यार्थी १,०८५ कॅथलिक प्राथमिक शाळांतून २,२१,५९९ विद्यार्थी, ७९४ प्रॉटेस्टंट प्राथमिक शाळांतून १,११,४३१ विद्यार्थी व इतर ७४ प्राथमिक शाळांतून १२,१६२ विद्यार्थी होते. दक्षिणेकडे शाळेत जाण्याच्या वयाची बहुतेक सर्व मुले शाळेत जातात. उत्तरेकडे जेमतेम १०: मुले शाळेत जातात. १९६७-६८ मध्ये ३० सांर्वजनिक माध्यमिक शाळांतून १०,४८८ विद्यार्थी, ८५ खासगी माध्यमिक शाळांतून २३,००० विद्यार्थी, १४ सांर्वजनिक शाळातूंन २,७९४ विद्यार्थी व ३९ खासगी तांत्रिक शाळांतून ६,८९१ विद्यार्थी होते. उच्च शिक्षणाच्या ८ संस्थातून २,१९६ विद्यार्थी हाेते.पश्चिम कॅमेरूनमध्ये १५ माध्यमिक शाळातूंन ३,६६८ विद्यार्थी आहेत. याऊंदे येथे १९६२ मध्ये स्थापन झालेल्या विद्यापीठात ७६ शिक्षक व १,६८१ विद्यार्थी होते. १९६५ ६६ मध्ये कॅमेरूनचे १,२७४ विद्यार्थी पदरेशांत उच्च शिक्षण घेत होते. १९६९-७० मध्ये पूर्व प्राथमिक व प्राथमिक मिळून ८,८८,४३५ विद्यार्थी व १८,९७२ शिक्षक होते. व्यावसांयिक शाळांत १५,७८२ विद्यार्थी व ९१३ शिक्षक होते. शिक्षक प्रशिक्षण संस्थातून २,०३० विद्यार्थी व २१० शिक्षक होते. कॅमेरूनमध्ये शिक्षण मोफत दिले जाते. कॅमेरूनच्या राष्ट्रीय सांहित्याचे चाळीसांहून अधिक तद्देशीय लेखक आहेत. माँगो बेति(१९३२–) व फर्डिनांड ओयोनो(१९२८–) हे त्यांपैकी प्रसिद्ध लेखक आहेत. अब्बिया हे सां स्कृतिक परामर्ष घेणारे द्विभाषिक नियतकालिक आहे.

कॅमेरूनमध्ये खेळांची संघटित सोय नाही, तथापि फुटबॉल हा खेळ अधिकाधिक लोकप्रिय होत आहे. 

ल एसेंबल नॅशनेल ही कॅमेरुनी पारंपरिक कलेच्या प्रतिनिधींची प्रसिद्ध संस्था आहे.

परदेश पर्यटकांसाठी कॅमेरूनमधील वन्य प्राण्यांची अभयारण्ये निर्माण करण्यात येत आहेत.पर्यटन उत्पन्नवाढीच्या मोहिमेचा भाग म्हणून पूर्व कॅमेरूनच्या सुसंघटित सहली आयोजित केल्या जातात.

महत्वाची स्थळे : याऊंदे ही १.७८लक्ष (१९७०) लोकसंख्येची राजधानी आहे. दूआला हे २⋅५लक्ष (१९७०)लोकसंख्येचे सर्वात मोठे शहर, व्यापारी केंद्रे व बंदर आहे ते वूरी नदीच्या खाडीवर वसलेले आहे. अंग काँगसांबा, गारुआ, कुंबा, व्हिक्टोरिया, गाऊंडेरे, बामेंडा,क्रीबी, एबोलोवा ही इतर महत्त्वाची शहरे आहेत. बेन्वेवरील गारुआ येथे नायजेरियातून जुलै ते सप्टेंबरपर्यंत नदीतून जात येते. बूएआ हे ९,०००(१९६६) वस्तीचे शहर पश्चिम कॅमेरूनची राजधानी होती. एडेआ येथे अल्यॅुमिनियमचा मोठा कारखाना आहे.

कुमठेकर, ज. व. 


कॅमेरून