कोलंबिया – १ : अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील साउथ कॅरोलायना राज्याची राजधानी. लोकसंख्या १,१३,५४२ (१९७०). काँगारी नदीकाठी, चार्ल्सटनच्या वायव्येस १६० किमी. वसलेले कोलंबिया सडका, रेल्वे, हवाईमार्ग आणि ईअरी सरोवराशी जोडल्याने जलमार्गाचेही मोठे केंद्र असून, दीड शतकापासून भरभराटलेले आहे. येथे कापड, लाकूड, काच, खाद्यपदार्थ, खते, घाण्या, रेल्वेसामान, यंत्रे, छपाई इ. उद्योग असून साउथ कॅरोलायना विद्यापीठ व इतर अनेक शैक्षणिक व सांस्कृतिक संस्था येथे आहेत.

लिमये, दि.ह.