कोरकू भाषा : कोरकू जमातीची भाषा. या भाषेची महत्त्वाची अशी मवासी ही एकच बोली असून ती छिंदवाडा जिल्ह्यात बोलली जाते. पण सर्वसामान्य कोरकूपेक्षा ती फारशी वेगळी नाही. १९६१ च्या जनगणनेप्रमाणे मवासी भाषिकांची संख्या ९,८२९ होती. निमाडची नहाली ही बोलीही मुळात कोरकूच असावी. कोरकूला स्वतःची लिपी नाही.

 

ध्वनिविचार : कोरकूची ध्वनिव्यवस्था पुढीलप्रमाणे आहे :

स्वर : अ, इ, उ, ए, ओ, (ऱ्हस्व, दीर्घ व अनुनासिक).

 

व्यंजने : स्फोटक – क, ख, ग, घ, ट, ठ, ड, ढ, त, थ, द, ध, प, फ, ब, भ.

अर्धस्फोटक – च, ज (दंत्य व तालव्य).

अनुनासिक – ङ, ण, न, म.

कंपक – र

पार्श्विक – ल

घर्षक – श, स, ह.

अर्धस्वर – य, व.

 

रूपविचार : नाम : सचेतन व अचेतन अशी दोन लिंगे आणि एकवचन, द्विवचन व अनेकवचन अशी तीन वचने कोरकूत आहेत. वचन फक्त सचेतन नामातच व्यक्त होते. द्विवचनाचा प्रत्यय कि किंवा किङ् हा असून अनेकवचनाचा कू हा आहे. आर्यभाषांच्या प्रभावामुळे द्विवचन हळूहळू मागे पडत चालले आहे.

नामाचे कार्य प्रत्ययसिद्ध असते. कर्मवाचक प्रत्यय केन् आहे पण पुष्कळदा तो लावला जात नाही. स्वामित्ववाचक प्रत्यय आहे. तो स्वरानंतर लावला जात नाही. पंचमीचा प्रत्यय तेन् आहे. सप्तमीचा एन (स्वरानंतर न्) आहे.

 

विशेषण : विशेषण नेहमी अविकारी असते. तुलना मराठीप्रमाणेच दर्शविली जाते. इनी कोरा दी कोरा-तेन सार्का का. ‘हा रस्ता त्या रस्त्या पेक्षा सरळ आहे’.

 

स्वतंत्र संख्यावाचक शब्द आहेत पण शेजारच्या आर्यभाषेतील शब्दही पुष्कळदा वापरले जातात.

 

सर्वनाम : सर्वनामे पुढीलप्रमाणे आहेत:

ए. व. द्वि. व. अ. व.
पु. १ इङ् आलिङ् ‘आम्ही’

आलङ् ‘आपण’

आले ‘आम्ही’

आबुङ् ‘आपण’

पु.२ अम् आपिङ् आपे
पु.३ दीच् दाकिङ् दीकू

 

दर्शक सर्वनामे :इनी, ‘हा, ही’, इन-किङ् ‘हे दोघे’ इत्यादी. इन-कू

हे या इत्यादी .प्रश्नार्थक सर्वनामे थे कोण चोच काय, सोनेच (सचे) तोने (अचे) कोणता इत्यादी.

क्रियापद : मूंदाबा मारणे या क्रियापदाची काही रूपे :

वर्तमानकाळ भविष्यकाळ भूतकाळ आज्ञार्थ
इङ् मुंदाबा इङ् मुंदेजबा इङ् कुमा-कने मूंदा
अम् मुंदाबा इत्यादी. अम् मुंदेजबा इत्यादी. अम् कुमा-कने इत्यादी.

 

संदर्भ : 1. Drale, John, A Grammar of the Kurku Language, Calcutta , 1903.

2.Grierson, G. A. Lingulstic Survey of India Vol, IV, Delhi, 1967.

कालेलकर, ना. गो.