गडचिरोली : चंद्रपूर जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण. लोकसंख्या ७,८८४ (१९७१). हे सडकेने चंद्रपूरपासून ८३ किमी. आणि नागपूर-चंद्रपूर रेलमार्गावरील मूल या स्थानकाच्या ४० किमी. पूर्वेस, वैनगंगेच्या डाव्या तीरावर वसले आहे. हे महाराष्ट्राच्या पूर्व सरहद्दीवरील जंगलविभागाजवळ असून तालुक्यातील शेतमालाची बाजारपेठ आहे. येथे हातमाग कापड, लुगडी, कोशाचे कापड, कातडीकाम, लाकूडकामाचे उद्योग असून भातगिरण्या, लाकूड कापण्याचे कारखाने व तेलघाण्या आहेत.

शाह, र.रू.