कोटोनिॲस्टर : (कुल-रोझेसी). फुलझाडांपैकी (आवृतबीज, द्विदलिकित) एका वंशाचे लॅटिन नाव. यामध्ये सु. ५० जातींचा समावेश असून त्यांचा प्रसार उ. समशीतोष्ण प्रदेशात (यूरोप, आशिया व उ.आफ्रिका) आहे. भारतात पूर्व समशीतोष्ण हिमालयात (सु. १,२४०–२,४८० मी. उंचीपर्यंत), पंचमढी व काश्मीर ते नेपाळमध्ये को. बॅसिलॅरिसको ॲक्युमिनेटा (हिं.रिऊ) या जाती आढळतात. कोटोनिॲस्टर वंशातील सर्वच जाती क्षुपे (झुडपे) किंवा लहान वृक्ष आहेत. कित्येक बागांतून शोभेकरिता लावतात कारण त्यांच्या पानांचे शरद ऋतूतील भडक रंग व लाल किंवा काळी फळे आकर्षक असतात. पाने एकाआड एक, अखंड व सोपपर्ण (उपपर्णयुक्त) फुले पांढरी किंवा लालसर, एकेकटी किंवा वल्लरीवर येतात. सामान्य संरचना ⇨रोझेलीझ  गणात वर्णिल्याप्रमाणे. इंडोचायनात को. बॅसिलॅरिसाचे तिरश्चर (मुनवे) स्तंभक (आतड्याचे आकुंचन करणारे) म्हणून देतात. को. ॲक्युमिनेटाच्या लाकडापासून हातात धरावयाच्या काठ्या बनवितात . 

जमदाडे, ज. वि.

  

कोटोनिॲस्टर लॅक्टिया