पिनीरो, आर्थरविंग : (२४मे १८५५–२३नोव्हेंबर१९३४). इंग्रजनाटककार. लंडनमध्ये जन्मला. वडीलसॉलिसिटरहोतेआणिह्याचव्यवसायातआपल्यामुलानेपडावेह्या दृष्टीने तेत्यालाकायद्याचेशिक्षणदेऊपहातहोते परंतुकायद्याचाअभ्याससोडूननटम्हणूनतो प्रथमनाट्यक्षेत्रातआला. १८७६–८१ह्याकालखंडातलंडनमधील ‘लायसिअम’ ह्या नाटकमंडळीततो होता. तेथे असताना विख्यातइंग्रजअभिनेता हेन्ऱी अर्व्हिंगह्याच्याशीपिनीरोचासंबंधआला. नटम्हणूनरंगभूमीवरवावरतअसतानाचअर्व्हिंगच्याप्रेरणेने पिनीरो नाट्यलेखनही करूलागला. टूहंड्रेडपाउंड्यीअरहे त्याचे रंगभूमीवरआलेले (१८७७) पहिलेनाटक. पिनीरोची आरंभीची काही नाटके प्रहसनात्मकअसूनत्यांतीलमनीस्पिनर (१८८०), मॅजिस्ट्रेट(१८८५) वस्वीटलव्हेंडर(१८८८) ही काहीविशेषउल्लेखनीयहोत. प्रहसनात्मकघटना निर्माणकरण्यापेक्षा मानवी स्वभावातीलविसंगतींवरत्याने विशेषभरदिला. पुढे पिनीरो गंभीरस्वरूपाच्या नाट्यलेखनाकडे वळला आणि आधुनिक समाजातील स्त्री-पुरुष संबंधांतून निर्माण होणाऱ्या समस्या आपल्या नाटकांतूनमांडू लागला. सेकंमिसेसटँकरे (१८९३) ह्यात्याच्याअशाचएका समस्यात्मकनाटकानेएकप्रमुखइंग्रजनाटककारम्हणूनत्याचीप्रतिमाप्रस्थापितझाली. पिनीरोच्याह्यानाट्यकृतीवरइब्सेनच्या नाट्यदृष्टीचा आणि नाट्यतंत्राचाप्रभावदिसतो. नटोरियसमिसेसएब‌्स्मिथ(१८९५), गे लॉर्डक्यू(१८९९), आयरिस(१९०१) ह्या त्याच्याअन्यनाट्यकृतींतूनही हा प्रभावप्रत्ययासयेतो.

पिनीरोच्या नाट्यकृती तंत्रदृष्ट्या अत्यंतसफाईदारआहेत. समकालीननैतिकप्रश्नांविषयीत्यानेआस्था दाखविली तथापिअशा प्रश्नांची सखोलजाण, तसेचतेमांडण्यासाठी आवश्यकअसलेली मोठ्या नाटककाराची प्रतिभावा कल्पकता त्याच्या ठायी नव्हती. म्हणूनचआपल्या समस्यात्मकनाटकांतूनमर्मग्राही शोकात्मिका तो निर्माण करू शकला नाही. व्हिक्टोरियन नाट्यकृतींमध्ये त्याला जाणवणारीयांत्रिकता आणि ठोकळेबाजपणा घालविण्यासाठी समस्यात्मकनाटकेलिहूनत्यांतनवता आणण्याचा मौलिकयत्नत्याने आस्थापूर्वककेला. लंडनयेथेचतो निधनपावला.

बापट, गं. वि.