जव्हार : महाराष्ट्र राज्याच्या ठाणे जिल्ह्यातील, ठाण्यापासून सु. ८० किमी. ईशान्येस वसलेले याच तालुक्याचे प्रमुख ठिकाण. लोकसंख्या ६,११० (१९७१). ही भूतपूर्व जव्हार संस्थानची राजधानी होती. १९६१ च्या राज्यपुनर्रचनेनंतर जव्हार एक तालुका बनविलेला आहे. येथील हवा थंड व निरोगी म्हणून विशेष प्रसिद्ध आहे. जुना राजवाडा व नगारखाना हे आता पडीक आहेत. नवा राजवाडा प्रेक्षणीय आहे. येथून सु. १६ किमी. वर भोपटगड नावाचा किल्ला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पत्नीचे हे माहेर असून त्यांचे वडील संस्थानकाळात श्रेष्ठ पदावर होते.

नाईक, शुभदा