घेर्किन : (इं. गूजबेरी गोर्ड, वेस्ट इंडियन घेर्किन, बर-कुकंबर लॅ. कुकुमिस अँगुरिया कुल-कुकर्बिटेसी). ⇨काकडीच्या वंशातील ही जाती अमेरिकेच्या उष्ण भागातील एक वेल असून ती लहान व बारीक असते. सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ कुकर्बिटेसी  कुलात वर्णिल्याप्रमाणे. पाने साधी व ३-५ खंडित फुले लहान व पिवळी केसरदले सुटी फळे अनेक, लहान, दीर्घ-वर्तुळाकृती असून त्यांवर बारीक काटे व पुरळ असतो. ती हिरवी (२·५ – ७·५ सेंमी. लांब) पण सावकाश पांढरी होतात ती लोणच्यास उपयुक्त असतात. कोवळी फळे शिजवूनही खातात (आकृतीकरिता कुकर्बिटेसी ही नोंद पहावी). भारतात कोठे कोठे लागवड आढळते.

महाजन, श्री. द.