डालमियानगर : बिहारमधील शाहाबाद जिल्ह्यात हे शहर असून त्याची वाढ शोण नदीच्या डाव्या काठावर डेहरीच्या बाजूला होत आहे. गया–वाराणसी लोहमार्गांवर गयेपासून पश्चिमेस १५ किमी. अंतरावर हे शहर आहे. लोकसंख्या ३८,०९२ (१९७१). डालमियानगरची स्थापना रामकृष्ण हरजीमल डालमिया या सुप्रसिद्ध उद्योगपतीने केली व ते कारखान्यांचे केंद्र बनविले. येथे सिमेंट, साबण, वनस्पती तूप, कागद यांचे कारखाने आहेत. १९७५ मधील सिमेंट कारखान्यांची उत्पादनक्षमता ११·६५ लाख टन होती. 

सावंत, प्र. रा.