जेतवन विहार : बिहार राज्यातील एक प्राचीन बौद्ध विद्यापीठ. येथे भिक्षू व विद्यार्थी यांची निवासस्थाने, प्रार्थनागृहे, प्रवचनगृहे, भोजनगृहे, स्नानगृहे, रुग्णालये, ग्रंथालये इ. बांधलेली होती. येथील ग्रंथालयांत बौद्ध धर्माचे सर्व ग्रंथ तर होतेच पण बौद्धेतर धर्मांचेही उत्कृष्ट ग्रंथ होते. पाटलिपुत्राजवळ असूनदेखील तटबंदीमुळे शहरातील गजबजाटाचा यास उपद्रव होत नसे. येथील शांत, एकांत आणि पुष्करिणी व वृक्षवेली यांमुळे शीतल झालेल्या वातावरणात व्यासंगी आणि तपस्वी भिक्षू, जिज्ञासू विद्यार्थ्याना बौद्ध धर्माचे उच्च शिक्षण देत.

कांबळे, य. रा.