काचकारखान्यातील दृश्य, तळेगाव दाभाडे.

तळेगाव दाभाडे : पुणे जिल्ह्याच्या मावळ तालुक्यातील एक ऐतिहासिक ठिकाण. लोकसंख्या १६,५१४ (१९७१). हे पुण्याच्या वायव्येस ३२ किमी. असून पुणे-मुंबई या लोहमार्गावरील स्थानक आहे. पेशव्यांच्या कारकीर्दीत नावारूपास आलेल्या दाभाडे घराण्यातील खंडेराव दाभाडे हा या गावाचा संस्थापक होय. येथे १८६६ पासून नगरपालिका असून १९०८ मध्ये सुरू केलेला पैसा-फंड काच कारखाना आहे. तसेच तळेगाव रेल्वे स्थानकाच्या आग्नेयीस १·६ किमी. तळेगाव-जुन्नर मार्गावर प्रसिद्ध नेत्र चिकित्सालय आहे. १९३९ पासून येथे क्षयरोग रुग्णालय आहे. टपाल-तार-दूरध्वनी, माध्यमिक शाळा इ. सोयी आहेत. शहराच्या पश्चिमेस विस्तृत तलाव व महादेवाची मंदिरे आहेत. याच्या आजूबाजूंस औद्योगिक वसाहत वाढत आहे.

सावंत, प्र. रा.