कॅमडेन : अमेरिकेतील न्यू जर्सी राज्यातील औद्योगिक शहर. लोकसंख्या १,०२,५५१ (१९७०). डेलावेअर नदीच्या काठी फिलाडेल्फिया शहरासमोर ते आहे. ह्या दोन शहरांमध्ये, डेलावेअर नदीवर अनेक पूल आहेत. कापड, तयार कपडे, साबण, डबाबंद खाद्यपदार्थ, रसायने, दूरचित्रवाणीचे आणि विजेचे साहित्य, फोनोग्राफ, रेडिओ, जहाजबांधणी, तेलशुद्धीकरण, रेल्वे कर्मशाळा वगैरे अनेक उद्योग येथे आहेत.

लिमये, दि. ह.