कान्हेरे, अनंतलक्ष्मण :  (? १८९२-१९ एप्रिल १९१०). एक महाराष्ट्रीय क्रांतीकारक. बालपण आणि शिक्षण औरंगाबाद येथे. वीर सावरकरांच्या `अभिनव भारत’ संस्थेचा तो सभासद होता. लोकमान्य टिळकांना 1908 मध्ये राजद्रोहाबद्दल झालेल्या कारावासाच्या शिक्षेनंतर महाराष्ट्रात सर्वत्र दडपशाही सुरू झाली. ह्या दडपशाहीचा बदला ब्रिटीश अधिकाऱ्यांचा वध करूनच घेतला पाहिजे, असे प्रामाणिकपणे मानणाऱ्यांपैकी कान्हेरे हा एक होता. त्या .ष्टीने त्याने आपले वास्तव्य नाशिकला हलविले. २१ डिसेंबर १९०९ रोजी नाशिक येथील जिवयानंद नाट्यगृहात एका समारंभास ब्रिटीश कलेक्टर जॅक्सन आला आता ह्या तरूणाने त्याचा गोळ्या घालुन वध केला. ह्य गुन्ह्याबद्दल त्याला फाशी देण्यात आली. अशा रीतीने १८व्या वर्षीच त्याला हौतात्म्य प्राप्त झाले.

फरांडे, वि, दा.