वेव्हेल, लॉर्ड आर्चिबॉल्ड पर्सव्हल : (५ मे १८८३ – २४ मे १९५०). ब्रिटिशांकित हिंदुस्थानचा व्हाइसरॉय व फील्ड मार्शल. जन्म कोलचेस्टर (एसेक्स) येथे सरदार घराण्यात. सॅंडहर्स्ट अकादमीतून त्याने लष्करी शिक्षण पूर्ण केले (१९००). पुढे त्याची ब्लॅक वॉच या शाही पलटणीत अधिकारपदी नियुक्ती झाली. पहिल्या महायुद्धात (१९१४-१८) त्याने आफ्रिकेत ईजिप्शियन भूसैन्यात उत्तम कामगिरी केली व त्याला मेजर जनरलची पदोन्नती मिळाली. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात (१९३९-४५) त्याला ब्रिटिश कमांडर – इन – चीफ हे पद देऊन त्याच्याकडे मध्यपूर्वेतील लष्करी मोहिमांची सूत्रे सोपविण्यात आली. त्याने लिबियात सरस संख्याधिक्य असलेल्या इटालियन सैन्याचा धुव्वा उडविला (डिसेंबर १९४० – फेब्रुवारी १९४१) मात्र ग्रीस व क्रीट यांवरील जर्मन सैन्याचे आक्रमण त्यास थोपविता आले नाही (मे १९४१). त्यानंतर त्याची आग्नेय आशियात सरसेनापती म्हणून नियुक्ती झाली. इथेही त्यास मलाया, सिंगापूर आणि ब्रह्मदेश (म्यानमार) या ब्रिटिशांकित वसाहतींना जपानी सैन्यांपासून वाचविता आले नाही. तथापि ब्रिटिश शासनाने त्यास फील्ड मार्शल करून व्हाइसरॉय म्हणून हिंदुस्थानात त्याची नेमणूक केली (१९४३-४७).
2. Mersey, Viscount, The Viceroys and Governors-General of India, 1857-1947, London, 1957.
“