रिल्येयेव्ह, कनड्राट्यई फ्लॉडरॉव्हिच : (२९ सप्टेंबर १७९५−२५ जुलै १८२६). रशियन कवी आणि क्रांतिकारक. त्याचा जन्म बातोव्हो येथे गरीब कुटुंबात झाला. सैनिकी शाळेत त्याने शिक्षण घेतले सैन्यात नोकरीही केली. १८२५ च्या डिसेंबरात झालेल्या बंडाचा तो एक प्रमुख नेता होता. हे बंड चिरडून काढण्यात आले आणि रल्येयेव्बला सेंट पीटर्झबर्ग येते फाशी देण्यात आले.

त्याच्या कविता १८२० पासून प्रसिद्ध होऊ लागल्या. रिल्येयेव्हची कविता क्रांतिकारक विचार, उत्कट देशभक्ती, स्वातंत्र्यप्रेम आणि जूलूमशाहीबद्दल कडवट तिटकारा ह्यांनी भारलेली आहे. त्याच्या उत्कृष्ट काव्यकृतींत क व्रेमिन्‌श्चीकू (१८२०, इं. शी. टू द फेव्हरिट), दूमी (१८२१−२३, इं. शी. बॅलझस), ग्राझदानीन (१८२४−२५, इं. शी. सिटिझन) ह्यांच्या अंतर्भाव होतो. ‘वझनारोवस्की’ आणि ‘नालिवाइको’ ही त्याची कथाकाव्येही उल्लेखनीय आहेत.

पांडे, म. प. (इं.) कुलकर्णी, अ. र. (म.)