मोने, मोरेश्वर सखाराम : (१८८५–१९४३). मराठी ग्रंथकार. रायगड जिल्ह्यातील पनवेल येथे जन्मले. प्राथमिक शिक्षकाचे प्रशिक्षण घेतल्यानंतर काही किरकोळ नोकऱ्या त्यांनी केल्या. पुढे हिंगणे येथील अध्यापिका महाविद्यालयात ते अध्यापक झाले.
मराठी भाषेचे व्याकरणकार व व्याकरण प्रबंधकार (१९२७) ह्या त्यांच्या ग्रंथात मराठी भाषेच्या आंग्ल व महाराष्ट्रीय व्याकरणकारांची चरित्रे, महानुभावांच्या आद्य व्याकरणग्रंथासह दिलेली आहेत. त्यांनी स्वतःही व्याकरणविषयक काही लेखन केले आहे.
ग्रामोपाध्ये, गं. ब.