माधव जूलियन्माधवजूलियन् : (२१जानेवारी१८९४–२९नोव्हेंबर१९३९). श्रेष्ठ मराठी कवी, कोशकार, छंद:शास्त्राचे व्यासंगी,  साहित्य विमर्शक आणि मराठी भाषा शुद्धीचे तत्त्वनिष्ठ पुरस्कृतें, प्रचारक, मूळ नाव माधव त्र्यंबक पटवर्धन. काव्य रचनेसाठी त्यांनी घेतलेल्या ‘माधव जूलियन्’ ह्या टोपण नावातील ‘जूलियन्’ हे नाव, सुप्रसिद्ध इंग्रज कादंबरीकर्त्री मारी कोरले हिच्यागॉड्सगुडमॅनह्या  कादंबरीतील ‘जूलियन्ॲडर्ली’ ह्या  उत्कट मनोवृत्तीच्या, सौंदर्यपूजक आणि स्वच्छंद कवीच्या व्यक्तिरेखे वरून त्यांनी घेतले आणि आपल्या ‘माधव’ यानावाला जोडले. माधवरावांचा जन्म गुजरात मध्ये, बडोदे शहरी, त्यांच्या आजोळी झाला.

पुणे जिल्ह्यातील आवळस या गावी त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. माध्यमिक इंग्रजी शिक्षण त्यांनी बडोदे, अहमदाबाद आणि मुंबई येथे पूर्ण केले (१९०९). बडोदे कॉलेजातून १९१६ मध्ये बी. ए. झाल्यानंतर बडोद्याच्या महारा णी चिमणाबाई हायस्कूल मध्येसु. वर्षभर त्यानी अध्यापन केले. १९१८ मध्ये मुंबईच्या एल्‌फिन्स्टन महाविद्यालयातून फार्सी आणि इंग्रजी हे विषय घेऊन ते  एम्. ए. झाले. जून १९१८ ते ऑक्टोबर १९२५ ह्या  कालखंडात पुण्याच्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या ‘न्यूइंग्लिशस्कूल’ आणि‘फर्ग्युसनकॉलेज’ ह्या  शिक्षण संस्थांतून त्यांनी अध्यापन केले.‘न्यू इंग्लिश स्कूल चे ते काही काळ उपप्रमुख ही होते. १९१९ मध्ये ह्या  संस्थेचेते आजीव सदस्य ही झाले. १९२१ मध्ये कवी श्री. बा. रानडे ह्यांच्या शीत्यांचानिकटचापरिचयझाला. श्री. बा. रानडे, गिरीश, यशवंतइ. कवींबरोबर, माधवरावही⇨

रविकिरण मंडळ ह्या  कवि मंडळाचे संस्थापक सदस्य होते. डेक्कन एज्युकेशन सोसायटी शी तीव्र मतभेद झाल्या मुळे त्या संस्थेचा त्यांनी राजीनामा दिला. त्यानंतर चा काही काळ मनस्ताप आणि खडतर परिस्थिती ह्यांना तोंड देत त्यांनी काढला अनिकेत, व्यवसायहीन अवस्थेतही त्यांना राहावे लागले . पुढे पुण्याच्या भावे स्कूलमध्ये काही काळ शिक्षक म्हणून राहिल्यानंतर, १९२८ मध्ये कोल्हापूरच्या राजा राम कॉलेजात फासींचे प्राध्यापक म्हणून त्यांना नेमणूक मिळाली. ह्याच वर्षी त्यांचा विवाह झाला. साहित्य क्षेत्रातील अनेक बहुमान त्यांना त्यानंतरच्या काळात मिळाले. पुणे येथे ते निधन पावले.

माधवरावांच्या काव्य लेखनाला पूर्ववयात त्यांच्या बडोदे येथील वास्तव्यातच आरंभ झाला. बडोदे येथील त्यांच्या पूर्व वयातील वास्तव्यात काव्य प्रेमी मित्रांचा,  तसेच कवी चंद्रशेखरांचा सहवास त्यांना लाभला. कविमन हे कसे रसिक आणि संस्कारक्षम असते, ह्याचा अनुभव चंद्रशेखरांच्या सहवासात त्यांना मिळाला. निर्दोष व अर्थानुकूल काव्य रचनेचे भान, माधवरावांना चंद्रशेखरांकडून मिळाले. पुण्यास आल्यानंतर त्यांच्या काव्यलेखना लागती आली. रविकिरण मंडळाच्या किरण (१९२३), मधुमाधव (१९२४) आदी सामूहिक प्रकाशनांतून त्यांच्या काही कविता प्रसिद्ध झाल्या. ख्यातनाम फार्सी कवी उमरखय्याम ह्याच्या रुबायांचा माधवरावांनी केलेला मराठी अनुवाद १९२९ मध्ये प्रसिद्ध झाला (उमरखय्यामकृतरुबाया ). उमरखय्यामच्या रुबाया त्यांनी तीन वेळा अनुवादिल्या. उमरखय्यामकृतरुबाया त्यांनी मूळ फार्सी रुबायांवरुन चअनुवा दिल्या (एकूण५२४). त्यानंतर एडवर्ड फिट्सलेरल्डने उमरखय्यामच्या रुबायांचे केलेले इंग्रजी रुपांतर द्राक्षकन्या  (१९३१) ह्या  नावाने त्यांनी अनुवा दिले.‘मधुलहरी’ हेरुबा यांचे, त्यांनी केलेले तिसरे भाषांतर. रुबायांच्या फिट्सजेहल्डकृत भाषांतराच्या चौथ्या आवृत्ती वरून हेभाषांतर माधवरावांनी केले होते. विरहतरंग (१९२६) आणिसुधारक (१९२८) ही त्यांची सामाजिक खंडकाव्ये त्यांनी रुबायाच्या केलेल्या पहिल्या अनुवादापूर्वी च प्रकाशित झालेली होती. नकुलालंकार (१९३९) हे त्यांनी लिहिलेले आणखी एक खंडकाव्य. त्यांनीलिहिलेल्यागझलत्यांच्यागज्जलांजलीतून (१९३३) आणिसुनीतेतुटलेलेदुवे (१९३८) ह्या  त्यांच्यासंग्रहातूनसंगृहीतआहेत. तुटलेलेदुवेह्या  संग्रहातील सुनीतांतून एक कथासूत्र गुंफण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. स्वप्नरंजन (१९३४) हा त्यांच्या स्फुट कवितांचा संग्रह. उपर्युक्त ‘मधुलहरी’ व माधरावांच्या अन्य काही कवितामधुलहरी व इतर कविता ह्या  नावाने १९४० मध्ये पुस्तकरू पाने प्रकाशित झाल्या.

माधवराव हे मूलतः  कवी होते. काव्य हाच त्यांच्या समग्रवाङ्‍मय निर्मितीचा केंद्र बिंदू होता तसेच प्रयोगशीलता हा त्यांच्या काव्यात्मव्यक्तिमत्त्वाचा महत्त्वा चाघटक होता. काव्याच्या संदर्भात त्यांनी अनेक प्रयोग केले. प्रयोगशीलते च्या दृष्टीने केशवसुत आणि मर्ढेकर ह्या  दोन युगप्रवर्तक कवींच्या मधील एकमेव दुवा म्हणून माधवरावांचे नाव गौरवाने घेतले जाते. केशवसुती काव्य कल्पनेचे विस्तरण करून मराठी काव्य कल्पने वर एक नवे अंतर्बाह्य संस्करण करण्याचे श्रेय ही त्यांना दिले जाते. त्यांच्या काही कवितांतून मर्ढेकर प्रतिमा सृष्टीची चाहूल लागते. गझल हा काव्य प्रकार मराठीत रुजवण्याचे पहिले श्रेयही त्यांचेच. स्वातंत्र, प्रेम आणि शांती ही मूल्ये त्यांनी आयुष्यभर जोपासली आणि त्यांच्या काव्यातही त्यांचे प्रत्यंतर येते. प्रीती हा त्यांच्या कवितेचा महत्त्वाचा विषय असून प्रेम भावनेच्या अनेक तरल छटा तीत व्यक्त झाल्या आहेत. फार्सी प्रेमकाव्याचा प्रभावही तीवर आहे.


काव्य निर्मिती प्रमाणेच माधवरावांनी काव्य समीक्षा आणि काव्य विचार ही केला. आधुनिक मराठी कवी आणि कविताह्यांच्या संदर्भात त्यांनी आपले समीक्षात्मक लेखन मुख्यतः केले तिच्यातील न्यूनाधिक्य त्यांच्या दृष्टिकोणातून दाखवून दिले. आधुनिक मराठी कविता बरीच शीपरपुष्ट आणि अनुकरण शील आहे, असे त्यांचे मत होते. आधुनिक मराठी कवितेवर त्यांनी इंग्रजीतूनही लेखन केले. चिकित्सकपणा आणि रसग्राही वृत्ती ह्यांचा समतोल समीक्षकाने सांभाळला पाहिजे, अशी त्यांची भूमिका होती. त्यासाठी त्यांनी ‘काव्यचिकित्सा’ ही लेखमालाही लिहिली. रसव्यवस्था आणि वाङ्‍मयानंदमीमांसा ह्या विषयांवरही त्यांनी लेखन केले. काव्यविहार (१९४७) व काव्यचिकित्सा (१९६४) हे त्यांचे कविकाव्य विषयक लेखसंग्रह आहेत.

माधवरावांचा फार्सीमराठीकोश १९२५ मध्ये प्रसिद्ध झाला. तो करताना तौलनिक आणि ऐतिहासिक दृष्टीचा अवलंब त्यांनी केला होता. त्यांची परिश्रम शीलता, सावधानता व सूक्ष्म अभ्यासह्यांचा प्रत्यय ह्या कोशातूनयेतो. ऐतिहासिक कागद पत्रांच्या अभ्यासासाठी एक महत्त्वाचे साधन ह्या कोशामुळे उपलब्ध झाले. त्यानंतर दोनच वर्षांनी पद्यरचना शास्त्रावरीलछंदोरचना हा त्याचा ग्रंथ प्रसिद्ध झाला (१९२७). छंद:प्रकार कसे परिणत होतआले, ह्याचे विवेचन करावे आणि छंद:शास्त्राची पुनर्घटना करावी अशा हेतूने हा ग्रंथ त्यांनी लिहिला. पद्य म्हणजे लयबद्ध अक्षररचना होय, हा सिद्धांत त्यांनी ह्या ग्रंथात मांडला. तसेच पद्यरचनाही वृत्तजाति छंद:स्वरूप अशी त्रिविध आहे, हे त्यांनी संशोधन पूर्वक दाखवून दिले. ह्या ग्रंथाची दुसरी परिवर्धित आवृत्ती (१९३७) माधवरावांनी डी. लिट्. ही पदवी मिळविण्यासाठी मुंबई विद्यापीठाकडे सादर केली आणि १९३८ मध्ये ही पदवी त्यांना प्राप्त झाली. ह्या ग्रंथाने मराठी पद्यरचना शास्त्राचापाया घातला. छंदोरचनेचाच विषय घेऊन त्यांनी पद्यप्रकाश  (१९३८) लिहिले. शिक्षक आणि विद्यार्थी ह्याच्यासाठी हे पुस्तक मुख्यतः  आहे.

भाषा शुद्धीचे प्रखर पुरस्कर्ते म्हणूनही ते प्रसिद्ध आहेत. त्यासाठी त्यांनी महाराष्ट्राबाहेरही अनेक व्याख्याने दिली. लेखही लिहिले, भाषाशुद्धिविवेक (१९३८) ह्या ग्रंथात त्यांचे हे लेख संगृहीत आहेत. ‘परकीशब्दनवापरणे, जुन्या मराठी शब्दांचा आठव ठेवून पुरस्कार करणे आणि नव्या नडी स्वावलंबनाने कष्टून भागवणे’ हा आपला संकल्प त्यानी भाषाशुद्धिविवेका च्या प्रस्तावनेत व्यक्त केला.

नासिक येथे १९३३ साली झालेल्या महाराष्ट्र क‍वि संमेलनाचे ते अध्यक्ष होते. तसेच बडोदे येथे भरलेल्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाच्या (१९३४) काव्य शाखेचे ते अध्यक्ष होते. १९३५मध्ये बडोदे सरकारकडून त्यांचा साहित्य सत्कार करण्यात आला. १९३६ मध्ये जळगाव येथे झालेल्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पदही त्यांनी भूषविले.

संदर्भ: १. करंदीकर, गो. वि. परंपराआणिनवता, मुंबई, १९६७ आवृ. २, १९८०.

            २. कानेटकर, शंकरकेशव, स्वप्नभूमी, पुणे, १९६५.

            ३. खानोलकर, गं. दे. माधवजूलियन, मुंबई, १९५१ आवृ. दुसरी, १९६८.

            ४. गोखले, द. न. डॉ. पटवर्धनऊर्फमाधवजूलियन, मुंबई, १९७८,

            ५. चुनेकर, सु. रा. माधवरावपटवर्धन : वाङ्‍मयदर्शन, मुंबई, १९७३.

पोतदार, अनुराधा