बेल्मोपान : बेलीझ (ब्रिटिश हाँडुरस) देशाची राजधानी. लोकसंख्या ४,००० (१९७८). हे बेलीझ सिटीच्या (पूर्वीची राजधानी) नैर्ऋत्येस ८० किमी. क्रीक रोअरिंग गावाजवळ, बेलीझ नदीकाठी वसलेले आहे. बेलीझ सिटीया पूर्वीच्या राजधानीचे ३१ ऑक्टोबर १९६१ रोजी झालेल्या ‘हट्टी’ या हिकेन वादळामुळे अतोनात नुकसान झाले होते. त्यामुळे दुसरीकडे राजधानी वसविण्याची योजना तयार करण्यात ली. ब्रिटनने १९६६ मध्ये दिलेल्या आर्थिक मदतीतून बेल्मोपान ही नवीन राजधानी उभारण्यात आली (१९७०).

खांडवे, म. अ.