छत्तीसगढ मध्य प्रदेश राज्याचा पूर्वेकडील महाराष्ट्राला लागून असलेला विभाग. दुर्ग, राजपूर, बिलासपूर, बस्तर, रायगढ या सध्याच्या जिल्ह्यांमध्ये हा भाग पसरला आहे. पूर्वी या भागात छत्तीस गढ होते म्हणून यास छत्तीसगढ नाव पडले, तर काही विद्वानांच्या मते चेदीश गढचा हा अपभ्रंश असावा. १८५० पर्यंत रतनपूरच्या हैहय वंशी घराण्याचे राज्य या भागावर होते. मागासलेल्या, आदिवासी लोकांचा हा प्रदेश समजला जातो. तथापि खनिजदृष्ट्या हा संपन्न आहे. छत्तीसगढी भाषा व साहित्य हिंदी भाषेत प्रसिद्ध आहे.

 छत्तीसगढी आदिवासी युवती

शाह, र. रू.