बेथलीएम : मॉर्डनमधील येशू ख्रिस्ताचे पवित्र जन्मस्थान व ख्रिस्ती धर्मीयाचे एक तीर्थक्षेत्र. लोकसंख्या १६,३१३ (१९६७). हे जेरुसलेम शहराच्या दक्षिणेस ८ किमी अंतरावर आहे. ज्यूचा दुसरा राजा डेव्हिड हा येथेच जन्मला. अरबी नाव बाइट लाहम. ‘बेथलीएम-’ या हिब्रू शब्दाचा अर्थ ‘पावाचे घर’किंवा ‘लाहम्‌ देवाचे घर’असा होतो. डेव्हिड राजाच्या वेळी (इ.स.पू. १०१३-९७३) हे बंदिस्त शहर होते. येशू ख्रिस्ताच्या काळात येथे रोमन अंमल होता रोमन साम्राज्याच्या अस्तानंतर हे तुर्कांकडे गेले. धर्मयूध्दाच्या काळात इ.स. १०९९ मध्ये ख्रिस्ती सैन्याने त्यावर ताबा मिळविला पण लवकरच साराकेनने हे जिंकले. ऑटोमन साम्राज्याखाली ते १५७१ साली आले. जनरल व ॲलेनबीने १९१७ मध्ये हे ब्रिटिशाच्या अधिपत्याखाली आणले व १९४८ साली ते जॉर्डनमध्ये समाविष्ट करण्यात आले. जनरल ॲलेनबीने १९१७ मध्ये हे ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली आणले व १९४८ साली ते जॉर्डनमध्ये समाविष्ट करण्यात आले. येथे अनेक चर्चवास्तू, मठ आणि अनाथाश्रम आहेत.येथील ‘चर्च ऑफ’ नेटिव्हिटी’ हे कॉन्स्टंटीन राजाच्या आईच्या प्रेरणेने इ.स. ३०० मध्ये बांधण्यात आले. येशू ख्रिस्ताचा जन्म ज्या गोठ्यात झाला,प्रसिद्धत्याच जागेवर या चर्चची उभारणा करण्यात आली, अशी समजूत आहे. या परिसरातील हे एक छोटे व्यापारी केंद्रही आहे.

पंडित, अविनाश